व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजमुळे "मॉब लिंचिंग"सारखे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना
फेक न्यूजना, अफवांना नियंत्रणात आणण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि पोलिसमामा पुढे सरसावले ...व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!
व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागल्याच्या घटना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह देशभर पाहायला मिळाल्या आहेत. अफवांमुळे जमावाकडून हत्या होण्याचं लोण आता देशभर पसरलं आहे. देशातील 10 राज्यांत एकूण 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्हात अलिकडेच मुलं पळवल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांचा बळी घेतला होता.
त्यामुळे अशा फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी सरकारही पुढे सरसावलं आहे.फेक न्यूजवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाय योजना करण्याच्या सूचना केंद्र सरकारने फेसबूक, व्हॉट्सअॅप, यूट्युब, ट्विटर या कंपन्यांना केल्या आहेत . केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवं फीचर आणण्याचं आश्वासन दिलं आहे. व्हॉट्सअॅपने आयटी विभाग आणि गृह विभागासोबत विश्वासात राहून अशा अफवा रोखण्यासाठी काम करावे, असं आवाहनही रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअपला केले.
व्हॉट्सअॅपद्वारे खोटी माहिती पसरवून लोकांना चुकीच्या सूचना दिल्या जात आहेत. यामुळेच केंद्र सरकाने व्हॉट्सअॅपला हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा आदेश दिला होता
फेक न्यूजना नियंत्रणात आणण्यासाठी व्हॉट्सअॅप सरसावले आहे
भारतीय युझर्स व्हॉट्सअॅपवर एकावेळी पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाही ...
जगभरात व्हॉट्सअॅपचे 100 कोटी युझर्स आहेत, त्यापैकी 20 कोटी एकट्या भारतात आहेत.दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतातील लोक मेसेज, व्हिडीओ किंवा फोटो जास्त फॉरवर्ड करतात. मागील काही दिवसात फेक न्यूजचा वेगाने प्रसार झाल्याने देशात हत्येसह हिंसेची,मॉब लिंचिंगच्या अनेकघटना घडल्या होत्या . व्हॉट्सअॅपवरील फेक न्यूज प्रकरणी भारत सरकारनेही कंपनीला नोटीस पाठवलेली आहे . सरकारने व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवून बनावट आणि चुकीच्या मेसेजचा प्रसार रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यास सांगितलं होतं. अफवांच्या प्रसारात माध्यमही दोषी समजलं जाईल आणि यावर उपाय केला नाही तर तुम्हालाही कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशाराही सरकारने दिला आहे.
बॅड एलिमेंट्सद्वारे देशात दंगली घडविण्यासाठी ,शांतता भंग करण्याकरिता फेक न्यूज पसरवल्या जातात तेव्हा माध्यमही जबाबदार असतं असं माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं होतं. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत व्हॉट्सअॅपला योग्य उपाय करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार व्हॉट्सअॅपनेही नियमावली जारी केली आहे ' त्यामुळे
भारतात राहणाऱ्या युझर्ससाठी व्हॉट्सअॅपने काही बदल केलेले आहेत त्यानुसार
युझर्ससाठी मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!.
म्हणजे युझर्स व्हॉट्सअॅपवर एकावेळी पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाही
मीडिया मेसेजसाठी असलेलय क्विक फॉरवर्ड बटणचाही वापर युझर्स आता करु शकत नाहीत, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. बनावट युझरचा प्रसार रोखण्यासाठी कंपनीने हे पावले उचलले आहे
'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन'
wabetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार फेक न्यूज नियंत्रणात आणण्यासाठी 'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन' नावाचं फिचर व्हॉट्सअॅप देणार . या नव्या फीचरने युजरला व्हॉट्सअॅपवरील मेसेज फेक आहे की नाही याची पडताळणी करता येईल
या नवीन फीचर बद्दल !
'सस्पिशिअस लिंक डिटेक्शन' फीचरद्वारे युजरला एखादी लिंक आल्यास त्यां लिंकमध्ये काही संशयास्पद कंटेंट आहे का? ती फेक आहे का? याची खातरजमा व्हॉट्सअपकडून केली जाणार आहे.आणि जर लिंक संशयास्पद किंवा धोकादायक असेल तर लिंकवर लाल रंगाचा धोक्याचा इशारा देण्यात येईल . या धोक्याकडे दुर्लक्ष करत युजरने ही लिंक ओपन केल्यास युजर सर्वस्वी त्याला जबाबदार असणार आहे.
व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनच्या अधिकारात वाढ होणार
सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणते मेसेजेस पाठवले जाणार, हे आता अॅडमिन ठरवणार आहे .
व्हॉट्सअपच्या नव्या फीचरमुळे यापुढे अॅडमिनच्या परवानगीशिवाय मेम्बर्स ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवू शकत नाहीत.
कुठल्या मोबाईलमध्ये आहे हे नवीन फिचर
हे नवं फीचर सध्या अँड्रॉईड बीटा 2.18.201 व्हर्जन आणि आयफोनच्या 2.18.70 या व्हर्जनमध्ये देण्यात आलं आहे.
आयवोएसच्या स्टेबल व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर अँड्रॉईड आणि विन्डोजमध्ये उपलब्ध होणार आहे.
कसे आहे फिचर ?
ग्रुप सेटिंगमध्ये अॅडमिनला हे फीचर उपलब्ध असेल. सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने अॅडमिनला ग्रुपमध्ये पाठवल्या जाणाऱ्या मेसेजेसवर कंट्रोल ठेवता येणार आहे.
कारण ग्रुपमध्ये अनेकदा वादग्रस्त मेसेजेस पाठवले जातात. काही मेसेजेसमुळे अशांतता पसरण्याचीही शक्यता असते. यावरच उपाय म्हणून व्हॉट्सअपने हे फीचर आणलं आहे.
या फीचरच्या माध्यमातून ग्रुप चॅटिंग अधिक चांगली व्हावी, असा व्हॉट्सअपचा हेतू आहे.
व्हॉट्सॅप ग्रुप अॅडमिनसाठी खास 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' फीचर येणार
व्हॉट्सअॅपवरील ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी वादग्रस्त पोस्ट शेअर करतो आणि त्याचा परिणाम ग्रुप अॅडमिनला भोगाव्य लागल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत
आता व्हॉट्सअॅपने 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर आणणार आहे . सध्या प्रयोगिक अवस्थेतील हे फीचर लवकरच अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.
ग्रुपमधील कुणीतरी सदस्य काहीतरी उपद्व्याप करतो , वादग्रस्त पोस्ट शेअर करतो त्याचा परिणाम ग्रुप अॅडमिनलाही भोगावा लागतो. त्यामुळे अनेकजण ग्रुप तयार करणे टाळतात. तसेच अनेक ग्रुपमध्ये वादग्रस्त काही शेअर होत नसले, तरी देखील काही ना काही फालतू खऱ्या खोट्या बातम्या ,पोस्ट, फोटो, व्हिडीओ काही सदस्य शेअर करत असतात. या साऱ्या गोष्टींना कंटाळूनच अनेकजण ग्रुपला राम राम करतात ,ग्रुप सोडतात . हे टाळण्याकरिता व्हॉट्सअॅपने , त्यासंबंधित नवे फीचर आणले आहे.
'रिस्ट्रिक्ट ग्रुप'
व्हॉट्सअॅपच्या 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' फीचरमुळे ग्रुप अॅडमिनला काही विशेष अधिकार मिळणार आहेत.
- या फीचरमुळे ग्रुपमध्ये वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या सदस्याला 'रिस्ट्रिक्ट' करता येईल. असे केल्याने संबंधित सदस्य ग्रुपमधील इतर सदस्यांच्या पोस्ट वाचू शकतो, पाहू शकतो, मात्र स्वत: काही पोस्ट शेअर करु शकत नाही.
- हे फीचर ग्रुपच्या सेटिंगमध्ये जाऊन ते वापरता येईल.
- दरम्यान, ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या किंवा खोऱ्याने पोस्ट टाकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे.
- 'रिस्ट्रिक्ट ग्रुप' हे फीचर ज्यावेळी प्रत्यक्षात येईल, तेव्हा ग्रुप अॅडमिन खऱ्या अर्थाने ग्रुप चालवताना सुटकेचा श्वास घेईल.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसमामांची करडी नजर
महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जगभरात व्हॉट्सॅप यूजर्सची संख्या 150 कोटींच्या घरात आहे. त्यातले तब्बल 20 कोटी ग्राहक हे भारतातले आहेत...
देशात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी सर्वाधिक आहे प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅपवर असंख्य ग्रुप असतात. शाळेचे, कॉलेजचे, कार्यालयातले, मित्रांचे असे प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप. आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आणखी एक जण अॅड होणार आहे. तो आहे पोलिसमामा.
व्हॉट्सअॅपवरुन अविचारी फॉरवर्ड्स. कोणतीही शहानिशा न करता मेसेज सेकंदात फॉरवर्ड होनारे मेसेजस यामुळे महाराष्ट्रात अफवांचं पीक गाजर गवतासारखं पसरलं आहे म्हणूनच
महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आता पोलिसमामाच आपल्या ग्रुपमध्ये असल्यावर ग्रुपवर जो अफवा पसरवेल... त्याची खैर नाही.
@ प्रा योगेश अशोक हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)
NJ Casino Has 30 Years of Online Gambling in the NJ
ReplyDeleteAnd 성남 출장안마 they're 경산 출장마사지 on track to 수원 출장마사지 make more than 부천 출장마사지 30 사천 출장안마 billion wagers on gambling. In 2020, the casino launched its online-gaming app, the latest in