लेखक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी ब्लॉग ही छान सुरुवात
मराठीमध्ये ब्लॉग कसा तयार करावा
ब्लॉग रायटिंग कसं असावं, लोकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघावं अशा महत्त्वपूर्ण टिप्स जणूं घेऊ या !
लिखाणातून व्यक्त होण्यासाठी ब्लॉग हे प्रभावी माध्यम आहे . लेखक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी ब्लॉग ही छान सुरुवात होऊ शकते.
ब्लॉगिंगमधून लिखाणाची आवड जपता येते तसेच स्वतःच्या व्यवसायाची मार्केटिंग देखील ब्लॉगच्या माध्यमातून करता येते ,त्याकडे करिअरच्या दृष्टिनकोनातूनहि बघता येते. ,
कोणत्याही विषयावर ब्लॉगमधून व्यक्त होऊ शकता. . लेखन, फोटो, व्हिडीओ अशा कोणत्याही माध्यमातून ब्लॉग सुरु करता येतो. ब्लॉग लिखित स्वरूपात असेल तर त्याबरोबर एखादा विषयानुरूप फोटो किंवा व्हिडीओ जोडल्यास ब्लॉग अधिक उठावदार होतो.
बहुतेकांच्या ब्लॉगला केवळ भारतीयच नव्हे तर इतर देशांतील अनेक लोक वाचतात. त्यामुळे ब्लॉगच्या माध्यमातून 'ग्लोबल सिटीझन' होता येतं.
ब्लॉगला मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रियांकडे सकारात्मकतेने बघितले पाहिजे
वाचक ब्लॉगवर त्यांची मतं व्यक्त करत असतात तसा तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्या प्रतिक्रिया नकारात्मक असल्या तरी त्यांच्या मतांचा आदर ठेवला पाहिजे . या नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करुन तुमचं लिखाण सुरु ठेवा उगाचच सोशल मीडियावरुन वाद घालु नका
ब्लॉग कसा लिहावा/तयार करावा
google ची blogger.com - ही साईट तुम्हाला फुकट ब्लॉग लिहिण्याची ऑफर देते
ब्लॉग लिहण्याच्या स्टेप्स
१ www.blogger.com इथे visit करून google च्या account अर्थातच जीमेलने login करावे.
२. लॉगीन झाल्यावर तिथे Dashboard दिसेल. यावर तुमचे किती ब्लॉग्स आहेत, किती लोकांनी त्याला विझिट्स दिल्या,वैगरे माहिती दिसेल.
नवीन ब्लॉग तयार करण्याकरिता New Blog" वर क्लीक करा . त्यानंतर स्क्रिनवर Title आणि Address यांची विचारणा होईल
-- Title म्हणजे तुमच्या ब्लॉगचे नाव दिसेल.
-- Address म्हणजे तुमच्या ब्लॉगचा internet address जो स्थिर राहील. तुम्हाला तो बदलता येणार नाही.तसेच Theme हि तुमच्या ब्लॉगच्या विषयावरून निवडता येईल . आता तुमचा ब्लॉग तयार झालेला आहे
३. आता या ब्लॉगवर नवीन लेख लिहण्याकरिता New Post वर क्लीक करा त्यानंतर एक नवीन पान उघडेल जिथे तुम्ही तुमचा blog लिहू शकाल .
या पेजवर पहिल्या भागात Post Title दिसेल जे तुमच्या blog चे अर्थातच लेखाचे नाव असणार आहे . दुसऱ्या भागात blog formatting चे tools दिसेल जिथे तुम्हाला typing करून तुमचा blog लिहता येईल
४. ब्लॉग लिहीत असतांना लिखाण पूर्ण झालेले नसेल तर "Save" वर क्लीक करून ते सुरक्षित ठेवता येईल. एखादा विषयानुरूप फोटो जोडल्यास ब्लॉग अधिक उठावदार होतो.तो फोटो हि तुम्हाला इथे जोडता येतो .
तसेच ब्लॉग पब्लिश करण्यापूर्वी तो वाचकांना कसा दिसेल हे पडताळून बघण्याकरिता Preview वर क्लीक करा आणि blog पूर्ण लिहून झाल्यावर "Publish" या बटणवर क्लीक करून प्रसिद्ध करा
ऑनलाईन पद्धतीने करा मराठीत टायपिंग
ब्लॉग मराठीत टाईप करण्याकरिता घ्या गुगलचीच मदत
http://www.google.com/intl/mr /inputtools/try/ या वेबसाईटला भेट द्या
इथे इंग्लिश मध्ये टाईप करा ते मराठीत दिसेल ते कॉपी करून ब्लॉगमध्ये पेस्ट करा
ब्लॉगचे वेबसाईटमध्ये रुपांतर ?
वार्षिक काही रक्कम भरून आपल्या ब्लॉगचे आपणास जर वेबसाईटमध्ये रुपांतर करता येते
कसं करणार ब्लॉगचं प्रमोशन ?
ट्विटर, फेसबुक, लिंक्डइन, वर्डप्रेस यासारख्या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचवता येतो. ब्लॉगच्या नावाचा हॅशटॅग करुन
ट्विटर, इन्स्टाग्राम मध्ये तसेच फेसबुकवर वापरण्यात येतो .
=====================================================================================
"सायबर सिटी" ब्लॉग ठरला सर्वोत्कृष्ट ब्लॉग विजेता
पुणे : युथ इंजिनिअर्स फॉर टेकनॉलॉजी अँड एंवीरोन्मेन्ट (YETE ) या तंत्रज्ञान आणि पर्यावरण या क्षेत्रात काम करणाऱ्या देश पातळीवरील काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे
जगभरातल्या मराठी ब्लॉग लेखकांसाठी नुकतीच “टेक्निकल ब्लॉग इंडिया २०१७” ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतातील काश्मीर ते कन्याकुमारी येथील मराठी ब्लॉगर्सनी भाग घेतला होता. नुकतेच ‘’ स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यांत आलेले आहेत.या स्पर्धेला मराठी ब्लॉगर्सकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
यंदा सर्वोत्कृष्ट ब्लॉग विजेत्यांच्या यादीमध्ये प्रा. योगेश हांडगे यांच्या "सायबर सिटी" (http://profyogeshhandge.blogs pot.in) या ब्लॉगचा समावेश आहे.
मोबाइल, सोशल मीडिया, ई-बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग हे आता अनेकांच्या दैनंदिन कामातील नित्याचे शब्द झाले आहेत. ६० टक्के टीनेजर्स आणि युवक, चाळिशी पार केलेले ४० टक्के आणि २० टक्के ज्येष्ठ नागरिक आज वेगवेगळ्या माध्यमांतून ऑनलाइन अॅक्टीव्हिटीशी कनेक्ट आहेत. मात्र, या टेन्कोसॅव्ही असणाऱ्यांना फसविण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय रॅकेट्स कार्यरत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही हा मोठा धोका असू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे.
इंटरनेटवर अनेकांची फसवणूक झाली तरी त्याविषयी अनेकांनी पोलिसांत तक्रारी करण्याची टाळाटाळ केल्याचेही दिसून येते. केवळ इंटरनेटविषयीच्या अज्ञानामुळे अनेकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते.
तक्रार कुठे करायची असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अनेकांमध्ये संभ्रम असतो . हा संभ्रम दूर करण्यासाठी ,सायबर साक्षरता ही मोहीम राबविण्याकरिता तसेच इंटरनेटवापराविषयी पुरेसे ज्ञान नसलेल्यांना ते उपलब्ध करून देण्यासाठी ,
सायबर सुरक्षेचा प्लान आखण्याकरीत जनजागृतीची राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याची गरज असल्याचे जाणवते आणि याचाच एक भाग म्हणून या ब्लॉगची निर्मिती करण्यात आलेली आहे
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने कोणत्या प्रकारे इंटरनेट वापरावे , ऑनलाईन बँकिंग ,शॉपिंग आणि सुरक्षेच्या संबंधित गोष्टींची ओळख या ब्लॉगच्या माध्यमातून होणार आहे .
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)