Thursday, 7 October 2027

लेखक परिचय

लेखक परिचय
प्रा. योगेश अशोकराव हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

शिक्षण 
-जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे 
-एम. टेक.सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग
आर .व्ही.  इंजिनीअरिंग कॉलेज, बंगलोर . 
कर्नाटकच्या विश्वेश्वर्या टेक्नोलॉजिकल विद्यापीठातील संगणक  
(M.Tech SoftwareEngineering) अभ्यासक्रमातील  सुवर्णपदक विजेते आहेत


अभ्यास
1) 'सायबर गुन्हेगारी रोखण्याकरिता उपाय योजना यावर विशेष अभ्यास 
2) डिजिटल इंडिया उपक्रमाचा अभ्यास 
3) कॅशलेस व्यवहारासाठी विविध प्रणालींचा अभ्यास 

लेखन
विविध -मराठी दैनिकांमधून व नियतकालिकांमधून विविध करिअरविषयक लेखन.
तसेच विविध -मराठी दैनिकांमधून व नियतकालिकांमधून सायबर गुन्हेगारीवर जनजागृत्तीवर लेखन 
दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन 
--झकास करिअर्स मार्गदर्शक पुस्तक 
सदस्य
विविध इंजिनिअरिंग संघटनांशी सक्रिय संबंध
कार्य
करिअर मार्गदर्शनासाठी विविध शहरांमध्ये  प्रत्यक्ष काम व लेखन.
कॅशलेस व्यवहार  प्रशिक्षणाचे अनेक कार्यक्रम 
शहरी आणि  ग्रामीण भागातील  आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी  करिअर मार्गदर्शनाचे काम .
विविध महाविद्यालयात  करिअर्ससाठी उपयुक्त अभ्यासक्रम  यावर मार्गदर्शन 
अनेक  वर्तमानपत्राच्या करिअर सदरात लेखन
=======================================================================================
ब्लॉग कशासाठी आणि कुणासाठी ?
मोबाइल, सोशल मीडिया, ई-बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग हे आता अनेकांच्या दैनंदिन कामातील नित्याचे शब्द झाले आहेत. ६० टक्के टीनेजर्स आणि युवक, चाळिशी पार केलेले ४० टक्के आणि २० टक्के ज्येष्ठ नागरिक आज वेगवेगळ्या माध्यमांतून ऑनलाइन अॅक्टीव्हिटीशी कनेक्ट आहेत. मात्र, या टेन्कोसॅव्ही असणाऱ्यांना फसविण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय रॅकेट्स कार्यरत  आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही हा मोठा धोका असू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. 
इंटरनेटवर अनेकांची फसवणूक झाली तरी त्याविषयी अनेकांनी पोलिसांत तक्रारी करण्याची टाळाटाळ केल्याचेही दिसून येते. केवळ इंटरनेटविषयीच्या अज्ञानामुळे अनेकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते.
तक्रार कुठे करायची असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अनेकांमध्ये संभ्रम असतो  . हा संभ्रम दूर करण्यासाठीच  आम्ही प्रयत्नशील आहोत.
सायबर साक्षरता ही मोहीम आम्ही राबवित असून इंटरनेटवापराविषयी पुरेसे ज्ञान नसलेल्यांना ते उपलब्ध करू दिले जाणार आहे. 
त्यामुळे याबाबत सायबर सुरक्षेचा प्लान आखण्याकरीत जनजागृतीची राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याची  गरज असल्याचे जाणवते आणि याचाच एक भाग म्हणून या ब्लॉगची निर्मिती करण्यात आलेली  आहे  
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने कोणत्या प्रकारे इंटरनेट वापरावे , ऑनलाईन बँकिंग ,शॉपिंग आणि सुरक्षेच्या संबंधित  गोष्टींची ओळख या ब्लॉगच्या माध्यमातून होणार आहे . 
सोशिअल मीडियाचा  गैरवापर सध्या वाढत आहे. ब्लॅकमेकिंग ,एखाद्याला धमकाविणे,अश्लीलता पसरविणे,  आर्थिक व भावनिक फसवणूक करणे आदी गैरवापर समाज सोशिअल मीडियाचाद्वारे केले जातात. प्रकार थांबविण्यासाठी लोकांमध्ये सायबर जनजाग्रुती करण्यासाठी या ब्लॉगचं उपयोग होणार आहे 

=========================================================================सूचना: या ब्लॉगवरील विविध पोस्टसाठी मराठी वर्तमानपत्रातील तंत्रज्ञानाच्या बातम्यांचा आणि काही तंत्रज्ञानावरील लेखांचा तसेच मराठी न्युज चॅनेल वरील तंत्रज्ञानाच्या बातम्यांचा आधार /संदर्भ घेण्यात आलेला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी 

संपर्क
Prof.Yogesh Handge
Assistant Professor
Computer Engineering
P
une Institute of Computer Technology,
Pune - 411043

Mob :: +91-9423077963
💐http://profyogeshhandge.blogspot.in💐
जग खूप सुंदर आहे .. आभार देवाचे !

मोबाईल न  9423077963





No comments:

Post a Comment