Monday, 24 January 2022

Online Payment करतांना फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या ! सध्या अनेक व्यवसायांचं कंपन्यांचं काम ऑनलाइनच सुरू झालं आहे. अनेक व्यापारी, किराणा दुकानं यांनी डिजिटल अर्थव्यवस्था (Digital Financial System) स्वीकारल्याचे प्रमाण वाढलेले आहे. आपण सर्वच ऑनलाइन व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करीत आहे. परंतु फायद्यांबरोबरच डिजिटल अर्थप्रणालीचे तोटे देखील आहेत. सध्या ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud) म्हणजेच फसवणुकीचे गुन्हे वाढलेले आहेत. अनेक व्यक्ती आणि कंपन्या ,व्यापारी संस्था या ऑनलाइन फसवणुकीच्या शिकार होत आहेत. तर ऑनलाइन बँकिंग व्यवहार करताना काळजी काय घ्यायची, आणि ते करत असतांना कुठले धोके आहेत ह्यांचा हा उहापोह. ऑनलाइन व्यवहार करतांना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी १ लिंक्सबद्दल जागरूक राहा - ऑनलाइन लिंक्सच्या मोहाला बळी पडू नका. आजच्या घडीला मेसेजेस ,अनेक वेबसाइट्स,तसेच ई-मेल्समधून लिंक्स पाठवल्या जातात. बऱ्याचदा या लिंक्समध्ये आकर्षक रकमेची बक्षिसांची आमिषंही दाखवली जातात, परंतु बहुतेकशा लिंक्स बनावट असतात. आणि या लिंक्स अनेकदा बनावट साइट्सशी जोडलेल्या असतात. त्याद्वारे त्याद्वारे मोबाइलच्या सुरक्षेला भेदून तुमची आर्थिक आणि वैयक्तिक माहिती चोरला जाऊ शकते. २ विविध ॲपबद्दल इन्स्टॉल करतांना त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या मोबाईलवर ॲप डाउनलोड तसेच इन्स्टॉल करताना काळजी घ्या. सादर ॲप्स आर्थिक व्यवहारांशी निगडित नसले तरीदेखील त्याबद्दल त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या . ही ॲप्स अधिकृत आणि विश्वासार्ह कंपन्या किंवा संस्थाकडूनच तयार केलेली असावीत. बहुदा गुगल प्ले स्टोअर, विंडोज ॲप स्टोअर, iPhone ॲप स्टोअर, इ. मोबाइल प्लॅटफॉर्मच्या ॲप स्टोअरमढील बँकिंग किंवा शॉपिंग ॲप्सच डाउनलोड करन ती वापरावीत,’ ३ पब्लिक नेटवर्कचा वापर टाळावा पब्लिक नेटवर्कचा वापर आर्थिक व्यवहार करताना टाळावा . सार्वजनिक ठिकाणचे उदा. हॉटेल्स, एअरपोर्ट इत्यादी हॉटस्पॉट किंवा वाय फायवरून कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करू नका. सार्वजनिक नेटवर्क्समधून डेटा सहजपणे चोरीला जाऊ शकतो. त्यातलं एन्क्रिप्शन हॅकर्सला सहजपणे तोडता येते . त्याद्वारे ते कुठल्याही फोनमधून हॅकर्स महत्त्वाची माहिती मिळवू शकतात. त्यामुळे मोबाइल पासवर्ड असलेल्या वैयक्तिक इंटरनेट कनेक्शनशी जोदुनच आर्थिक व्यवहार करावा लेखक : प्रा योगेश अशोक हांडगे, M.Tech. Software Engineering,University Gold Medalist (लेखक सायबर अभ्यासक आहेत आहेत. ) Mob :: +91-9423077963

No comments:

Post a Comment