Monday, 13 November 2017

पुणे शहरात मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम मोहिमेला सुरुवात झाली

पुणे शहरात मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम मोहिमेला सुरुवात झाली
पुणे  : सायबर क्राईमचं वाढतं प्रमाण वेळीच रोखण्यासाठी युथ इंजिनिअर्स फॉर सायबर सेक्युरिटी अँड अवेरन्स  या देशपातळीवर सायबर सुरक्षतेसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे शहरात मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम या मोहिमेला सुरुवात झाली आहे . 
नुकतीच लव्हाळे फाटा ,पिरंगुट  येथे या संस्थेची बैठक झाली यावेळी उपस्थित अभियंता सभासदांनी 
" जो पर्यंत सायबर क्राईमला संपूर्ण नाहीसे करणार नाही तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही " अशी शपथ घेतली 
यावेळी  मोहिमेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सायबर तज्ज्ञ प्रा. योगेश हांडगे  यांनी  माहिती दिली कि ,सायबर क्राईमचं वाढतं प्रमाण वेळीच रोखण्यासाठी हि मोहीम  सुरु करण्यात आलीय 
याविषयी अधिक माहिती देतांना प्रा.  हांडगे म्हणाले कि ,
आपण आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी सायबर क्षेत्रावर अधिकाधिक अवलंबून राहू लागलो आहोत, तसे आपण स्वतःच स्वतःला सायबर  गुन्हेगारांच्या ताब्यात देऊ लागलो आहोत.
मोबाइल, सोशल मीडिया, ई-बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग हे आता अनेकांच्या दैनंदिन कामातील नित्याचे शब्द झाले आहेत. ६० टक्के टीनेजर्स आणि युवक, चाळिशी पार केलेले ४० टक्के आणि २० टक्के ज्येष्ठ नागरिक आज वेगवेगळ्या माध्यमांतून ऑनलाइन अॅक्टीव्हिटीशी कनेक्ट आहेत. मात्र, या टेन्कोसॅव्ही असणाऱ्यांना फसविण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय रॅकेट्स कार्यरत  आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही हा मोठा धोका असू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. 
इंटरनेटवर अनेकांची फसवणूक झाली तरी त्याविषयी अनेकांनी पोलिसांत तक्रारी करण्याची टाळाटाळ केल्याचेही दिसून येते. केवळ इंटरनेटविषयीच्या अज्ञानामुळे अनेकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते.
तक्रार कुठे करायची असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अनेकांमध्ये संभ्रम असतो  . हा संभ्रम दूर करण्यासाठीच  या मिशनचा उपयोग होणार आहे .
 या मिशन मधील सायबर साक्षरता भागात इंटरनेटवापराविषयी पुरेसे ज्ञान नसलेल्यांना  ते  उपलब्ध करू दिले जाणार आहे. 
त्यामुळे याबाबत सायबर सुरक्षेचा प्लान आखण्याकरीत जनजागृतीची राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याची  गरज असल्याचे जाणवते आणि याचाच एक भाग म्हणून मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम या मोहिमेची सुरुवात केलेली आहे   
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने कोणत्या प्रकारे इंटरनेट वापरावे , ऑनलाईन बँकिंग ,शॉपिंग आणि सुरक्षेच्या संबंधित  गोष्टींची ओळख या मोहिमेच्या  माध्यमातून होणार आहे . 
सोशिअल मीडियाचा  गैरवापर सध्या वाढत आहे. ब्लॅकमेकिंग ,एखाद्याला धमकाविणे,अश्लीलता पसरविणे,  आर्थिक व भावनिक फसवणूक करणे आदी गैरवापर समाज सोशिअल मीडियाचाद्वारे केले जातात. प्रकार थांबविण्यासाठी लोकांमध्ये सायबर जनजाग्रुती करण्यासाठी या मोहिमेचा  उपयोग होणार आहे

No comments:

Post a Comment