Wednesday, 6 December 2017

फेसबुकचे अकॉउंट हॅक होत आहेत काळजी घ्या !

फेसबुकचे  अकॉउंट  हॅक  होत आहेत काळजी घ्या !
फेसबुक’ने आपल्या सर्वांचेच आयुष्य व्यापून टाकलेले आहे. कित्येक लोक  दिवसभर  फेसबुकवर पडीक असतात. सोशल मीडियामुळे जग जवळ आले तरी त्याचा जपून वापर करायाला हवा कारण काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करून कुणाची बदनामी करायलाही मागेपुढे पहात नाही.  सावध राहा  फेसबुक हॅकिंगचे प्रमाण वाढलेले आहे .  फेसबुकचे बनावट अकाऊंट बनवून महिला मित्रांना अश्लील मॅसेज केल्याची घटना घडत आहेत . 
फेसबुक वापरकर्त्यांची फेसबुक अकाउंट दोन  पद्धतीने हॅक होतात 

१फिशिंग: यामध्ये  हॅकर्स फेसबुकच्या लॉगिन पेज सारखे दिसणारे फेक लॉगिन पेज बनवतात. याच्या नंतर हॅकर्स  त्या व्यक्तीच्या  इमेल वर  खोट्या पेजची लिंक पाठतो  किंवा माहितीतल्या व्यक्तीला  स्वतः:चा  मोबाईल फेसबुकसाठी  वापरण्यास देतात  आणि जेव्हा ती   व्यक्ती आपला लॉगीन आयडी व पासवर्ड त्या फेक  पेजवर टाईप करते तेव्हा त्याचा ईमेल पत्ता आणि पासवर्ड वर मिळतो   हॅकर वापरकर्त्याच्या फेसबुक अकाउंट हॅक करतो.
फिशिंगचा वापर करून गोपनीय माहिती चोरणे हे बेकायदेशीर कृत्य असून सदर कृत्य दंडनीय अपराध आहे.
उदा: https://www.facebook.com  – खरे पेज
http://www.faacebook१.com – फेक पेज असे हे फिशिंग असते 

२Keylogger कि लॉगर: हॅकर्स विविध सॉफ्टवेअर तसेच फोटो यामधून या प्रोग्रॅमचा प्रसार करतात हा   प्रोग्राम यूजरच्या कॉम्प्युटरवर इंस्टॉल झाल्यानंतर   यूजर्सचे सर्व डिटेल्स रिकॉर्ड करतो .  यूजर्सचे हे  डिटेल्स हॅकर्सला  FTP द्वारे/  ईमेल पत्त्यावर पाठविले जातात. 
फेसबुक अकॉउंटच्या हॅकिंगपासून काय काळजी घ्याल ?
फेसबुक लॉगिन केल्यानंतर होमपेजच्या उजव्या बाजूलाअसलेल्या  सेटिंग्जवर क्लिक करा. त्यामध्ये General, Security and Login  , Privacy ,Timeline andTagging असे options असतील . तिथे Security and Login क्लिक केल्यावर Setting Up Extra Security या पर्यायात असणाऱ्या Use two-factor authentication वर क्लीककरून तिथे तुम्व्हा मोबाईल नंबर द्या ज्यावर फेसबुक लॉगिन करतांना एक कोड येईल तो कोड आणि तुमचा फेसबुकचा पासवर्ड हे दोन्हीही वापरूनच तुम्ही फेसबुक लॉगिन करू शकाल 
फेक फेसबुकवरून  मजकूर प्रसारित केल्यास सायबर कायदा काय 
अश्‍लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारतीय दंडविधानाच्या 292 कलमान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या अंतर्गत दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. माहिती तंत्रज्ञानाचे कलम 66 हे संगणकाशी संबंधित गुन्ह्यांसाठी वापरले जाते.  आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल 66 (ए) कलमान्वये तीन वर्ष तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. "आयडेंटीटी थेफ्ट‘ म्हणजे "वैयक्तिक संवेदनशील माहिती‘ची चोरी व गैरवापर केल्याबद्दल 66(सी) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ शकते. 
"प्रायव्हसी‘च्या उल्लंघनाबद्दल 66(इ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित, प्रकाशित केल्याबद्दल 67(ए) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा वर्षे दंडाची शिक्षा होऊ शकते. अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित केल्याबद्दल 67 (बी) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. 



लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment