मतदारांसाठी उपयोगी ॲप
या लेखात राज्य निवडणूक आयोगाने आणलेल्यामतदारांसाठी उपयोगी मोबाईल अॅप्सचा उहापोह करु या
ट्रू वोटर ॲप-या ॲपचा उपयोग मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र किंवा यादीतील आपलाक्रमांक मोबाइलमध्येएका क्लिकवर आपल्याला शोधण्याकरिता होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आणलेल्या ‘ट्रू वोटर’ हे ॲप मतदारांकरिता उपलब्ध करून दिले आहे
या लेखात राज्य निवडणूक आयोगाने आणलेल्यामतदारांसाठी उपयोगी मोबाईल अॅप्सचा उहापोह करु या
ट्रू वोटर ॲप-या ॲपचा उपयोग मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र किंवा यादीतील आपलाक्रमांक मोबाइलमध्येएका क्लिकवर आपल्याला शोधण्याकरिता होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आणलेल्या ‘ट्रू वोटर’ हे ॲप मतदारांकरिता उपलब्ध करून दिले आहे
ट्रू वोटर अॅपद्वारे मतदारांचा विधानसभा, यादी भाग अनुक्रमांक, स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता याचा शोध घेणे, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी पाहणे, मतदानाबाबतची माहिती घेणे, स्वत:ची माहिती फोटोसहित अद्ययावत करणे, सोबत आधार तसेच मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत करणे, कुटुंब व मित्रांचा गट तयार करणे, गैरहजर, स्थलांतरीत, मयत व बोगस मतदारांना चिन्हांकित करुन कळविणे, स्वत:चे मत सिक्युरिटी प्रश्नाद्वारे सुरक्षित करणे, आपात्कालीन परिस्थितीत तातडीने दूरध्वनी क्रमांक जतन करणे, एकाच मोबाइलद्वारे अनेक मतदारांची नोंदणी करता येणे शक्य आहे. निवडणुकीचा निकाल पाहणे,इत्यादी कामे सहजपणे या अॅप द्वारे करता येणार आहे.
सिटीझन ऑन पेट्रोल (कॉप)
“कॉप” चा मुख्य उद्देश हा निवडणूक प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालणे हा आहे.
या ॲपच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये एखादा पक्ष किंवा उमेदवार आचारसंहितेचा भंग करीत असेल तर त्याची तक्रार आता आपल्याकडे असलेल्या मोबाईलवरून थेट निवडणूक यंत्रणेकडे करता येणार आहे
या अॅपच्या नावातच जनतेची गस्त किंवा नजर असा आशय सामावला आहे. या अॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारही निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवू शकतील.
या ॲपच्या माध्यमातून प्रचाराच्या कालावधीत काही गरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह तो प्रकार अॅपद्वारे तात्काळ निवडणूक यंत्रणांच्या निदर्शनास आणून देता येईल.
या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर जलद गतीने कारवाई करने आहे . या अॅपद्वारे तक्रार करणा-याचे नाव गोपनीय ठेवण्याची व्यवस्था आहे.
प्रचाराच्या कालावधीत काही गरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह तो प्रकार अॅपद्वारे तात्काळ निवडणूक यंत्रणांच्या निदर्शनास आणून देता येईल. त्यानंतर निवडणूक संनियंत्रण समिती त्यावर योग्य ती कार्यवाही करेल.
या कॉपद्वारे मतदारांना पुढील गैर प्रकाराना आळा घालणे सहज शक्य झालेले आहे : पैसे, भेटवस्तू , मद्य वाटप, शस्त्र बाळगणे , सरकारी गाड्यांचा गैरवापर,लहान मुलांचा वापर, प्राण्यांचा वापर,घोषणा व जाहिराती, पेड न्यूज, सोशल मिडिया, प्रचार रॅली,, प्रार्थना स्थळांचा वापर, भूमिपूजन व उद्घाटन समारंभ, ध्वनिक्षेपकाचा गैरवापर, इत्यांदीसाठी सिटीझन ऑन पेट्रोल हे ॲप वापरता येईल.
या अॅपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नागरिक सुलभपणे दाखल करू शकतील. तसेच मतदारांना उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता येईल व गैर आढळल्यास छायाचित्रासह त्याची तात्काळ तक्रार नोंदवता येईल. झालेल्या कारवाईचा अहवाल देखील तक्रारदारास अॅपमार्फत दिसून येईल.
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment