Monday, 24 January 2022
म्यूझिक प्रेमींचे आवडते अॅप्स
प्रवास करताना किंवा फावल्या वेळेत गाणी ऐकणारे तसेच दर्दी रसिक
यांच्यासाठी उपयोगी अॅप्सचा उहापोह करु या......
ऑनलाईन अॅप्स
Jio Music अॅप
5 कोटी म्यूझिक प्रेमींचे आवडते Jio Music असे या अॅप
हिंदी आणि इंग्रजीच बरोबरच बंगाली, गुजराती, भोजपूरी, तामिळ, पंजाबी,
आसामी,मलयालम, कन्नड, तेलुगु, आणि अन्य तर 20 भाषांमधील गाण्यांचा
समावेश या अॅपमध्ये आहे.
काय आहे या अॅप मध्ये
- युजर्स मोफत गाणी ऐकू शकतात
- युजर्स त्यांच्या मोबाईलला त्यांच्या आवडत्या गाण्याची रिंगटोनही सेट करू शकतात
- संपूर्ण गाणे डाउनलोड करता येते
या अॅपची वैशिष्ट्ये (फिचर)
१. गायकांच्या गाण्यांचा संग्रह :
या अॅपमधील आर्टिस्ट सॉन्ग सलेक्शन या फीचरद्वारे यूजर्स त्यांच्या
आवडत्या गायकाचे गाणे ऐकू शकतात . या अॅपमध्ये लता मंगेशकर, सोनू निगम,
किशोर कुमार, मन्ना डे , हनी सिंह,जगजीत सिंह, अरिजीत सिंह, मोहम्मद रफी
एआर रहमानआणि इतर अनेक नावाजलेल्या गायकांचा समावेश आहे.
२. मूडनुसार साउंडचे मोड
या अॅपमध्ये Party, Kids, Rock, Pop,Dance, Party, Romantic, soulful,
Jazz,Cheerful इत्यादी मोडचा समावेश आहे. युजर्स त्यांच्या मूडनुसार
विविध मोडमधील गाणे निवडू शकतात
३ कॅटेगरी नुसार गाण्यांची निवड
या अॅपमध्ये नवे, जुने, रोमॅन्टीक, प्लॅशबॅक,मॅलेडी, इत्यादी वेग-वेगळ्या
कॅटेगरीतील गाणे आहे. युजर्स त्यांच्या आवडीनुसार या कॅटेगरीतील गाणे
निवडू शकतात.
२.यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर
यूट्यूबच्या नव्या फिचरमध्ये यूट्यूबवरील गाण्याचा व्हिडिओ पाहायचा नसेल
फक्त ऑडिओ मोडवर गाणी ऐकायची असतील ते शक्य होणार आहे.तशी सुविधा
उपलब्ध आहे. या नव्या फिचरमध्ये यूजर्सला व्हिडिओ पाहण्याऐवजी केवळ गाणी
ऐकता येणार असून त्यामुळे इंटरनेट डाटाही वाचवणे शक्य होणार आहे. या
फिचरमध्ये गाण्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ यांपैकी एकच पर्याय निवडण्याची
सुविधा यूजर्सना उपलब्ध होणार आहे.ऑडिओला व्हिडिओपेक्षा कमी डाटा लागतो.
त्यामुळे इंटरनेट डाटाची बचत होईल
म्युझिक प्लेअरमधील टॉगल बटनाने पर्याय निवडता येतील
यूट्यूब म्युझिक लॉन्च करण्याच्या वेळीच याचा विचार करण्यात आला होता. हे
फिचर सुरु आल्यावर म्युझिक प्लेअरमध्ये टॉगल बटन उपलब्ध असेल . या
बटनावर क्लिक केल्यावर सुरू केलेल्या गाण्याचा व्हिडिओ किंवा ऑडिओ
पर्याय निवडता येईल.
ऑफलाईन अॅप्स
काही अॅप्स इंटरनेट नसतांना म्हणजेच ऑफलाईनही चालतात.
१.पॅंडोरा (Pandora):
ऑफलाईन गाणी ऐकण्यासाठी हे अॅप वापरता येते . प्ले स्टोरवरून हे
अॅप डाऊनलोड करताना फक्त इंटरनेट गरजेचे आहे .
२.गाना (Gaana):
या अॅपवरील गाण्यांचे कलेक्शनही भरपूर असल्याने आणि अॅपचा वापर करणे
असल्याने हे अॅप आपल्या देशातील युवा वर्गात भलतेच लोकप्रिय झालेले आहे.
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment