Wednesday, 6 December 2017

सायबरयुद्ध : चीनकडून भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांचा डेटा चोरी

सायबरयुद्ध : चीनकडून भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांचा डेटा चोरी

युद्ध हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवं, असं थोडंच आहे. कारण युद्धाची पद्धत  बदलली आहे . युद्धे आता कुठही होतात,  त्याचं ठिकाण व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग असू शकत आणि  हे विश्व आहे, इंटरनेटचं…आणि चीनने याच युद्धाला सुरुवात केलेली आहे तेव्हा सावध रहा !

हल्लीचे जग हे इंटर्नेट सॅव्ही झालेले आहे आणि बरेचसे महत्वाचे व्यवहार हे इंटरनेट वर होतात म्हणून हे व्यवहार करतांना काळजी घेतली पाहिजे . 
विचार करा जर  ,एखादी ऑनलाइन एयर इंडिया किंवा  इंडियन रेल्वे ची वेब साइट हॅक झाली .....?  सगळ्या क्रेडीट कार्ड्स ची,डेबिट कार्डचे  डीटेल्स, वैयक्तिक माहिती इत्त्यादी वर शत्रू राष्ट्राचा ताबा जाइल.
आणि जर कधी बँकिंग क्षेत्रात जर असा हल्ला झाला तर कुठल्याही देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील 
रक्तपात न करता सायबर युद्ध करता येते . चीनकडून संगणकाचा ,मोबाईल अॅपचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे भविष्यतील युद्ध  चीन सायबरमधून लढले अशी शक्यता व्यक्त केली जात आहे 
आयबीकडून  या गुप्त एनजन्सीकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार चीनने देशात तयार झालेल्या मोबाईल अॅपला भारताविरोधात छुपे युद्धासाठी अस्त्र बनवलं आहे. मोबाईल अॅपच्या  माध्यमातून भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांचा डेटा चोरी केला जात असल्याची माहिती गुप्त एनजन्सीकडून प्राप्त झालेली आहे . भारताविरोधात नवीन षडयंत्र रचण्याकरीता चीन UC ब्राउजर, शेअर-इट, ट्रूकॉलर, क्लीन मास्टरसारख्या  मोबाईल अॅपचा वापर करून त्याद्वारे  भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांची गुप्त माहिती चीनच्या सर्व्हरवर संकलित केली जात आहे
देशाच्या सुरक्षिततेसाठी काही  अॅप्स धोकादायक असल्याचे सांगून लगेच हटवण्याचे आदेश गुप्त एजन्सीने भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांना  दिले आहेत.  या अॅप्समुळे  सायबर अटॅक होऊ शकतात तसेच अॅप्सद्वारे डाटा आणि अन्य माहिती हॅक केली जाऊ शकते. 
सुरक्षा दलांने मोबाईलमधील चीनी अॅप्स अनइंस्टॉल करण्याचे दिले आदेश 
चीनी अॅप्स अनइंस्टॉल करण्याचे  आदेश भारतीय सुरक्षा एजन्सींकडून  लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांना  दिले आहेत. कारण  चीन यामार्फत डेटा चोरत असल्याची शंका आहे. त्याकरिता सुरक्षितेसाठी चीनी सीमेच्या बॉर्डरवर तैनात असलेल्या जवानांना स्मार्टफोनमधून , विबो, यूसी ब्राऊजर ,यूसी न्यूज आणि  वीचॅट, ट्रूकॉलर हे अॅप्स हटवण्यास सांगितले आहेत. 
खतरनाक अॅप्सची यादी
आयबीकडून  खतरनाक अॅप्सची जी यादी जाहीर झाली  आहे. त्यामध्ये 
वायरलल क्लीनर हाई सिक्युरिटी लॅब, सीएम ब्राऊसर, बॅडू ट्रांसलेट, बॅडू एप, वंडर कॅमरा, ईएस फाइल एक्सप्लोरर, डयू रिकॉर्डर, वाल्ट हाइड, यूकॅम मेकअप, एमआय स्टोर,  वीबो, वीचॅट, शेअरइट, ट्रूकॉलर,फोटो वंडर, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू म्यूजिक, क्यूक्यू मेल, क्यूक्यू प्लेयर,एमआय कम्युनिटी, कॅचक्लीनर डयू एप्स, डयू बैटरी सेवर,क्यूक्यू न्यूजफीड, क्यूक्यू सिक्युरिटी, सेल्फी सिटी, मेल मास्टर, एमआय व्हिडियो कॉल आणि क्यूक्यू लांचर,यूसी न्यूज, यूसी ब्राऊजर, ब्यूटी प्लस, न्यूजडोग, वीवा व्हिडिओ, क्यू व्हिडिओ, आयएनसी, पॅरालल स्पेस, अपुस ब्राऊजर, परफेक्ट कार्प,डयू क्लीनर, डयू प्राइवसी, 360 सिक्युरिटी, डयू ब्राउसर, क्लीन मास्टर-चीता मोबाइल, 
आदी अॅप्सचा समावेश आहे 
सायबरयुद्धाचा   प्रतिकार 
-  स्पॅम मेल, फसवे मेल यावर डबल क्लिक करुन उघडण्याचा प्रयत्न करु नये. अशा मेल मधून व्हायरसची एक्झीक्युटेबल फाईल आपल्या नकळत डाऊन लोड होते. आपण जेव्हा संगणकावर काम करतो तेव्हा केलेल्या कामाची एक डुप्लीकेट फाईल तयार होऊन ती हार्ड डिक्सवर सेव्ह होते. जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो तेव्हा अलगदपणे ही माहिती हॅकरला मेल व्दारे प्राप्त होते. .त्यामुळे  फसगत टाळण्यासाठी अशा प्रकारचे फसवे मेल डीलीट करावे आपली संगणक सिस्टीम ऍन्टी व्हायरस, फायर वॉलने सुरक्षित ठेवावी.
-वाय फाय कनेक्शनबाबत देखील सुरक्षित वापर महत्वाचा आहे.
-सुरक्षितता,सावधगिरी बाळगून इंटरनेटचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
भारतात तयार होणा-या संगणकतज्ज्ञांना काही वर्ष देशात राहून सेवा करायला हवी. 
आज भारतासमोर  ‘सायबर युद्धाचे  ’चं भयावह संकट उभं आहे भारताने लक्षात घेतले पाहिजे आणि तातडीने त्यावर उपाय योजना केल्या पाहिजे .
सायबर क्षेत्रात दक्षिण कोरियासारखे छोटे देशही आपल्यापेक्षा प्रगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. सायबरमध्ये चीनची भीती अमेरिकेला आहे. म्हणून भारताने अमेरिकेबरोबर सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. 
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
mobile: 9423077963

No comments:

Post a Comment