Monday, 13 November 2017

पुणे शहरात मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम मोहिमेला सुरुवात झाली

पुणे शहरात मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम मोहिमेला सुरुवात झाली
पुणे  : सायबर क्राईमचं वाढतं प्रमाण वेळीच रोखण्यासाठी युथ इंजिनिअर्स फॉर सायबर सेक्युरिटी अँड अवेरन्स  या देशपातळीवर सायबर सुरक्षतेसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे शहरात मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम या मोहिमेला सुरुवात झाली आहे . 
नुकतीच लव्हाळे फाटा ,पिरंगुट  येथे या संस्थेची बैठक झाली यावेळी उपस्थित अभियंता सभासदांनी 
" जो पर्यंत सायबर क्राईमला संपूर्ण नाहीसे करणार नाही तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही " अशी शपथ घेतली 
यावेळी  मोहिमेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सायबर तज्ज्ञ प्रा. योगेश हांडगे  यांनी  माहिती दिली कि ,सायबर क्राईमचं वाढतं प्रमाण वेळीच रोखण्यासाठी हि मोहीम  सुरु करण्यात आलीय 
याविषयी अधिक माहिती देतांना प्रा.  हांडगे म्हणाले कि ,
आपण आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी सायबर क्षेत्रावर अधिकाधिक अवलंबून राहू लागलो आहोत, तसे आपण स्वतःच स्वतःला सायबर  गुन्हेगारांच्या ताब्यात देऊ लागलो आहोत.
मोबाइल, सोशल मीडिया, ई-बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग हे आता अनेकांच्या दैनंदिन कामातील नित्याचे शब्द झाले आहेत. ६० टक्के टीनेजर्स आणि युवक, चाळिशी पार केलेले ४० टक्के आणि २० टक्के ज्येष्ठ नागरिक आज वेगवेगळ्या माध्यमांतून ऑनलाइन अॅक्टीव्हिटीशी कनेक्ट आहेत. मात्र, या टेन्कोसॅव्ही असणाऱ्यांना फसविण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय रॅकेट्स कार्यरत  आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही हा मोठा धोका असू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. 
इंटरनेटवर अनेकांची फसवणूक झाली तरी त्याविषयी अनेकांनी पोलिसांत तक्रारी करण्याची टाळाटाळ केल्याचेही दिसून येते. केवळ इंटरनेटविषयीच्या अज्ञानामुळे अनेकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते.
तक्रार कुठे करायची असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अनेकांमध्ये संभ्रम असतो  . हा संभ्रम दूर करण्यासाठीच  या मिशनचा उपयोग होणार आहे .
 या मिशन मधील सायबर साक्षरता भागात इंटरनेटवापराविषयी पुरेसे ज्ञान नसलेल्यांना  ते  उपलब्ध करू दिले जाणार आहे. 
त्यामुळे याबाबत सायबर सुरक्षेचा प्लान आखण्याकरीत जनजागृतीची राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याची  गरज असल्याचे जाणवते आणि याचाच एक भाग म्हणून मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम या मोहिमेची सुरुवात केलेली आहे   
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने कोणत्या प्रकारे इंटरनेट वापरावे , ऑनलाईन बँकिंग ,शॉपिंग आणि सुरक्षेच्या संबंधित  गोष्टींची ओळख या मोहिमेच्या  माध्यमातून होणार आहे . 
सोशिअल मीडियाचा  गैरवापर सध्या वाढत आहे. ब्लॅकमेकिंग ,एखाद्याला धमकाविणे,अश्लीलता पसरविणे,  आर्थिक व भावनिक फसवणूक करणे आदी गैरवापर समाज सोशिअल मीडियाचाद्वारे केले जातात. प्रकार थांबविण्यासाठी लोकांमध्ये सायबर जनजाग्रुती करण्यासाठी या मोहिमेचा  उपयोग होणार आहे

Saturday, 11 November 2017

बनावट व्हॉट्सअॅप पासून सावध राहा




बनावट व्हॉट्सअॅप पासून सावध राहा 
जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप असलेल्या व्हॉटसअप वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने कम्प्युटरऐवजी आता मोबाइलवरून  अॅटक होत आहेत  त्यासाठी वेगवेगळी शक्कल सायबर भामटे लढवत आहेत . मागे  व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले होते आता तर सायबर भामट्यांनी व्हॉट्सअॅपचं एक बनावट व्हर्जन तयार केल आहे . अॅप डेव्हलपरने गुगल सिक्युरिटीला भेदून . हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसणाऱ्या बनावट  अॅपची निर्मिती केलेली आहे आणि ते प्ले स्टोअरउपलब्ध केलेलं आहे 
आणि ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे तेव्हा व्हॉटसअप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करतांना काळजी घ्या ! कारण हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणे हे बनावट अॅप दिसते  त्यामुळे  अनेक युझर्स हेच अॅप डाऊनलोड करतात .
हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसरे हे  अॅप10 लाख युझर्सने हेच अॅप डाऊनलोड केलेल  आहे .
फसवणूक टाळण्याकरिता तुम्हीही तुमचं अॅप बनावट आहे, की खरं हे तातडीने तपासून पाहा.
कशी होते ग्राहकांची दिशाभूल ! 

- बनावट अॅपचे  नावही हुबेहूब असंल्यामुळे 
- हॅकर्सने युनिकोडचा वापर करुन हुबेहूब नावं दिलं आहे 
- गुगल प्ले स्टोअरवर ''Update WhatsApp Messenger'' या नावाने हे अॅप उपलब्ध आहे आणि  ते 'WhatsApp Inc' ने विकसित केलं आहे, असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे
काय आहे या बनावट अॅपचा धोका 
व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीनुसार तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि एकूण गोपनीय माहिती तुमच्या व्यतिरिक्त कुणीही पाहू शकत नाही. मात्र या बनावट अॅपच्या माध्यमातून तुमच्या फाईल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो
- हे बनावट अॅप डाऊनलोड केल्यास फोनमधील माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे. 
- एखाद्या यूजरची बदनामीही केली जाऊ शकते
कसा  उघडकीस आला हा प्रकार 
 एका ट्विटर यूजरच्या माध्यमातून WABetaInfo या व्हॉट्सअॅप ट्रॅकिंग वेबसाइटने  या बनावट अॅपची माहिती  दिली आणि हे  बोगस अॅप डाऊनलोड करू नये  याचे  आवाहनही  केलेले आहे . या गंभीर समस्येकडे गुगलनेही पाहण्याची गरज आहे.
लेखक : प्रा योगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

Friday, 3 November 2017

जीमेल अकाऊंट हॅक झालेय हे कसे ओळखावे ?

जीमेल अकाऊंट हॅक झालेय हे कसे ओळखावे ?
आजच्या काळात इमेल्स   अकाऊंटस हॅक होण्याचे चे प्रमाण बरेच वाढले आहे. 
अगदी  वैयक्तिक अकाऊंटस ते मोठ्यामोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे अकाऊंटस हॅक  करून त्यांची वैयक्तिक \ गोपनीय माहिती चोरून गैरप्रकार वाढत आहेत .इमेल्स युजर्सना खबरही न लागू देता त्यांचे अकाऊंटस हॅक करण्याचे प्रकार हॅकर्स करत आहेत 

 जीमेलने त्यांच्या   युजर्सना बऱ्याचशा  सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याद्वारे  तुम्ही तुमचे जीमेल अकाऊंट हॅक झाले आहे का ?आपल्या व्यतिरीक्त कुणी दुसरे वापरत आहे  का ? आणि ती व्यक्ती कितीवेळा आणि कधी आपले अकाऊंट वापरात आहे . हे तपासून बघू शकतो 
कसे तपासावे ?
>जीमेल ओपन केल्यावर दिसणाऱ्या विंडो च्या खाली उजव्या बाजूला Details(डिटेल्स )असे लिहिलेले दिसून येईल . त्यावर जर क्लिक केल्यावर  एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये अलीकडील १० वेब सत्राचा टेबल दिसेल त्यात कोणत्या वेब ब्राऊसरवरुन किथाळ्या आय पी अड्रेसवरून कुठल्यावेळी  तुमचा जीमेल वापरला गेला आहे, याची संपूर्ण  माहिती मिळेल. 
आणि विंडोच्या वरच्या बाजूला ‘साईन आऊट फ्रॉम ऑल अदर सेशन्स’ असा पर्याय असेल त्यावर क्लिक करून  तुम्हाला  इतर ठिकाणी सुरु असलेले जीमेल लॉगऑऊट येईल . तसेच  संशयास्पद वाटणाऱ्या क्रिया या लाल शब्दांमध्ये दर्शविल्या जातील त्यानंतर  तुम्ही तुमच्या जीमेलच्या पासवर्डमध्ये  इथे बदल करू शकता

****
Access Type [ ? ]
(Browser, mobile, POP3, etc.)
Location (IP address) [ ? ]Date/Time
(Displayed in your time zone)

लेखक : प्रा योगेश अशोक हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)