Thursday, 7 October 2027

लेखक परिचय

लेखक परिचय
प्रा. योगेश अशोकराव हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

शिक्षण 
-जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे 
-एम. टेक.सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग
आर .व्ही.  इंजिनीअरिंग कॉलेज, बंगलोर . 
कर्नाटकच्या विश्वेश्वर्या टेक्नोलॉजिकल विद्यापीठातील संगणक  
(M.Tech SoftwareEngineering) अभ्यासक्रमातील  सुवर्णपदक विजेते आहेत


अभ्यास
1) 'सायबर गुन्हेगारी रोखण्याकरिता उपाय योजना यावर विशेष अभ्यास 
2) डिजिटल इंडिया उपक्रमाचा अभ्यास 
3) कॅशलेस व्यवहारासाठी विविध प्रणालींचा अभ्यास 

लेखन
विविध -मराठी दैनिकांमधून व नियतकालिकांमधून विविध करिअरविषयक लेखन.
तसेच विविध -मराठी दैनिकांमधून व नियतकालिकांमधून सायबर गुन्हेगारीवर जनजागृत्तीवर लेखन 
दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन 
--झकास करिअर्स मार्गदर्शक पुस्तक 
सदस्य
विविध इंजिनिअरिंग संघटनांशी सक्रिय संबंध
कार्य
करिअर मार्गदर्शनासाठी विविध शहरांमध्ये  प्रत्यक्ष काम व लेखन.
कॅशलेस व्यवहार  प्रशिक्षणाचे अनेक कार्यक्रम 
शहरी आणि  ग्रामीण भागातील  आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी  करिअर मार्गदर्शनाचे काम .
विविध महाविद्यालयात  करिअर्ससाठी उपयुक्त अभ्यासक्रम  यावर मार्गदर्शन 
अनेक  वर्तमानपत्राच्या करिअर सदरात लेखन
=======================================================================================
ब्लॉग कशासाठी आणि कुणासाठी ?
मोबाइल, सोशल मीडिया, ई-बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग हे आता अनेकांच्या दैनंदिन कामातील नित्याचे शब्द झाले आहेत. ६० टक्के टीनेजर्स आणि युवक, चाळिशी पार केलेले ४० टक्के आणि २० टक्के ज्येष्ठ नागरिक आज वेगवेगळ्या माध्यमांतून ऑनलाइन अॅक्टीव्हिटीशी कनेक्ट आहेत. मात्र, या टेन्कोसॅव्ही असणाऱ्यांना फसविण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय रॅकेट्स कार्यरत  आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही हा मोठा धोका असू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. 
इंटरनेटवर अनेकांची फसवणूक झाली तरी त्याविषयी अनेकांनी पोलिसांत तक्रारी करण्याची टाळाटाळ केल्याचेही दिसून येते. केवळ इंटरनेटविषयीच्या अज्ञानामुळे अनेकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते.
तक्रार कुठे करायची असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अनेकांमध्ये संभ्रम असतो  . हा संभ्रम दूर करण्यासाठीच  आम्ही प्रयत्नशील आहोत.
सायबर साक्षरता ही मोहीम आम्ही राबवित असून इंटरनेटवापराविषयी पुरेसे ज्ञान नसलेल्यांना ते उपलब्ध करू दिले जाणार आहे. 
त्यामुळे याबाबत सायबर सुरक्षेचा प्लान आखण्याकरीत जनजागृतीची राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याची  गरज असल्याचे जाणवते आणि याचाच एक भाग म्हणून या ब्लॉगची निर्मिती करण्यात आलेली  आहे  
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने कोणत्या प्रकारे इंटरनेट वापरावे , ऑनलाईन बँकिंग ,शॉपिंग आणि सुरक्षेच्या संबंधित  गोष्टींची ओळख या ब्लॉगच्या माध्यमातून होणार आहे . 
सोशिअल मीडियाचा  गैरवापर सध्या वाढत आहे. ब्लॅकमेकिंग ,एखाद्याला धमकाविणे,अश्लीलता पसरविणे,  आर्थिक व भावनिक फसवणूक करणे आदी गैरवापर समाज सोशिअल मीडियाचाद्वारे केले जातात. प्रकार थांबविण्यासाठी लोकांमध्ये सायबर जनजाग्रुती करण्यासाठी या ब्लॉगचं उपयोग होणार आहे 

=========================================================================सूचना: या ब्लॉगवरील विविध पोस्टसाठी मराठी वर्तमानपत्रातील तंत्रज्ञानाच्या बातम्यांचा आणि काही तंत्रज्ञानावरील लेखांचा तसेच मराठी न्युज चॅनेल वरील तंत्रज्ञानाच्या बातम्यांचा आधार /संदर्भ घेण्यात आलेला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी 

संपर्क
Prof.Yogesh Handge
Assistant Professor
Computer Engineering
P
une Institute of Computer Technology,
Pune - 411043

Mob :: +91-9423077963
💐http://profyogeshhandge.blogspot.in💐
जग खूप सुंदर आहे .. आभार देवाचे !

मोबाईल न  9423077963





Tuesday, 27 October 2026

लेखक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी ब्लॉग ही छान सुरुवात
मराठीमध्ये ब्लॉग कसा तयार करावा
ब्लॉग रायटिंग कसं असावं, लोकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघावं अशा महत्त्वपूर्ण टिप्स जणूं घेऊ या ! 
लिखाणातून व्यक्त होण्यासाठी ब्लॉग हे प्रभावी माध्यम आहे . लेखक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी ब्लॉग ही छान सुरुवात होऊ शकते. 
ब्लॉगिंगमधून लिखाणाची आवड जपता येते तसेच  स्वतःच्या व्यवसायाची मार्केटिंग देखील  ब्लॉगच्या माध्यमातून करता येते ,त्याकडे करिअरच्या दृष्टिनकोनातूनहि बघता येते.  ,
कोणत्याही विषयावर ब्लॉगमधून व्यक्त होऊ शकता. . लेखन, फोटो, व्हिडीओ अशा कोणत्याही माध्यमातून ब्लॉग सुरु करता येतो. ब्लॉग लिखित स्वरूपात असेल तर त्याबरोबर एखादा विषयानुरूप फोटो किंवा व्हिडीओ जोडल्यास ब्लॉग अधिक उठावदार होतो.
बहुतेकांच्या ब्लॉगला केवळ भारतीयच नव्हे तर इतर देशांतील अनेक लोक वाचतात. त्यामुळे ब्लॉगच्या माध्यमातून 'ग्लोबल सिटीझन' होता येतं. 
ब्लॉगला मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रियांकडे सकारात्मकतेने बघितले पाहिजे 
 वाचक ब्लॉगवर त्यांची मतं व्यक्त करत असतात तसा तो त्यांचा  हक्क आहे. त्यांच्या  प्रतिक्रिया नकारात्मक असल्या तरी त्यांच्या मतांचा आदर ठेवला पाहिजे . या नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करुन तुमचं लिखाण सुरु ठेवा उगाचच सोशल मीडियावरुन वाद घालु नका 
ब्लॉग कसा लिहावा/तयार करावा 
 google ची blogger.com - ही साईट तुम्हाला फुकट ब्लॉग लिहिण्याची ऑफर देते 
ब्लॉग लिहण्याच्या स्टेप्स 
१  www.blogger.com इथे visit करून  google च्या account अर्थातच जीमेलने   login करावे. 
२. लॉगीन झाल्यावर तिथे  Dashboard दिसेल. यावर  तुमचे किती ब्लॉग्स आहेत, किती लोकांनी त्याला विझिट्स दिल्या,वैगरे माहिती दिसेल. 
नवीन ब्लॉग तयार करण्याकरिता New Blog" वर क्लीक करा . त्यानंतर स्क्रिनवर  Title आणि Address यांची विचारणा होईल 
--  Title म्हणजे तुमच्या ब्लॉगचे नाव  दिसेल. 
--  Address म्हणजे तुमच्या ब्लॉगचा internet address जो  स्थिर राहील. तुम्हाला तो बदलता येणार नाही.तसेच Theme हि तुमच्या ब्लॉगच्या विषयावरून निवडता येईल . आता तुमचा ब्लॉग तयार झालेला आहे 
३. आता या ब्लॉगवर नवीन लेख लिहण्याकरिता New Post वर क्लीक करा त्यानंतर  एक नवीन पान उघडेल जिथे तुम्ही तुमचा  blog लिहू शकाल . 
या पेजवर  पहिल्या भागात Post Title दिसेल जे तुमच्या blog चे अर्थातच लेखाचे  नाव  असणार आहे . दुसऱ्या भागात  blog formatting चे tools दिसेल  जिथे तुम्हाला typing करून तुमचा blog लिहता येईल 
४.  ब्लॉग लिहीत असतांना  लिखाण पूर्ण झालेले नसेल  तर "Save" वर क्लीक करून ते सुरक्षित ठेवता येईल. एखादा विषयानुरूप फोटो  जोडल्यास ब्लॉग अधिक उठावदार होतो.तो फोटो हि तुम्हाला इथे जोडता येतो .
 तसेच ब्लॉग पब्लिश करण्यापूर्वी तो वाचकांना कसा दिसेल हे पडताळून बघण्याकरिता Preview वर क्लीक करा आणि   blog पूर्ण लिहून झाल्यावर  "Publish" या बटणवर क्लीक करून प्रसिद्ध करा 
ऑनलाईन पद्धतीने करा मराठीत टायपिंग 
ब्लॉग मराठीत टाईप करण्याकरिता घ्या गुगलचीच मदत 
 http://www.google.com/intl/mr/inputtools/try/ या वेबसाईटला भेट द्या 
इथे इंग्लिश मध्ये टाईप करा ते मराठीत दिसेल ते कॉपी करून ब्लॉगमध्ये पेस्ट करा 
ब्लॉगचे  वेबसाईटमध्ये रुपांतर ?
वार्षिक काही रक्कम भरून आपल्या  ब्लॉगचे आपणास जर वेबसाईटमध्ये रुपांतर करता येते 
कसं करणार ब्लॉगचं प्रमोशन ?
 ट्विटर, फेसबुक, लिंक्डइन, वर्डप्रेस यासारख्या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन ब्लॉग लोकांपर्यंत पोहोचवता येतो. ब्लॉगच्या नावाचा हॅशटॅग करुन
 ट्विटर, इन्स्टाग्राम मध्ये तसेच फेसबुकवर वापरण्यात येतो . 
=====================================================================================
"सायबर सिटी" ब्लॉग ठरला सर्वोत्कृष्ट ब्लॉग विजेता
पुणे  : युथ इंजिनिअर्स फॉर टेकनॉलॉजी अँड एंवीरोन्मेन्ट (YETE ) या तंत्रज्ञान आणि पर्यावरण या क्षेत्रात काम करणाऱ्या देश पातळीवरील काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे 
 जगभरातल्या मराठी   ब्लॉग लेखकांसाठी नुकतीच “टेक्निकल ब्लॉग इंडिया २०१७” ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतातील  काश्मीर ते कन्याकुमारी येथील मराठी ब्लॉगर्सनी भाग घेतला होता. नुकतेच ‘’ स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यांत आलेले आहेत.या स्पर्धेला  मराठी ब्लॉगर्सकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
यंदा  सर्वोत्कृष्ट ब्लॉग विजेत्यांच्या यादीमध्ये प्रा. योगेश हांडगे यांच्या "सायबर सिटी" (http://profyogeshhandge.blogspot.in) या ब्लॉगचा समावेश आहे.
मोबाइल, सोशल मीडिया, ई-बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग हे आता अनेकांच्या दैनंदिन कामातील नित्याचे शब्द झाले आहेत. ६० टक्के टीनेजर्स आणि युवक, चाळिशी पार केलेले ४० टक्के आणि २० टक्के ज्येष्ठ नागरिक आज वेगवेगळ्या माध्यमांतून ऑनलाइन अॅक्टीव्हिटीशी कनेक्ट आहेत. मात्र, या टेन्कोसॅव्ही असणाऱ्यांना फसविण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय रॅकेट्स कार्यरत  आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही हा मोठा धोका असू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. 
इंटरनेटवर अनेकांची फसवणूक झाली तरी त्याविषयी अनेकांनी पोलिसांत तक्रारी करण्याची टाळाटाळ केल्याचेही दिसून येते. केवळ इंटरनेटविषयीच्या अज्ञानामुळे अनेकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते.
तक्रार कुठे करायची असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अनेकांमध्ये संभ्रम असतो  . हा संभ्रम दूर करण्यासाठी ,सायबर साक्षरता ही मोहीम  राबविण्याकरिता तसेच  इंटरनेटवापराविषयी पुरेसे ज्ञान नसलेल्यांना ते उपलब्ध करून देण्यासाठी , 
 सायबर सुरक्षेचा प्लान आखण्याकरीत जनजागृतीची राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याची  गरज असल्याचे जाणवते आणि याचाच एक भाग म्हणून या ब्लॉगची निर्मिती करण्यात आलेली  आहे  
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने कोणत्या प्रकारे इंटरनेट वापरावे , ऑनलाईन बँकिंग ,शॉपिंग आणि सुरक्षेच्या संबंधित  गोष्टींची ओळख या ब्लॉगच्या माध्यमातून होणार आहे . 
सोशल मीडियाचा  गैरवापर सध्या वाढत आहे. ब्लॅकमेकिंग ,एखाद्याला धमकाविणे,अश्लीलता पसरविणे,  आर्थिक व भावनिक फसवणूक करणे आदी गैरवापर  सोशल मीडियाचाद्वारे केले जातात. प्रकार थांबविण्यासाठी लोकांमध्ये सायबर जनजागृती करण्यासाठी या ब्लॉगचा उपयोग होणार आहे



लेखक :  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

Monday, 24 January 2022

ग्राहक राजा ! जाणून घ्या हक्क:राष्ट्रीय ग्राहक दिवस २४ डिसेंबर आज बहुतेक वेळाबऱ्याच ठिकाणी ,पर्यटन स्थळे येथे खाद्यपदार्थ किंवा शीतपेय एम.आर.पी.पेक्षा अधिक किमतीने घ्यावे लागते. टीवी वर अनेक जाहिरातींतून स्त्रियांचे उघडेवागडे प्रदर्शन केले जाते. हे आपण निमूट सहन करतो वस्तूंचे उत्पादक आपल्याला फसवताहेत, हे सगळं सर्व फसवणुकीचे प्रकार कुठे तरी थांबले पाहिजे त्यसाठी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार घेतला पाहिजे विविध बाजार पेठ आणि ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय आल्याने नामांकित ब्रँडस् एका क्लिकसरशी ग्राहकांना घरपोच मिळू लागला आहेत. अशा परिस्थितीत ग्राहक राजाची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहक हक्क सरंक्षण व्यवस्था मजबूत असायला हवी. देशातील ग्राहक हक्क संरक्षण व्यवस्थेबाबत जाणून घेवू या ! बाजारातील वाढत्या स्पर्धेचे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर फायदे तर होतातच पण काहीवेळा त्यांची फसवणूकदेखील होत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकहिताचे रक्षण करण्याकरिता विविध पातळ्यांवर कार्य केले जात आहे. ग्राहक तक्रार निवारण मंच हा याच व्यवस्थेचा एक भाग आहे. स्पर्धेतून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार स्थापन करण्यात आलेला ग्राहक तक्रार निवारण मंच हा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. ग्राहक हक्क संरक्षणासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशात ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकावर 24 डिसेंबर 1986 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर देशभरात तो कायदा म्हणून लागू करण्यात आला. त्यामुळे या दिवसशी भारतात 24 डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय ग्राहक दिवस' साजरा करण्यात येतो. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. . या कायद्यामुळे ग्राहकांचे हक्क जोपासण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आलेत ग्राहक चळवळीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम 2004 नुसार जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली समितीची स्थापना करण्यात आल्या आहेत. या समितीत विविध स्तरावरील सदस्यांची निवड करण्यात येते. राज्यस्तरावर या परिषदेचे ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री हे अध्यक्ष असतात तर राज्यमंत्री हे उपाध्यक्ष असतात. तर जाणून घेवू या या ग्राहक संरक्षण यंत्रने विषयी राज्य व जिल्हा स्तरावरील ग्राहक संरक्षण यंत्रणा (१) राज्य आयोग राज्यात राज्य आयोगाची स्थापना दि.३१ ऑक्टोबर, १९८९ पासून करण्यात आली. या आयोगावर अध्यक्ष व पाच सदस्य काम करतात. यापैकी एक न्यायिक सदस्य व महिला सदस्य असणे आवश्यक आहे. राज्य आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा निवृत्त न्यायाधिशांची नेमणूक करण्यात येते. राज्य आयोगाचे मुंबई येथे कार्यालय आहे (२) जिल्हा मंच जिल्हा मंचावर अध्यक्ष व दोन सदस्यांची नेमणूक करण्यात येते. जिल्हा मंचाच्या अध्यक्ष पदी कार्यरत जिल्हा न्यायाधिश किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा जिल्हा न्यायाधीश होण्याची अर्हता ज्या व्यक्तीकडे असेल अशा व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते. मंचावरील सदस्यांची राज्य आयोगाच्या सदस्याप्रमाणेच अर्हता विहित केली आहे. राज्यात प्रत्येक जिल्हयासाठी स्वतंत्र मंचाची स्थापना करण्यात आली आहे. त्याशिवाय मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे व मुंबई उपनगर येथे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्हयामध्ये प्रत्येकी एक असे एकूण पाच अतिरिक्त जिल्हा मंच स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हयाच्या मुख्यालयामध्ये हे मंच कार्यरत आहेत. सध्या जिल्हा स्तरावर एकूण ४० जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच व तात्पुरत्या स्वरुपात तीन अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन करण्यात आले आहेत. राज्य व जिल्हा मंचाची अधिकारीता राज्य आयोग: रूपये २० लाख ते रूपये एक कोटी पर्यंतच्या किंमतीचे दावे या आयोगाकडून हाताळण्यात येतात , जिल्हा मंचानी दिलेल्या निर्णयाविरूध्दच्या अपिलांचा निवाडा राज्य आयोगास करावा लागतो. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच : रूपये २० लाख पर्यंतचे दावे या ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये हाताळले जातात. राज्य ग्राहक हेल्पलाईन राज्य शासनाने हेल्पलाईन कार्यान्वित करण्यासाठी कंझुमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई या संस्थेची निवड केली आहे. राज्य ग्राहक हेल्पलाईन दिनांक १५ सप्टेंबर २०११ पासून कार्यान्वित करण्यात आली असून या विनाशुल्क हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक १८०० २२ २२६२ हा आहे. कंझुमर क्लब केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे ग्राहक प्रबोधन करण्याकरिता शाळांमधून कंझुमर क्लब स्थापन करण्यात येतात. ही योजना १००% केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. शाळांमधून कंझुमर क्लब स्थापन करण्याकरिता केंद्र शासनाकडून अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते . या विषयी अधिक माहिती ग्राहक संरक्षण कायद्या विषयी अधिक माहिती www.mahafood.gov.in या वेबसाईट वर मिळेल लेखक : प्रा य़ोगेश अशोक हांडगे (लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
म्यूझिक प्रेमींचे आवडते अॅप्स प्रवास करताना किंवा फावल्या वेळेत गाणी ऐकणारे तसेच दर्दी रसिक यांच्यासाठी उपयोगी अॅप्सचा उहापोह करु या...... ऑनलाईन अॅप्स Jio Music अॅप 5 कोटी म्यूझिक प्रेमींचे आवडते Jio Music असे या अॅप हिंदी आणि इंग्रजीच बरोबरच बंगाली, गुजराती, भोजपूरी, तामिळ, पंजाबी, आसामी,मलयालम, कन्नड, तेलुगु, आणि अन्य तर 20 भाषांमधील गाण्यांचा समावेश या अॅपमध्ये आहे. काय आहे या अॅप मध्ये - युजर्स मोफत गाणी ऐकू शकतात - युजर्स त्यांच्या मोबाईलला त्यांच्या आवडत्या गाण्याची रिंगटोनही सेट करू शकतात - संपूर्ण गाणे डाउनलोड करता येते या अॅपची वैशिष्ट्ये (फिचर) १. गायकांच्या गाण्यांचा संग्रह : या अॅपमधील आर्टिस्ट सॉन्ग सलेक्शन या फीचरद्वारे यूजर्स त्यांच्या आवडत्या गायकाचे गाणे ऐकू शकतात . या अॅपमध्ये लता मंगेशकर, सोनू निगम, किशोर कुमार, मन्ना डे , हनी सिंह,जगजीत सिंह, अरिजीत सिंह, मोहम्मद रफी एआर रहमानआणि इतर अनेक नावाजलेल्या गायकांचा समावेश आहे. २. मूडनुसार साउंडचे मोड या अॅपमध्ये Party, Kids, Rock, Pop,Dance, Party, Romantic, soulful, Jazz,Cheerful इत्यादी मोडचा समावेश आहे. युजर्स त्यांच्या मूडनुसार विविध मोडमधील गाणे निवडू शकतात ३ कॅटेगरी नुसार गाण्यांची निवड या अॅपमध्ये नवे, जुने, रोमॅन्टीक, प्लॅशबॅक,मॅलेडी, इत्यादी वेग-वेगळ्या कॅटेगरीतील गाणे आहे. युजर्स त्यांच्या आवडीनुसार या कॅटेगरीतील गाणे निवडू शकतात. २.यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर यूट्यूबच्या नव्या फिचरमध्ये यूट्यूबवरील गाण्याचा व्हिडिओ पाहायचा नसेल फक्त ऑडिओ मोडवर गाणी ऐकायची असतील ते शक्य होणार आहे.तशी सुविधा उपलब्ध आहे. या नव्या फिचरमध्ये यूजर्सला व्हिडिओ पाहण्याऐवजी केवळ गाणी ऐकता येणार असून त्यामुळे इंटरनेट डाटाही वाचवणे शक्य होणार आहे. या फिचरमध्ये गाण्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ यांपैकी एकच पर्याय निवडण्याची सुविधा यूजर्सना उपलब्ध होणार आहे.ऑडिओला व्हिडिओपेक्षा कमी डाटा लागतो. त्यामुळे इंटरनेट डाटाची बचत होईल म्युझिक प्लेअरमधील टॉगल बटनाने पर्याय निवडता येतील यूट्यूब म्युझिक लॉन्च करण्याच्या वेळीच याचा विचार करण्यात आला होता. हे फिचर सुरु आल्यावर म्युझिक प्लेअरमध्ये टॉगल बटन उपलब्ध असेल . या बटनावर क्लिक केल्यावर सुरू केलेल्या गाण्याचा व्हिडिओ किंवा ऑडिओ पर्याय निवडता येईल. ऑफलाईन अॅप्स काही अॅप्स इंटरनेट नसतांना म्हणजेच ऑफलाईनही चालतात. १.पॅंडोरा (Pandora): ऑफलाईन गाणी ऐकण्यासाठी हे अॅप वापरता येते . प्ले स्टोरवरून हे अॅप डाऊनलोड करताना फक्त इंटरनेट गरजेचे आहे . २.गाना (Gaana): या अॅपवरील गाण्यांचे कलेक्शनही भरपूर असल्याने आणि अॅपचा वापर करणे असल्याने हे अॅप आपल्या देशातील युवा वर्गात भलतेच लोकप्रिय झालेले आहे. लेखक : प्रा य़ोगेश हांडगे (लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
आता एका वर्षाच्या आत बसविली जाणार मानवी मेंदूत चमत्कारी संगणक चिप्स इलेक्ट्रिकवर चालणार्‍या वाहनांची निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क हे सतत नावीन्याचा शोध घेण्यासाठी ओळखले जातात. . तसेच त्यांच्या स्पेसएक्स कंपनीने अवकाश संशोधन क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. वाहतुकीचा वेगवान पर्याय देणारे हायपरलूप तंत्रज्ञानही त्यांनी विकसित केलेले आहे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 2016 साली इलॉन मस्क यांनी न्यूरािंलक या न्यूरोसायन्स स्टार्टअप कंपनीची स्थापना केली. न्यूरािंलकचा उद्देश हा चिपच्या माध्यमातून मानवी मेंदूमध्ये तार नसलेले संगणक बसविणे म्हणजेच अल्ट्रा हाय बॅण्डविड्थ ब्रेन मशीन इंटरफेस निर्माण करणे हा आहे . सुरवातीला न्यूरािंलक कंपनीने तंत्रज्ञान विकसित करताना एका डुकरावर संशोधनात्मक प्रयोग केला. या डुकराच्या मेंदूमध्ये गत दोन महिन्यांपासून छोट्या नाण्याच्या आकाराची संगणक चिप बसवली होती त्यानंतर एका माकडाच्या मेंदूत वायरलेस इम्प्लांट करण्यात आला . या माध्यमातून माकड अप्लाय मेंदूचा वापर करून व्हिडीओ गेम खेळू शकला. नुकतीच एलन मस्क यांनी घोषणा केली कि, एका वर्षाच्या आत मानवी मेंदूला लावली जाणारी कॉम्युटर चिप तयार करून ती मानवी मेंदूत फिट करण्यात येईल. पुढे ते म्हणाले कि , मनुष्यच्या मेंदूत चिप लावण्याचे काम एक रोबोट करेल काम एक रोबोट करेल.भविष्यात अर्टिफिशिअल इंटीलिजन्सने मनुष्यावर कंट्रोल मिळवू नये म्हणून मानवी मेंदू कॉम्पुटरशी जोडणे हे गरजेचे आहे असे मस्क यांनी स्प्ष्ट केले . सविस्तर बोलतांना मास्क यांनी सांगितले कि मानवी डोातून एक तुकडा काढला जाईल आणि रोबोतद्वारे हजारो इलेोड्स मेंदूत सोडले जातील त्यानंतर छिद्रात सुक्षम यंत्रणा बसविल्या जाईल .यामुळे डोक्यावर छोटासा डाग दिसेल. न्यूरािंलक हि कंपनी अत्यंत सूक्ष्म यंत्रणा तयार करण्यात मग्न आहे . चिपचे मानवी जीवनासाठी फायदे : --पाठीच्या कण्याच्या दुखापती, मेंदू विकार, अल्झायमर या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करण्याचे लक्ष्य आहे. --ही चिप म्हणजे मानवी शरीरातील एक प्रकारची कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. या प्रभावी उपकरणांमुळे वास्तवात स्मृतिभ्रंश, नैराश्य व निद्रानाश या समस्यांचे निराकरण होऊ शकते. -- मेंदूत चिप बसवण्याचे हे तंत्रज्ञान मानवी आजार बरे करण्याचे ध्येय आहे. --मानवी मेंदूशी निगडित असलेल्या आजारांमधून रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यासाठी वापर होईल --स्मृती कमी होणे, श्रवणशक्ती कमी होणे, औदासिन्य आणि निद्रानाश यासारख्या आजारांवर उपयोगी -- मणक्यांच्या आजार असलेल्या लोकांना त्यातून बरं होण्यासाठी ही चिप उपयुक्त ठरू शकते चिपचा वापर अत्यंत सुरक्षित : - मेंदूत लावले जाणारे डिव्हाईस १ इंचाचे असेल आणि ते अत्यंत सुरक्षित असेल असे एलन मस्क यांनी स्पष्ट केले - एक प्रकारचे रोबो असलेले हे तंत्रज्ञान काढूनही टाकता येते लेखक : प्रा य़ोगेश अशोक हांडगे (लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.) Mobile: 9423077963
मायक्रोसॉफ्ट विंडोज ११ लॉन्चः सहा वर्षानंतर विंडोजचा नवीन अवतार लॉन्च झाला, त्यात काय नवीन आहे आणि सर्वात मनोरंजक वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घ्या मायक्रोसॉफ्टचा नुकताच मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात कंपनीने विंडोज 11 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम सादर केली ... विंडोज 11 सह, कंपने या ऑपरेटिंग सिस्टमला नवीन देखावा दिला आहे. या अद्यतनानंतर नवीन थीम, नवीन वैशिष्ट्ये तसेच ग्राफिक्स मिळालेले आहे टास्कबार पूर्णपणे डिझाइन केले गेले आहे आणि चिन्हित केले गेले आहे. फाइल व्यवस्थापनासाठी नवीन वैशिष्ट्ये दिली गेली आहेत. प्रारंभ मेनू देखील बदलला आहे जाणून घेऊ या नवीन काही वैशिष्ट्ये >>प्रारंभ मेनू पूर्वीपेक्षा वेगळा आहे आणि चिन्हे आढळतील, शिफारस केलेला विभाग जोडला गेला आहे. अलीकडील फाईल्ससाठी स्वतंत्र पर्याय असेल. फोनसह कनेक्टिव्हिटी उत्कृष्ट बनली आहे आणि आपण थेट संगणकात फोनचे कार्य पूर्ण करू शकता. मल्टी टास्किंगसाठी नवीन वैशिष्ट्ये आहेत. >> स्नॅप लेआउट - हे मल्टी टास्किंगसाठी डिझाइन केलेले आहे. एका स्क्रीनवर एकाच वेळी एकाधिक विंडोज चालवता येते. कंपनीने असे म्हटले आहे की असे वैशिष्ट्य इतर ऑपरेटिंग सिस्टममध्ये दिले जात नाही. - स्नॅप ग्रुप - येथे आपल्याला अ‍ॅप्सचा संग्रह सापडेल आणि आपण त्यात टास्कबारमधून थेट प्रवेश करू शकता. टास्क स्विचिंगसाठी ही वैशिष्ट्ये उत्कृष्ट असतील. कारण कधीकधी आपल्याला पुन्हा कार्य सुरू करावे लागेल. >>एका संगणकास दुसर्‍या पीसीशी जोडणे सोपे केले आहे. डॉक आणि अंडॉक वैशिष्ट्यासह प्रो वापरकर्त्यांना उच्च प्रतीचा अनुभव मिळेल.यक्रोसॉफ्ट एज ब्राउझर देखील बदलला आहे. एका क्लिकवर आपण येथे मल्टीटास्किंग देखील करू शकता. विंडोज 11 सह, आपण प्रत्येक डेस्कटॉपवर भिन्न वॉलपेपर देऊ शकता.उदाहरणार्थ, आपण भिन्न गोष्टी करत असल्यास, आपण एकाच संगणकात भिन्न डेस्कटॉप सेटअप करू शकता. >>मायक्रोसॉफ्ट टीम इंटिग्रेशन विंडोज 11 मध्ये देण्यात आले आहे. म्हणजेच, हे वैशिष्ट्य प्रत्येक विंडोज 11 मध्ये उपलब्ध असेल.आपण कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असल्यास, नंतर विंडोज 11 द्वारे कार्यसंघ वापरुन, आपण अक्षरशः कोणत्याही डिव्हाइसशी कनेक्ट करून एकमेकांशी संवाद साधू शकता. >>विंडोज 11 मध्ये विजेट्स फीचर देण्यात आले आहे. आपण ते वैयक्तिकृत करू शकता. त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली गेली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.तथापि, हे वैशिष्ट्य शेवटच्या विंडोज 10 अद्यतनासह चाचणी म्हणून दिले गेले होते, जे वेगवान कार्य करते. हवामानापासून ते इतर महत्त्वाचे विजेट्स येथे दर्शविले आहेत. >>कीबोर्डशिवाय वापरण्यासाठी विंडोज 11 मध्ये जेस्चर आणि स्टैक वैशिष्ट्य सुधारित केले आहे. जेणेकरून कीबोर्डचा स्पर्श न करता संगणक वापरणे सोपे होईल.स्टाईलस वापरण्यासाठी हॅप्टिक समर्थन प्रदान केले गेले आहे जेणेकरून आपण टच स्क्रीनवर थेट स्टाईलससह कार्य करू शकता. विंडोज 11 स्टोअरवर चित्रपट आणि मालिका देखील उपलब्ध असतील. आपण येथे भाड्याने किंवा चित्रपट खरेदी करू शकता.स्टोअरचे नूतनीकरण केले गेले आहे आणि अॅप्स चांगल्या प्रकारे एकत्रित केले गेले आहेत >>विंडोज 11 देखील गेमिंगसाठी खास बनवले गेले आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम सर्वोत्कृष्ट गेमिंगचा अनुभव देईल असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने असे सांगितले आहे की ही ऑपरेटिंग सिस्टम सर्वोत्कृष्ट गेमिंगचा अनुभव देईल. विंडोज 11 हे गेमिंगचे भविष्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे.ऑटो एचडीआर वैशिष्ट्य दिले गेले आहे जे गेमिंगमध्ये ऑटो लाइट अद्यतनित करेल जेणेकरून अधिक चांगली दृश्यमानता असेल.वापरकर्त्यांना एचडीआरसह गेमिंगचा पुढील स्तराचा अनुभव मिळेल. >>यासाठी प्लेयर आणि विकसकास काहीही करण्याची आवश्यकता नाही. कंपनीने म्हटले आहे की थेट स्टोरेज वैशिष्ट्यामुळे विंडोज 11 मध्ये गेम वेगाने लोड होतील.कमी लोड वेळेमुळे, गेमिंग त्वरित प्रारंभ होईल. विंडोज 11 मधील एक्सबॉक्स अॅपद्वारे गेम पास सदस्यता उपलब्ध आहे. कंपनीने म्हटले आहे की गेम पास लायब्ररीला जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत, परंतु गेमिंगची पुरेशी विविधता असेल आणि दरमहा नवीन गेम अपलोड केले जातील. >>विंडोज 11 मध्ये Android अॅप्ससाठी समर्थन उपलब्ध असेल. यासाठी अ‍ॅमेझॉन अ‍ॅप स्टोअर विंडोज 11 मध्ये उपलब्ध असेल जिथे वापरकर्ते अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात.अँड्रॉइड अॅप्स सपोर्ट मिळाल्यानंतर युजर्स अँड्रॉइडमध्ये चालणार्‍या विंडोज 11 मध्ये असे अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतील.तथापि, येथे कोणतेही Google प्ले स्टोअर असणार नाही आणि सध्या येथे मर्यादित अ‍ॅप्स समर्थित असतील. >>टच कीबोर्डचा एक नवीन प्रकार दिला गेला आहे आणि येथे भिन्न थीम्स देखील आहेत. टायपिंग अधिक सुलभ करण्यासाठी व्हॉईस टायपिंग वैशिष्ट्य अँड्रॉइड प्रमाणेच दिले गेलेअँड्रॉइडच्या कीबोर्ड अ‍ॅप्स सारख्या बर्‍याच फीचर्स यात देण्यात आल्या आहेत. विजेटस पूर्ण स्क्रीन बनविता येतात आणि त्यानुसार आकार बदलू देखील शकतात.येथे आपल्यानुसार आपल्यास बातम्यांचे फीड मिळेल. जिथे आपल्याला आपल्या स्वारस्यावर आधारित जगभरातून विविध प्रकारच्या बातम्या मिळतील. लेखक : प्रा य़ोगेश अशोक हांडगे (लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.) Mobile: 9423077963
QR कोड फसवणूकीपासून सावध रहा ! .....मिल्ट्रीतील(भारतीय सैन्यदलातील ) अधिकाऱ्यांच्या नावाने होत आहे फसवणूक क्यूआर कोड बद्दल म्हणजे क्विक रिस्पॉन्स हा स्कॅन करून पेमेंट करण्याचा लोकप्रिय पर्याय आहे, त्याचा वापर केला जाऊ शकतो दुकानदार बिल भरण्यासाठी ह्याचा वापर करतात. अगदी लहान विक्रेतेसुद्धा त्यांच्या ग्राहकांना क्यूआर कोड स्कॅन करून पैसे भरण्याचा किंवा पेमेंट करण्याचा पर्याय देत आहेत . क्यूआर कोड वापरून पेमेंट करण्यासाठी, ग्राहकाला लाभार्थी किंवा लाभार्थीच्या खात्याच्या तपशिलात जाण्याची गरज नाही आणि व्यवहाराचा बंदोबस्त देखील जलद आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी, सर्व बँकिंग आणि ई-वॉलेट अॅप्स क्यूआर कोड वाचन करण्याचे सॉफ्टवेअर प्रदान करतात. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, ग्राहक रक्कम प्रविष्ट करतो आणि पासवर्ड प्रविष्ट करून पेमेंट प्रमाणित करतो आणि रक्कम लाभार्थीच्या खात्यात अगदी सहज हस्तांतरित केली जाते. एवढेच नाही तर ग्राहक QR कोड जनरेट करू शकतो आणि तृतीय पक्षाला पाठवू शकतो आणि त्या QR कोडमध्ये नमूद केलेली रक्कम स्वीकारू शकतो.अर्थात पेमेंट स्वीकारण्यासाठी पाठवता येते. QR कोड फसवणुकी बद्दल 1. QR स्कॅनिंग किंवा पेमेंट करण्यासाठी वापरला जातो, परंतु अनेक घटनांमध्ये असे आढळून आले आहे कि फसवणूकदारांनी ते डिपॉझिट कन्फर्मेशन म्हणून सादर केले आहे. याची काही उदाहरणे, फसवणूक करणारे OLX सारख्या प्लॅटफॉर्मवर वस्तू विकणाऱ्यांशी संपर्क साधतात. यासाठी, ते स्वत: ला सेकंड हँड वस्तू विक्रेते म्हणून दाखवतात आणि विक्रेत्याला मालाची तपासणी न करताच करार अंतिम करण्यास राजी करतात. विश्वास निर्माण करण्यासाठी, फसवणूक करणारा सुरुवातीला विक्रेत्याच्या खात्यात एक छोटी टोकन रक्कम हस्तांतरित करतो आणि त्याला वाटाघाटी मध्ये गुंतवून ठेवतो. थकबाकी भरण्यासाठी, ते विक्रेत्याला क्यूआर कोड पाठवतात आणि स्पष्ट करतात की हा क्यूआर कोड विक्रेत्याच्या खात्यात मिळालेल्या पेमेंटच्या पुष्टीकरण यासाठी आहे. खरतर हा QR म्हणजे पैसे मिळवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे, विक्रेता पासवर्ड टाकताच, फसव्या मार्गाने, त्याच्या खात्यातून पैसे कापले जातात.फसवणूक करणारा व्हॉट्सअॅपद्वारे क्यूआर दुसऱ्या पक्षाला शेअर करतो आणि कोड स्कॅन केल्यावर लगेच दुसऱ्या पक्षाच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे सांगतो . निष्पाप लोकांना वाटते की त्यांच्या खात्यात पैसे येतील, पण उलट घडते आणि ते लोक सायबर गुन्हेगारीचे बळी ठरतात. 2. OLX, Quikr आणि सोशल मीडिया चॅनेलवर फसवणूक करणारे विक्रेते म्हणून लष्कर अधिकारी, बीएसएफ, सीआयएसएफ किंवा कोणत्याही ब्रँड नेमचा वापर करून स्वत: चा वेश करतात. त्यानंतर ते खरेदीदारांना कलेक्ट रिक्वेस्ट वापरून आगाऊ पेमेंट करण्यास सांगतात आणि प्रदान केलेल्या क्यूआर कोड वर पैसे पाठवण्यास सांगतात . परंतु त्या QR कोडमध्ये मोठी रक्कम दिलेली असते .खरेदीदार, हे विक्रेत्याच्या हेतूंपासून अनभिज्ञ, असतात आणि त्याची विनंती मंजूर करण्याची चूक करतात 3.99acer , magicBricks ,NoBrokers या साइटवर फसवणूक करणारे भाडेकरू म्हणून म्हणून लष्कर अधिकारी, बीएसएफ, सीआयएसएफ स्वत: चा वेश करतात. आणि फ्लॅट किंवा घर भाड्याने मागतात त्यानंतर ते . सुरुवातीला घरमालकाच्या खात्यात एक छोटी टोकन रक्कम हस्तांतरित करतो आणि नंतर संपूर्ण घरभाडे भरण्यासाठी, ते घरमालकांना क्यूआर कोड पाठवतात आणि स्पष्ट करतात की हा क्यूआर कोड घरमालकाच्या खात्यात मिळालेल्या पेमेंटच्या पुष्टीकरण यासाठी आहे. तर QR म्हणजे पैसे मिळवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे, विक्रेता पासवर्ड टाकताच, फसव्या मार्गाने, त्याच्या खात्यातून पैसे कापले जातात.फसवणूक करणारा व्हॉट्सअॅपद्वारे क्यूआर दुसऱ्या पक्षाला शेअर करतो आणि कोड स्कॅन केल्यावर लगेच दुसऱ्या पक्षाच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे सांगतो . निष्पाप लोकांना वाटते की त्यांच्या खात्यात पैसे येतील, पण उलट घडते आणि ते लोक सायबर गुन्हेगारीचे बळी ठरतात. तसेच अनेकदा घरमालकांना स्वतःची आयडी ,आधार कार्ड ,पॅनकार्ड पाठवतात तसेच घरमालकाला देखील त्याचे आयडी ,आधार कार्ड ,पॅनकार्ड ओळख पटविण्यासाठी पाठविण्यास सांगतात आणि घरमालकाची कागदपत्रे मिळाल्यानंतर त्या घरमालकाच्या नावाने पुढील प्रकरणात फसवणूक करतात 4. फसवणूक करणारे बनावट वेबसाइट तयार करून काही आकर्षक सौदे देतात जे खरेदीदारांना आकर्षित करतात आणि क्यूआर कोड द्वारे फसव्या पेमेंट स्वीकारतात. QR कोड फसवणूक कशी टाळावी? >>जर कोणी तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्यास सांगत असेल तर तो फसवणुकीचा कॉल आहे. त्यावर विश्वास ठेवू नका >>फक्त ते QR कोड स्कॅन करा जे पूर्णपणे विश्वासार्ह आहेत आणि तुम्हाला माहित आहे की ते कोणी तयार केले. >>अज्ञात लाभार्थींकडून संकलित विनंत्या कधीही मंजूर करू नका. >>जर तुम्ही एखादा QR कोड स्कॅन केला जो तुम्हाला वेब पेजवर घेऊन जाईल आणि तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, लॉगिन आयडी, पासवर्ड, पत्ता इत्यादी विचारेल तर टाळा. >>तुमच्या खात्यात पैसे मिळवण्यासाठी, कोणत्याही पिनची आवश्यकता नाही. फसवणूक करणारे QR कोड पाठवून ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. >>क्यूआर कोडमध्ये काय लपलेले आहे हे शोधण्यासाठी क्यूआर कोड कधीही स्कॅन करू नका. >>सार्वजनिक क्यूआर कोड वापरताना सावधगिरी बाळगा कारण सायबर गुन्हेगार अपराधी त्यांच्या खात्यात पैसे मिळविण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या QR कोडला खऱ्या QRकोडच्या जागी टाकू शकतात लेखक : प्रा. योगेश अशोक हांडगे, कात्रज ,पुणे .