जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप असलेल्या व्हॉटसअप वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने कम्प्युटरऐवजी आता मोबाइलवरून अॅटक होत आहेत त्यासाठी वेगवेगळी शक्कल सायबर भामटे लढवत आहेत . मागे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले होते आता तर सायबर भामट्यांनी व्हॉट्सअॅपचं एक बनावट व्हर्जन तयार केल आहे . अॅप डेव्हलपरने गुगल सिक्युरिटीला भेदून . हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसणाऱ्या बनावट अॅपची निर्मिती केलेली आहे आणि ते प्ले स्टोअरउपलब्ध केलेलं आहे
आणि ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे तेव्हा व्हॉटसअप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करतांना काळजी घ्या ! कारण हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणे हे बनावट अॅप दिसते त्यामुळे अनेक युझर्स हेच अॅप डाऊनलोड करतात .
हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसरे हे अॅप10 लाख युझर्सने हेच अॅप डाऊनलोड केलेल आहे .
फसवणूक टाळण्याकरिता तुम्हीही तुमचं अॅप बनावट आहे, की खरं हे तातडीने तपासून पाहा.
कशी होते ग्राहकांची दिशाभूल !
- बनावट अॅपचे नावही हुबेहूब असंल्यामुळे
- हॅकर्सने युनिकोडचा वापर करुन हुबेहूब नावं दिलं आहे
- गुगल प्ले स्टोअरवर ''Update WhatsApp Messenger'' या नावाने हे अॅप उपलब्ध आहे आणि ते 'WhatsApp Inc' ने विकसित केलं आहे, असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे
काय आहे या बनावट अॅपचा धोका
व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीनुसार तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि एकूण गोपनीय माहिती तुमच्या व्यतिरिक्त कुणीही पाहू शकत नाही. मात्र या बनावट अॅपच्या माध्यमातून तुमच्या फाईल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो
- हे बनावट अॅप डाऊनलोड केल्यास फोनमधील माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे.
- एखाद्या यूजरची बदनामीही केली जाऊ शकते
कसा उघडकीस आला हा प्रकार
एका ट्विटर यूजरच्या माध्यमातून WABetaInfo या व्हॉट्सअॅप ट्रॅकिंग वेबसाइटने या बनावट अॅपची माहिती दिली आणि हे बोगस अॅप डाऊनलोड करू नये याचे आवाहनही केलेले आहे . या गंभीर समस्येकडे गुगलनेही पाहण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment