आजकाल सर्वांकडेच उत्तम क्वालिटीचा मोबाईलवरु आहे त्यावरून आजची तरुणाई विविध व्हिडीओ शूट करत असतात . शूट केलेले व्हिडीओ फेसबुकवर उपलोड करत असतात.कुठलाही व्हिडीओ शूट करण्याचा छंदच तरुणाईला जडलाय. तरुणाई केवळ फेमस होण्याकरिता फेसबुकवर व्हिडीओ उपलोड करीत असते परंतु फेमस होण्याबरोबरच पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी ट्यूब चॅनेलचा विचार केला पाहिजे आणि स्वतः:चे ट्यूब चॅनेल सुरु करायला हवे .
सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसा कमावण्याचा नवीन मार्ग ट्यूब चॅनेलमुळे निर्माण झाला आहे.
या ट्यूब चॅनेलबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया:
यू ट्यूब चॅनेलचा कसा सुरु करावा ?
ट्यूब चॅनेल सुरु करण्याकरिता फक्त एक गूगल अकाऊंट क्रिएट करावे लागते . या एका अकाऊंटवरुन ब्लॉग तसेच जीमेलही अॅक्सेस करता येतात .
गूगल अकाऊंट क्रिएट केल्यानंतर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी यू ट्यूब चॅनेल क्रिएट करावे . यू ट्यूबच्या माय चॅनेल फीचरच्या माध्यमातून स्वतः:चा चॅनेल क्रिएट करता येतो . तिथे व्हिडीओ, स्लाईड शोच्या स्वरुपात व्हिडीओ अपलोड करता य्रेतो . तसेच तिथे व्हिडीओ अपलोज, व्ह्यूज इत्यादी गोष्टी संग्रहित करता येतात . तयार केलेल्या यू ट्यूब चॅनेलला जास्त आकर्षक करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता तसेच चॅनेल सुरक्षित ठेवण्यासाठी विविध सेटिंग्जमध्ये उपलब्ध आहेत.व्हिडीओ अपलोड करण्यासाठी व्हिडीओ मॅनेजरची मदत घेता येते . तसेच व्हिडीओ रे एडिट करण्याच्या सुविधा देखील तिथे दिलेल्या आहेत .
यू ट्यूब चॅनेलवर अपलोड करण्याकरीता व्हिडीओ कसा असावा?
यू ट्यूब चॅनेलवर अपलोड करण्याकरीता व्हिडीओ हटके विषयाचे असायला हवेत.जे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील काहीतरी वेगळे व्हिडीओत असेल तरच युसर्स तुमचा व्हिडीओ पूर्ण पाहण्यासाठी वेळ देतील . स्वतः:च्या यू ट्यूब चॅनेलवर स्वत:च्या हक्काचेच/मालकीचे व्हि़डीओ अपलोड करावे इतरांच्या कॉपिराईटचे व्हि़डीओ अपलोड करु नये.
महत्वाची सूचना : ऑडिओ हा तुम्ही तयार केलेला हवा. शिवायकॉपिराईट चा भंग होता कामा नये ही काळजी घेतली तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.
यू ट्यूब चॅनेलवरील व्हिडीओद्वारे पैसे मिळवा :
यू ट्यूब चॅनेलवरील व्हिडीओद्वारे पैसे मिळवण्यासाठी गूगल अॅडसेन्स अकाऊंट तयार करावे . हे अॅडसेन्स गूगलच्या जाहिरातीच्या माहितीचे ऑफिशिअल टूल आहे. इथे तुम्हाला तुम्हाला तुम्ही अपलोड केलेल्या तुमच्या व्हिडीओसंदर्भात कुणी आणि किती जणांनी व्हिडीओ पाहिला ,त्यांच्या कमेंट्स किती वगैरे सर्व माहिती मिळते. तसेच एखाद्या व्हिडीओच्य जाहिरातीतून किती पैसे मिळतील याचीही माहिती तुम्हाला मिळते .
अॅडसेन्स अकाऊंट तयार केल्यानंतर यूट्यूबच्या सेटिंग्जमध्ये असलेले यू ट्यूबचे मोनेटायझेशन फीचर सुरु करावे . मोनेटायझेशन सुरु केल्यानतंर यू ट्यूबकडून तुमच्या माहितीची सविस्तरपणे शहानिशा केली जाते आणि तुम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी परवानगी दिली जाते.तुम्हाला जाहिराती निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो या मोनेटायझेश फीचरमुळे तुमच्या व्हिडीओमध्ये जाहिराती दिसण्यास सुरुवात होऊन त्याचे पैसेही तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते.
तुमच्या आवडीच्या विषयांची माहिती, खेळाची , रेसिपीची माहिती व्हिडीओच्या रुपात तुम्ही तुमच्या चॅनेलवर अपलोड करु शकता. आणि आवडीच्या तसेच छंदाच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकतात . फॅशन, धार्मिक,संगीत, न्यूज,बिझनेस, कला,कॉमेडी यांचे हटके व्हिडीओ बनवून अनेक लोक पैसे कमावत आहेत
तुमच्या यू ट्यूब चॅनेलवर व्हिडीओ अपलोड झाले आणि त्यावर जाहिराती सुरु झाल्या तर पैसे मिळायला सुरु होतात . १०० डॉलरची कमाई झाल्यावर पैसे तुमच्या अकॉउंट वर जमा होतात .
व्हिडीओच्या हिट्स वाढविण्याकरिता सोशल मीडियाचा वापर:
यू ट्यूबवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर फेसबुक, ट्विटर या शेअर सोशल मीडियावर व्हिडीओची लिंक शेअर केल्याने व्हिडीओच्या हिट्स वाढतात. जेवढ्या जास्त हिट्स , तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैसे कमवता येतो
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )