फेसअॅपवर कळेल कि तुम्ही
म्हतारपणी कसे दिसाल
तरुणाईला सोशल मीडियाच्या विविध
अँप ने भुरळ घातलेली आहे .गुगल प्लेवरुन १० कोटी युझर्सने तर आयफोन वापरणाऱ्या ५०
कोटी युझर्सने हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्याचे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे.
सध्या सर्वीकडेच तरुणाईमध्ये आपण म्हातारपणी कसे दिसू याचीच चर्चा आहे ,कारण आहे , म्हातारपणी तुम्ही
कसे दिसाल, हे दर्शविणारे फेसअॅप FaceApp सोशल मीडियावरून व्हायरल झालेले आहे. अनेकांनी गूगल प्ले-स्टोअरवरून म्हातारपणात
तुम्ही कसे दिसाल,
हे दर्शविणारे संबंधित अॅप :फेसअॅप
FaceApp डाउनलोड करण्यास सुरुवात केलीली आहे.बड्याबड्या स्टार्सपासून
सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांनी या App च्या मदतीने आपल्या
म्हातारपणीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
या फेसअॅपची माहिती
फेसअॅप हे 2017 साली लाँच करण्यात आले होते
रशियन कंपनी वायरलेस लॅब (Wireless Lab) ने FaceApp (फेसअॅप)
हे App तयार केलेले आहे.
या अँपमध्ये तुम्ही तुमचा सध्याचा फोटो यामध्ये अपलोड केलात तर तुम्ही म्हातारपणी
कसे दिसाल ते हे अॅप दाखवते. अशा
प्रकारचे बहुतांश अॅप रशियातील कम्प्युटर अभियंत्यांनी तयार केले आहेत.
या अॅपमध्ये अनेक पर्याय
म्हणजेच फिल्टर्स आहेत आणि
त्यातीलच ओल्ड फेस फिल्टर
लोकप्रिय झालेले आहे तसेच . या अॅपमध्ये
इतर अनेक फिल्टर आहेत. म्हणजे तरुण रुप पाहण्यासाठीचे फिल्टर, केसांचा रंग
बदलण्याचे, चेहऱ्यावर मेकअप
करण्याचे तसेच क्रूर हास्य चेहऱ्यावर आणण्याचेही फिल्टर या अॅपमध्ये आहे.फेसअॅप
हे आयओएस आणि अॅन्ड्रॉईड अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.
फोर्ब्स’ने दिलेल्या
वृत्तानुसार १५ कोटीहून अधिक लोकांचा डेटा आता ‘फेसअॅप’ची मालक कंपनी
असणाऱ्या ‘वायरलेस लॅब्स’ या रशियन कंपनीकडे
आहे.
या अॅप्लिकेशनमधील
सर्वात लोकप्रिय फिल्टर असणाऱ्या ‘ओल्ड एज फिल्टर’च्या माध्यमातून
डेटा चोरी होत असल्याचे सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे. युझर्सच्या मोबाइलमधील खासगी
माहिती आणि ओळख सांगणारा सर्व डेटा या मोफत मिळणाऱ्या अॅप आणि फिल्टरच्या
माध्यमातून कंपनीच्या सर्व्हरवर अपलोड झाला असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अॅप्लिकेशनच्या नियम आणि अटींमुळे अॅप
इन्स्टॉल करताना अनेक युझर्सने त्यांचा डेटा कंपनीला दिला आहे. युझर्सने
अॅप्लिकेशन इन्स्टॉल करताना दिलेल्या परवाणगीनुसार युझर्सच्या डेटामध्ये कंपनी
फेरफार शकते, पुन:निर्मित करु
शकते किंवा तो छापण्यासाठीही वापरु शकते असे नमूद करण्यात आले आहे.
आर्टिफिशियल (AI) इंटेलिजन्स अल्गोरिदम म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता न्यूरल नेटवर्क
यांचा वापर:
हे App कृत्रिम
बुद्धिमत्ता म्हणजे 'आर्टिफिशअल इंटेलिजन्स'(AI ) तंत्रज्ञानाचा वापर करते आणि त्याच्या अल्गोरिदमद्वारे काम करते. याच्याच मदतीने
युजर्सचा चेहरा कसा दिसेल हे सांगितले जाते. युजर्सना म्हातारे दाखवण्यासाठी, सुरकुत्या किंवा
पांढरे केस दाखवण्यासाठी न्यूरल नेटवर्कचा वापर केला
वापरणाऱ्यांची प्रायव्हसी धोक्यात
तुम्ही फेसअॅपचा वापर करत असाल तर तुम्ही अॅपला तुमचे फोटो, नाव, युजरनेम यासह
तुम्हाला काय आवडतं या गोष्टींची माहिती वापरण्याची परवानगी देत आहात.आयओएस
युजर्ची सुद्धा या अॅपमुळे प्रायव्हसी धोक्यात आल्याचं आहे. सेटींगमध्ये Allow FaceApp to Access मध्ये Photos Never असं सेट
केल्यानंतरही फोनधील फोटो अॅपला अॅक्सेस करता येतात. फेसअॅप वापरण्यापूर्वी फोनमधील डाटा
वापरण्याची वापरण्याची परवानगी विचारली जाते ती दिल्यास फोनमधील संपूर्ण फोटो, व्हिडीओ आणि इतर माहिती संबंधित अॅप तयार करणाऱ्या कंपनीच्या
सर्व्हरवर सेव्ह होते. हा डाटा संबंधित कंपनी कोणत्याही कारणासाठी कधीही व कुठेही
वापरू शकते व त्यासंदर्भात वापरकर्त्याला कायदेशीर दादही मागता येत नाही, असे अॅपला परवानगी देताना येणाऱ्या संदेशात नमूद असते. परंतु, हि माहिती फोनच्या स्क्रीनवर दिसत नाही.
अमेरिकेच्या खासदारांनाही वाटतेय भीती
या अॅपमुळे माहितीची चोरी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
त्यामुळेच या अॅपचा तपास केला जावा, अशी मागणी अमेरिकेच्या एका वरिष्ठ खासदारानं
सिनेटमध्ये केली. फेसअॅप प्रकरणाचा तपास एफबीआयनं करावा, या मागणीसाठी
संबंधित खासदारानं संस्थेच्या प्रमुखांना पत्रदेखील लिहिलं. फेसअॅपच्या
माध्यमातून रशिया माहिती गोळा करत असल्याचा संशय खासदारानं व्यक्त केला.
लेखक : प्रा य़ोगेश अशोक हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
Mobile: 9423077963
No comments:
Post a Comment