आयफोन च्या फोटो अॅप मेटाडेटा आणि रेकग्निशन फीचरमुळे आयफोन यूजर्समध्ये गोंधळ :
मुलींचे क्लीवेज फोटो स्टोर करतो "आयफोन "?
स्टेटस सिम्बॉल असलेला अॅपलचा आयफोनचे अनेक खास फीचर्स आणि कॅमेरॅची क्लिअॅरिटी याने तरुणाईला भुरळ घातलेली आहे त्यामुळे तो महागडा आयफोन आपल्याकडेही असावा असे प्रत्येकालाच वाट आहे बरेच हौशी टेक्नोसॅव्हीं हा महागडा फोन आर्थिक तडजोड करून ईएमआयवर विकत घेण्याच्या विचारात असतात . परंतु आता iPhone X च्या संबंधित एका बातमीने जगभरातील लाखो मुलींची झोप उडवली आहे. कारणही तसेच आहे.
आयफोन मुलींचे क्लीवेज फोटो स्टोर करतो ?
एका यूजरने ट्विटमध्ये म्हटले आहे कि,
गेल्या एक वर्षापासून अॅपल महिलांचे सेक्सी फोटो आपल्या डाटाबेसमध्ये सेव्ह करतंय.
या संबंधित बातमीनुसार एली नावाच्या एका यूजरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपल्या आयफोनच्या फोटो अॅपमध्ये जाऊन आपण brassiere टाईप करा. तुम्हाला फोनमधील संपूर्ण कलेक्शन पहायला मिळेल. ज्यात आपली आतापर्यंत टीपलेली क्लीवेज छायाचित्रे म्हणजेच मुलींच्या छातीच्या भागाचे काढलेले फोटो पहायला मिळतील. या पुढे ट्विट करून एलीने म्हटले आहे की
'मुलींनो सावध व्हा! आपल्या आयफोनमधील फोटो अॅपमध्ये जावून brassiere टाइप करा. कारण अॅपल हे फोटो सेव्ह करतंय?'
एलीच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विट करून अनेक iPhone X युजर्सने सांगितलेला प्रयोग करून बघितला आणि त्यांनाही एलीसारखाच अनुभव आला आणि त्यांनी अॅपलवर नाराजी व्यक्त केली आहे.
एलीप्रमाणेच क्रिस्टीन नावाच्या एका iPhone युजरने देखील याच प्रकारचं एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर करून एलीच्या ट्विटला दुजोरा दिला आणि तो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
आयफोन मुलींचे क्लीवेज फोटो स्टोर करण्याची बातमी पूर्णतः चुकीची !
परंतु एका वेबसाइटच्या वृत्तानुसार आयफोन मुलींचे क्लीवेज फोटो स्टोर करण्याची बातमी पूर्णतः चुकीची असलल्याचे म्हटलं आहे.
या वेबसाइटच्या म्हणण्यानुसार २०१६ मध्ये iOS 10 सोबत लाँच झालेलय आयफोनच्या फोटो अॅप मेटाडेटा आणि रेकग्निशन फीचरमुळे आयफोन यूजर्समध्ये गोंधळ उडालेला आहे . तर जाणून घेऊ या आयफोनच्या फिचर बद्दल
अॅपलचे फोटो अॅप हे मेटाडेटा आणि इमेज रेकिग्नेशन फीचर :
अॅपलचे फोटो अॅप हे मेटाडेटा आणि इमेज रेकिग्नेशन फीचर हे फोटो संपादन ऍप्लिकेशन्स आहे याचा उपयोग करून त्यांना एक टॅग देतं. यामुळे एक सारख्या फोटोंचा संग्रह एका ठिकाणी तयार होतो येतात. हे फोटो फक्त तुमच्या आयफोनपर्यंतच मर्यादित राहतात.
आयफोनमध्ये स्टोर असलेल्या सानुकूल अनुप्रयोगांचा संग्रह चांगला आहे. या फिचर द्वारे अॅपल छायाचित्रे सेव्ह करत नाही. फक्त तुमचे फोटो तो एका ठिकाणी जमा करतो.एकसारखी दिसणारी छायाचित्रे एकाच ठिकाणी डिवाईसवर जमा होतात . अॅपल ती सेव्ह करून स्वत:कडे घेत नाही.
परंतु अॅपलबाबतच्या या फीचरच्या सोशल मीडियावरील चूकीच्या माहितीमुळे आयफोन यूजर्सच्या गोंधळात भर पडली आहे.
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

No comments:
Post a Comment