ओएलएक्स आणि क्विकरच्या स्पर्धेत फेसबुकचे मार्केटप्लेस' फिचर : फेसबुकवरुन होणार खरेदी विक्री
हल्लीची तरुणाई ते अबालवृद्ध सर्रासपने ओएलएक्सवर शॉपिंग करत आहे .
सब
कुछ बिकता है हि ओएलएक्सची जाहिरात फार लोकप्रिय झालीय . या
साइट्सवरबुक्स-स्पोर्ट्स, रिअल इस्टेट, लाइफस्टाइल प्रॉडक्ट्स, फॅशन अँण्ड
ब्युटी, कार-बाइक्स, मोबाइल्स-टॅब्ज इत्यादी कॅटेगरीतले प्रोडक्टस उपलब्ध
आहेत . खरेदी-विक्रीसंदर्भातली माहिती भरून ऑनलाइन पद्धतीने हे व्यवहार
करता येतात त्यामुळे . वेळेची बचत होऊन घरातली जुन्या वस्तूच्या ठिकाणी
नवी येते .
वापरलेल्या वस्तू घेण्यासाठी अथवा जुन्या वस्तू विकण्यासाठी ओएलएक्सचा ऑनलाइन बाजार उपयोगात येतोय .
आता तरुणाईत लोकप्रिय असलेल्या फेसबुकवरुनवरही मुंबईत ट्रायल बेसिसवर सुरु झालेल्या मार्केटप्लेस' फिचरद्वारे
आवडीचे
सामान खरेदी करता येणार आहे तसेच नको असलेले सामान विकताही येणार आहे.
ओएलएक्स आणि क्विकर याप्रमाणे हे फिचर काम करणार आहे. भारतामध्ये फेसबुकचे
हे मार्केटप्लेस' फिचर ओएलएक्सशी स्पर्धा करेल.फेसबुकचे युजर्स जास्त
असल्याने याचा फेसबुकला अधिक फायदा होऊ शकतो.
कसे असेल फेसबुकचे मार्केटप्लेस' फिचर :
या फीचरद्वारे युसर्सला प्रोडक्टसाठी जाहिरात देता येईल तसरच दुसऱ्यांनी दिलेल्या जाहिराती सर्च करता येईल .
मार्केटप्लस हे फिचर अमेरिकेसह २५ देशांमध्ये अस्तित्वात असून जर्मनी, फ्रान्स आणि यूके समवेत १७ देशांमध्ये विकसित झालेले आहे
फेसबुक
अॅप्सच्या खाली तळाला 'शॉप' नावाचा पर्याय उपलब्ध असणार आहे त्यावर
क्लिक करून युसर्सला विकायच्या वस्तूचा फोटो अपलोड करता येईल त्यानंतर
इच्छुक करेदीदार तुमच्यापर्यंत पोहोचू शकेलं .
विविध कॅटगरीत तुम्हाला वस्तू विकत येतील
कंपनीतर्फे
डिलीव्हरीही होणार आहे. पैशांचा व्यवहारासाठी दुसरा कुणी मध्यस्त नसून
व्यवहार थेट फेसबूकशीच होणार असल्याने सर्व्हिस चार्ज म्हणून पैसे कट
होणार नाहीत.
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:
Post a Comment