Friday, 26 July 2019

प्रिंटिंग तंत्रज्ञान

प्रिंटिंग तंत्रज्ञान  अभ्यासक्रम

१४५३ साली जोहान्स गटेनबर्ग यांनी जर्मनीमध्ये प्रिंटिंगच्या तंत्राचा शोध लावला असं सांगितलं जातं. तेव्हापासून आतापर्यंत प्रिंटिंगच्या क्षेत्रात अनेक प्रकारचे बदल होत गेले आहेत.स्क्रीन प्रिंटींगसारख्या लघुउद्योगापासून  ऑफसेट प्रिंटींग सारख्या मोठ्या प्रमाणावरील उद्योगात अनेक प्रकारचे बदल झालेले आहेत .ऑफसेट प्रिंटिंग’ सारख्या तंत्रज्ञानामधून मुद्रण कलेमध्ये आमूलाग्र क्रांती घडून आली. सातत्याने मुद्रित माध्यमामध्ये नवीन माध्यमांची भर पडत असल्यामुळे मुद्रण व्यवसायाला महत्व प्राप्त झाले आहे दैनिके, साप्ताहिके, मासिके,नियतकालिके यांचा वाढता वापर असल्याने या क्षेत्राला महत्त्व आले आहे.छपाई यंत्रणा अभियांत्रिकीमध्ये  विविध मुद्रण तंत्रज्ञान  शिकविली जातात या पदवीनंतर नोकरी व स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतात . प्रिंटिंग क्षेत्रातील डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रिटिंग क्षेत्रात नोकरी आणि व्यवसायात मोठ्या संधी आहेत.वह्या, पुस्तके, गाइड, संदर्भग्रंथ, फ्लेक्स, निरनिराळ्या जाहिराती यांची छपाई आता प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमुळे सोपी झालेली आहे


अभ्यासक्रम
या अभ्यासक्रमामध्ये  प्रिंटिंग प्रोसेसेस, टेक्नॉलॉजी व सिस्टिम्सचा विस्तृत शिक्षण आहे. ज्यात  ऑफसेट प्रिंटिंग, फ्लेक्सोग्राफी, डिजिटल इमेज अँड प्रिंटिंग , पेपर अँड बोर्ड्स यांचा तांत्रिक अभ्यास केला जातो.
आवश्यक गुण :कल्पक, सर्जनशील व्यक्तिमत्त्व
शैक्षणिक अर्हता: 
दहावी पास  :दहावीच्या परिक्षेत ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रिंटिंगच्या पदविका अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो
दहावी नापास :दहावी नापास व कमी गुण पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा सरकारमान्य कोर्स आहे.
तसेच  बारावी उत्तीर्ण व  ग्रॅज्युएशन  झालेल्या विद्यार्थ्यांना देखील विविध अभ्रासक्रम आहेत .
प्रिंटिंगचं शिक्षण देणा-या संस्था 
---वेस्टर्न रिजनल इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स कॅम्पस, मुंबई 
अभ्यासक्रम: डिप्लोमा 
कालावधी:तीन वर्ष
शैक्षणिक अर्हता : किमान दहावी उत्तीर्ण 
---महाराष्ट्र मुद्रण शाळा,सदाशिव पेठ,पुणे
अभ्यासक्रम :  मुद्रण तंत्रज्ञानातील पदविका अभ्यासक्रम
कालावधी :तीन वर्ष
---स्पायसर महाविद्यालय ,गणेशखिंड,पुणे
 अभ्यासक्रम :ग्राफिक आर्ट प्रिंटिंग मध्ये  पदविका आणि पदवी अभ्यासक्रम सुरु आहे
कालावधी: पदविका अभ्यासक्रम दोन वर्षांचा तर पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा
प्रिंटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम शिक्षण देणा-या संस्थांची नावं
---स्कूल ऑफ प्प्रिंटिंग  टेक्नॉलॉजी ,डॉ. डी.एन. रस्ता,मुंबई
अभ्यासक्रम: डिप्लोमा इन लेटरप्रेस
कालावधी:तीन वर्ष
शैक्षणिक अर्हता : किमान दहावी किंवा समकक्ष परीक्षा उतीर्ण
---महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, पुणे 
अभ्यासक्रम: डिप्लोमा 
कालावधी:तीन वर्ष
शैक्षणिक अर्हता : किमान दहावी उत्तीर्ण 
---एमएच साबू सिद्दिक इन्स्टिट्यूट,शेफर्ड स्टेशन भायखळा,मुंबई
अभ्यासक्रम:सर्टिफिकेट इन कंम्पोजिंग (ऍडव्हान्स) हा तीन वर्ष कालावधीचा
प्रमाणपत्र अभ्यासक्रम .
शैक्षणिक अर्हता : किमान १० वी उत्तीर्ण .
कालावधी:तीन वर्ष
---पुणे विद्यार्थीगृहाचे (पीव्हीजी’ज्) कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, पुणे 
अभ्यासक्रम: डिप्लोमा,डिग्री, मास्टर्स 
नोकरीची संधी :
वर्तमानपत्राची छपाई केंद्रे, प्रिंटिंग प्रेस त्याचप्रमाणे फ्लेक्सोग्राफी, ऑफसेट, स्क्रीन प्रिंटिंग करणा-या संस्था, पब्लिशिंग हाऊसेस, डिझायनिंग आणि डिजिटल प्रिंटिंग,  सर्व क्षेत्रांमध्ये प्रिंटिंगचा वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित काम करणा-या संस्थांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
 -स्वत:ची प्रिंटिंग प्रेसही सुरू करू शकतो.
-पत्रकार, लेखक, प्रकाशक, जाहिरातदार, शासकीय पत्रके, प्रकाशने यांना मुद्रित तंत्रज्ञानाची सातत्याने आवश्यकता भासते
-प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचं शिक्षण देणा-या संस्थांमध्ये लेक्चरर म्हणून संधी आहे

लेखक : प्रा योगेश हांडगे  
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment