Saturday, 14 November 2020

 आता घरून काम करा आणि घरातूनच शिका ....व्हिडिओ कॉन्फरन्सिंग  अ‍ॅप्स


 करोना व्हायरस महामारीमुळे लॉकडाउनदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि रिमोट वर्किंग अ‍ॅप्लिकेशन्सची मागणी प्रचंड वाढलीये. करोनामुळे विविध क्षेत्रातील हानी झालेली लॉक डाऊनमुळे शिक्षणक्षेत्रात देखील वर्ग घेणे सडचणीचे झालेले आहे परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे  आशेचा किरण या क्षेत्रात दिसत आहे  विविध शैक्षणिक अँप ,App व्हिडीओ कॉलमुळे  शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन ज्ञानार्जनाची नवी पहाट उजाडली आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तासिका आणि सराव परीक्षाही सध्या याच पद्धतीने सुरु होत्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना  त्यांच्या संबंधित वर्षांत राहिलेल्या अभ्यासक्रमाचे उर्वरित शिक्षण देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तासिका घेतल्या गेल्यात . सोयीच्या  वेळेत तासिका घेऊन  विद्यार्थ्यांचे झूम या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू होते  आणि भविष्यात देखील या माध्यमांचा वापर होणे काळाची गरजच असेल तर या विविध उपयोगी Appचा    ऊहापोह करू या

डेटा  सिक्युरिटी आणि डेटा चोरीच्या बातम्यांमुळे झूम अ‍ॅप युजर्सची चिंता वाढली आहे आपल्या देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहितीतंत्रज्ञान मंत्रालयाने  मेक इनइंडिया  अंतर्गत , व्हिडिओकॉन्फरन्सिंग अ‍ॅप्स विकासासाठी इनोव्हेशन चॅलेंजची घोषणा केली आणि यात  विजयी ठरणाऱ्या कंपनीला अथवा  व्यक्तीला  1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे परंतु आता तोपर्यंत कोणते  व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्स वापरावे याचा लेखाजोखा घेणारा हा लेख

 

 

  झूम   अ‍ॅप 

 काेराेना प्रकाेपामुळे  लॉक डाऊन देशात करण्यात आले . त्यामुळे नोकरदार आणि व्यावसायिक यांना Work from Home अर्थात  घरून ऑफिसचे  काम करावे लागत आहे या गरजेमुळे  व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि कॉलिंग अ‍ॅप्सची मागणी जोरात वाढलीय . झूम अ‍ॅप्स व्हिडिओ चॅट प्लॅटफॉर्म हा त्यामुळे सर्वांमध्ये लोकप्रिय झालेला असतांनाच असताना डेटा त सिक्युरिटी आणि डेटा चोरीच्या बातम्यांमुळे युजर्सची चिंता वाढली आहे . त्यामुळेच केंद्रीय गृह मंत्रालयाने  देखील झूमचा वापर करताना सावधगिरी बाळगा,' असा इशारा दिला आहे. तसेच . तसेच अमेरिकेसह अनेक देशात झूम 

#मायक्रोसॉफ्ट स्काइप मधील मीट नाऊ अ‍ॅप व्हिडिओ कॉलिंग करता येते  ज्यांच्याकडे स्काइपचे अकाउंट नाही, ते देखील  व्हिडिओ कॉलिंग करू शकतात.

उपलब्ध फीचर्स

- कॉल रेकॉर्डिंग,

- मायक्रोफोन चालू बंद करता येते

-   ३० दिवसांपर्यंत रिकॉर्डिंग करता येते

.-  प्रेझेटेंशन देता येते

जास्तीत जास्त 50 वापरकर्ते एकाच वेळी व्हिडिओ कॉल करू शकतात, हे सर्व विनामूल्य.

स्काईप मीट नाऊसह सुरु  करण्यासाठी आपल्याला फक्त  वेबपृष्ठावर जावे लागते

मायक्रोसॉफ्ट टिम

व्हिडिओ कॉल च्या व्यतिरिक्त ऑफिसचे अनेक कामे करायची असल्यास  आपण मायक्रोसॉफ्ट टीम्स चा विचार नक्कीच  करू शकता. सध्या  साथीच्या काळात विनामूल्य उपलब्ध आहे. विनामूल्य आवृत्तीमध्ये अमर्यादित चॅट आणि शोध, ग्रुप  आणि एकल ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग आणि 10 जीबी टीम फाईल स्टोरेज आहे जे प्रति व्यक्ती 2 जीबी वैयक्तिक फाईल स्टोरेज आहे. मायक्रोसॉफ्ट आपल्या मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या ग्रुप चॅट फीचरमध्ये 250 पर्यंत यूजर्सची मर्यादा वाढवण्यावरही काम करत असल्याचे उघडकीस आले. आता सुमारे 100 सहभागी मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या ग्रुप चॅटमध्ये सामील होऊ शकतात.

Cisco WebEx

हे व्यवसायाच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहे. वेब एक्सवर एकाचवेळी १०० लोकांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलता येते. सर्वात महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे यात व्हिडिओ कॉलिंगसाठी अनलिमिटेड वेळ मिळते. व्यावसायिक बैठका किंवा इतर चर्चांसाठीही हे अॅप फायदेशीर आहे.

गुगल ड्युओ (Duo)

गुगल ड्युओ (Duo)ऍन्ड्राइड ऍपच्या माध्यमातून एकाच व्यक्तीला व्हिडिओ कॉलिंग करता येत होती.  आता  एकाचवेळी अनेक लोकांना व्हिडिओ कॉलिंग करण्याकरिता  गुगलने 'लाइट मोड' नावाचे  फिचर आणले आहे.

यात ज्या लोकांना व्हिडिओ कॉलिंग करायचे आहे, अशा लोकांच्या फोननंबरची यादी युजर्सने करायची असते  आणि त्यांनतर त्याला   व्हिडिओ कॉलिंग करता येते  व्हिडिओ कॉलिंग करताना युजर्सला फोनच्या डाव्या बाजूस निवडलेली यादी दिसणार आहे. तसेच युजर्सला ज्या लोकांना व्हिडीओ कॉलिंग करायचे आहे. अशा सदस्यांची यादीतून निवड करुन त्यांना व्हिडिओ कॉल केला जाऊ शकतो.काही दिवसांपूर्वी गुगलने आपला व्हिडीओ कॉलिंग ऍप गुगल ड्युओ (Google Duo) अपडेट केलं, ज्यानंतर एकावेळी 12 लोक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकत होते  आणि आता गुगलने ही संख्या 32 वर केली आहे.

गुगल ड्युओच्या  'लाइट मोड'चा युजर्सला आणखी एक फायदा होणार आहे. 'लाइट मोड'मुळे युजर्सला अंधारात किंवा कमी प्रकाशातदेखील चांगले चित्र दिसणार आहे.

वैशिष्टयै

फोन नंबरवरूनच कनेक्टिंग होते म्हणून  वेगळे युजरनेम किंवा पासवर्डची गरज पडत नाही.

 :- ड्युओवरून केलेले कॉल्स एंड-टू-एंड एनस्क्रीप्टेड असतात त्याने खासगी सुरक्षा जपली जाते.

गुगलकडूनही याचा डाटाचा कुठलाही वापर केला जात नाही.

 -  ‘नॉक नॉकया फीचरद्वारे कॉल उचलण्यापूर्वीच कॉलरचा लाइव्ह व्हिडीओ पाहता येतो.

 

गूगल हँगआउट

 झूमसाठी एक चांगला विनामूल्य पर्याय आहे. यामध्ये, आपण एका व्हिडिओ कॉलमध्ये सुमारे 10 वापरकर्ते जोडू शकता किंवा एकाच वेळी 150 पर्यंत वापरकर्त्यांशी चॅट करू शकता. मोबाईल डिव्हाइसवर वापरण्यासाठी अ‍ॅप मोबाइल अ‍ॅपचा पर्यायही आपल्याला   उपलब्ध आहे   पैसे भरून आपण त्याचे प्रीमियम सदस्यता देखील घेऊ शकतो , ज्यात आपण व्हिडिओ कॉलमध्ये सुमारे 25 वापरकर्ते जोडू शकता.

अद्यावत बदल :आता याचे नाव गुगल मीट ठेवले आहे. यात एकाचवेळी ४९ लोक सहभागी होऊ शकतात. जी सूट इंटरप्राइज युजर्स एकाचवेळी २५० लोकांसोबत मीटिंग करू शकतात.

 

गो टू मीटिंग

 स्टँडर्ड एंड-टू-एंड एंक्रिप्शनला ही सपोर्ट करते. १५० लोकांसह व्हिडिओ मीटिंगची सुविधा असणाऱ्या या अपमध्ये . १४ दिवसांसाठी ट्रायल प्लॅन उपलब्ध आहे

Whereby

फोनच्या ब्राऊझरमध्ये whereby.com टाइप करून व्हिडिओ कॉलिंग करता येवू शकते. यात ५० लोकांना एकत्र मीटिंग करता येवू शकते.

 

जितसी मीट:

यावरून जास्तीत जास्त ७५ जणांना व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग करता येते हा ओपन सोर्स प्रोजेक्ट आहे. यात स्लॅक, गुगल कॅलेंडर आणि ऑफिस ३६५ चा सपोर्ट दिला आहे.

कोरोनाव्हायरसच्या झपाट्याने वाढत असलेल्या लॉकडाउनला वकिलांनी त्यांच्या खटल्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना न्यायालयात आपला खटला व्यवस्थित मांडता यावा यासाठी आता जितसी मीटद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेची व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यासाठी वकिलांना जितसी मीट Play Store वरून डाउनलोड करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. हे मोबाइल (Android आणि आयफोन), लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर कार्य करते. काही कारणास्तव अर्जावर सुनावणी न झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडिओ कॉलद्वारे सुनावणी होईल.

#अनेक लोकप्रिय अ‍ॅप आहेत, ज्यांचा उपयोग व्हर्च्युअल मीटिंग्ज साठी करता येऊ शकतो. जसे की StarLeaf ,Signal पर्याय उपलब्ध आहे.

लेखक : प्रा य़ोगेश अशोक हांडगे 

(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment