Tuesday, 26 December 2017

यू ट्यूब चॅनेल सुरु करा आणि पैसे कमवा


यू ट्यूब चॅनेल सुरु करा आणि  स्वत:चे आवडीचे व्हिडीओ अपलोड करून पैसे कमवा 
आजकाल सर्वांकडेच उत्तम क्वालिटीचा  मोबाईलवरु आहे त्यावरून आजची तरुणाई विविध   व्हिडीओ शूट करत असतात . शूट केलेले  व्हिडीओ फेसबुकवर उपलोड करत असतात.कुठलाही व्हिडीओ शूट करण्याचा छंदच तरुणाईला जडलाय. तरुणाई केवळ फेमस होण्याकरिता फेसबुकवर व्हिडीओ उपलोड करीत असते परंतु फेमस होण्याबरोबरच पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी ट्यूब चॅनेलचा विचार केला पाहिजे आणि स्वतः:चे ट्यूब चॅनेल सुरु करायला हवे . 
सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसा कमावण्याचा नवीन मार्ग  ट्यूब चॅनेलमुळे निर्माण झाला आहे.
या  ट्यूब चॅनेलबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया:
यू ट्यूब चॅनेलचा कसा सुरु करावा ?
ट्यूब चॅनेल सुरु करण्याकरिता  फक्त एक गूगल अकाऊंट क्रिएट करावे लागते . या एका  अकाऊंटवरुन ब्लॉग तसेच जीमेलही अॅक्सेस करता येतात .
गूगल अकाऊंट क्रिएट केल्यानंतर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी यू ट्यूब चॅनेल क्रिएट करावे . यू ट्यूबच्या माय चॅनेल फीचरच्या माध्यमातून स्वतः:चा  चॅनेल क्रिएट करता येतो . तिथे  व्हिडीओ, स्लाईड शोच्या स्वरुपात व्हिडीओ अपलोड करता य्रेतो . तसेच तिथे   व्हिडीओ अपलोज, व्ह्यूज इत्यादी गोष्टी संग्रहित करता येतात . तयार केलेल्या  यू ट्यूब चॅनेलला जास्त आकर्षक करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता  तसेच चॅनेल सुरक्षित ठेवण्यासाठी विविध सेटिंग्जमध्ये   उपलब्ध  आहेत.व्हिडीओ अपलोड करण्यासाठी व्हिडीओ मॅनेजरची मदत घेता येते . तसेच  व्हिडीओ रे एडिट करण्याच्या  सुविधा देखील तिथे दिलेल्या आहेत . 

 यू ट्यूब चॅनेलवर अपलोड करण्याकरीता  व्हिडीओ कसा असावा?

यू ट्यूब चॅनेलवर अपलोड करण्याकरीता  व्हिडीओ हटके विषयाचे  असायला हवेत.जे  प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील काहीतरी वेगळे व्हिडीओत असेल तरच युसर्स तुमचा व्हिडीओ पूर्ण पाहण्यासाठी वेळ देतील . स्वतः:च्या यू ट्यूब चॅनेलवर स्वत:च्या  हक्काचेच/मालकीचे व्हि़डीओ अपलोड करावे इतरांच्या कॉपिराईटचे   व्हि़डीओ अपलोड करु नये. 
महत्वाची सूचना : ऑडिओ हा तुम्ही तयार केलेला हवा. शिवायकॉपिराईट चा भंग होता कामा नये ही काळजी घेतली तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.
यू ट्यूब चॅनेलवरील  व्हिडीओद्वारे  पैसे मिळवा :
 यू ट्यूब चॅनेलवरील  व्हिडीओद्वारे पैसे मिळवण्यासाठी  गूगल अॅडसेन्स अकाऊंट तयार करावे . हे  अॅडसेन्स गूगलच्या जाहिरातीच्या  माहितीचे ऑफिशिअल टूल आहे. इथे तुम्हाला  तुम्हाला तुम्ही अपलोड केलेल्या तुमच्या व्हिडीओसंदर्भात कुणी आणि किती जणांनी व्हिडीओ पाहिला ,त्यांच्या कमेंट्स किती वगैरे सर्व माहिती मिळते.  तसेच  एखाद्या व्हिडीओच्य जाहिरातीतून किती पैसे मिळतील याचीही  माहिती तुम्हाला मिळते . 
अॅडसेन्स अकाऊंट तयार केल्यानंतर यूट्यूबच्या सेटिंग्जमध्ये असलेले यू ट्यूबचे  मोनेटायझेशन फीचर सुरु करावे .  मोनेटायझेशन सुरु केल्यानतंर यू ट्यूबकडून तुमच्या  माहितीची सविस्तरपणे शहानिशा केली जाते आणि  तुम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी परवानगी दिली जाते.तुम्हाला जाहिराती निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो या मोनेटायझेश फीचरमुळे तुमच्या व्हिडीओमध्ये जाहिराती दिसण्यास सुरुवात होऊन  त्याचे पैसेही तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते.
तुमच्या आवडीच्या विषयांची माहिती, खेळाची , रेसिपीची माहिती  व्हिडीओच्या रुपात  तुम्ही तुमच्या चॅनेलवर अपलोड करु शकता. आणि आवडीच्या तसेच छंदाच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकतात . फॅशन, धार्मिक,संगीत, न्यूज,बिझनेस, कला,कॉमेडी यांचे हटके व्हिडीओ बनवून अनेक लोक पैसे कमावत आहेत 
तुमच्या यू ट्यूब चॅनेलवर व्हिडीओ अपलोड झाले  आणि त्यावर जाहिराती सुरु झाल्या तर  पैसे मिळायला सुरु होतात  . १००  डॉलरची कमाई झाल्यावर  पैसे तुमच्या अकॉउंट वर जमा होतात .
व्हिडीओच्या हिट्स वाढविण्याकरिता सोशल मीडियाचा वापर:
 यू ट्यूबवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर फेसबुक, ट्विटर या  शेअर सोशल मीडियावर व्हिडीओची लिंक  शेअर   केल्याने व्हिडीओच्या हिट्स वाढतात.  जेवढ्या जास्त हिट्स , तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैसे कमवता येतो 
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

Wednesday, 20 December 2017

सोशल मीडियावर प्रचार जोरात

सोशल मीडियावर प्रचार जोरात

मतदारसंघाचा  सिंह....   छावा.. वाघ , ...   वादळ  .. विकासपुरुष वैगरे  ही एरवी सहजतेने उच्चारलेली जाणारी बिरूदे आता फेसबुकवरून व व्हाट्सअपवरून  मतदारसंघात  प्रचाराच्या केंद्रस्थानी आली आहेत. अगदी छोट्या छोट्या निवडणुकीतही समर्थक कार्यकर्त्यांची शाब्दीक जुगलबंदीही निवडणुकीतील रंगत वाढवू लागली आहे. एकूणच लोकसभा, विधानसभा,नगरपरिषद निवडणुकीच्या पाठोपाठ आता  ग्रामपंचायत तसेच सोसायटीच्या  प्रचाराचा धडाका या माध्यमातून फेसबुकवरूनही जोमात सुरू असल्याचे चित्र आहे.
जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून फेसबुक, व्हॉटस् अॅप  या सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक केला जात आहे. मतदार संघाच्या नावाने व्हॉटस् अॅपचे ग्रुप तयार झाले आहेत. या सोशल मीडियावरून प्रचार केला जात असला तरी त्याचा बदनामीसाठी सुद्धा वापर झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत तरी वातावरण प्रदूषित होऊ नये हि काळजी तरुणांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा जेष्टांकडून व्यक्त होत असते
गेल्या काही वर्षांत सोशल नेटवर्किंग साईट्‌सना फार महत्व आले आहे हे. सुरवातील  फेसबुक आणि आता व्हाट्सअप  हे तरुणांच्या पसंतीला उतरले आहेत. तरुणांना या सोशल मीडियाचे एकप्रकारे व्यसनच लागलेले  आहे . राजकीय नेत्यांनी हे ओळखलेले आहे म्हणूनच नेत्यांनीही या क्षेत्रातही शिरकाव केला आहे. गेल्या काही वर्षांपासून छोट्या-मोठ्या निवणुकीच्या प्रचार आणि त्या अनुषंगाच्या चर्चा फेसबुकवरून तसेच व्हाट्सअपवरून  रोजच  झडत आहेत. दररोजच्या राजकीय घडामोडीं यावर  पोस्ट होत आहे .नेत्यांचे वाढदिवस व त्यांनी केलेले विकासकामे यांनाही प्रसिद्धी देण्याचे काम या पोस्टच्या माध्यमातून होत आहे  .मतदारसंघातील  वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे  समर्थक कार्यकर्त्यांची चालणारी परस्परांतील राजकीय जुगलबंदीही राजकीय नेत्यांच्या सभेसारखी रंगत आणणारी ठरत आहे.
तसेच मतदारसंघातील   नागरिकांचे मनोरंजनही या सोशल मीडियामुळे  होत आहे . मागे फेसबुकवर झळकलेले "शोले" आंदोलन व "भीक मांगो" आंदोलनाच्या पोस्टमुळे तर नागरिकांची हसून हसून वाट लागली होती . अभिनव आंदोलन करण्याचा एक पायंडाच या सोशल मीडियामुळे पडला आहे .
तसेच अधून मधून समाजकार्याच्याही पोस्ट जनहितासाठी या सोशल मीडियावर झळकत असतात

आयटी कायद्यातील कलम ६६ (अ) सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवार २४ मार्च २०१५ रोजी रद्द करण्यात आले

सोशल मीडियासंदर्भात आयटी कायद्यातील कलम ६६ (अ) सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवार २४ मार्च २०१५ रोजी रद्द करण्यात आले आहे. या कायद्यांतर्गत सोशल मीडियावर वादग्रस्त मजकूर टाकल्या प्रकरणी कारवाई केली जात होती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे कलमच रद्द केले आहे त्यामुळे या पुढे सोशल नेटवर्किंग साईटवर आक्षेपार्ह मजकूर टाकणा-याला या कलमाखाली कोणत्याही व्यक्तीला तात्काळ अटक करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी थांबणार असल्याच्या प्रतिक्रिया  युवकांकडून   व्यक्त केल्या गेल्यात 

सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल येणा-या काळात परिणामकारक ठरणार असून यामुळे भारतात इंटरनेट वापरकत्र्यांना अधिक स्वातंत्र्य, मोकळीक मिळणार आहे. आयटी कायद्यातील कलम ६६-अ कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी करू हा केंद्र सरकारचा युक्तिवाद पटणारा नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आयटी कायद्यातील हे कलमच रद्द केले आहे.  सोशल मीडियावर वादग्रस्त ठरू शकेल, असा मजकूर टाकणा-याला अटक करण्याची मुभा आयटी कायद्यातील कलम ६६ (अ) नुसार मिळत होती. मात्र प्रत्येक व्यक्तीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे, या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने हे कलमच रद्द केले आहे. आयटी म्हणजे माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ नुसार गेल्या अनेक वर्षांपासून काहींना अटक करण्यात आली त्यामुळे मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता.
फेसबुक, टि्वटर या सोशल नेटवर्कींग साईटसवरील आक्षेपार्ह मजकूराबद्दल तात्काळ अटकेचा अधिकार देणारे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (आयटी) कलम ६६ (अ) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केले. त्यामुळे यापुढे इंटरनेटवरील आक्षेपार्ह मजकूराबद्दल तात्काळ अटक करता येणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल येणा-या काळात परिणामकारक ठरणार असून, यामुळे भारतात इंटरनेट वापरकर्त्यांना अधिक स्वातंत्र्य, मोकळीक मिळणार आहे.
कलम ६६ (अ) स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या लोकशाही अधिकारांच्या मूळावर आघात करणारे आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.
तत्काळ नवा कायदा किंवा नव्या तरतुदी करून सोशल मीडियावर वचक ठेवणारे कलम आणायला हवे अशी मागणी युवकांकडून होत आहे
 सोशल मीडियावरून होणारे गुन्हे रोखण्यासाठी योग्य पद्धतीने नियमांची बांधणी करून पुन्हा सुधारित कलमाचा कायद्यात समावेश करायला हवा.
माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ मध्ये २००८ मध्ये बदल करण्यात आले होते. त्यापूर्वी हे कलम केवळ हॅकिंगशी निगडित होते. मात्र २००८ मध्ये त्यात बदल करून ६६ (अ ते एफ) या कलमांचा अंतर्भाव करण्यात आला. यातील मुद्दे स्पष्ट तसेच संवैधानिक ही नव्हते. या कलमामुळे कोणी लाईक किंवा कमेंट केले तरी त्यांना अटक होत असे. . मात्र हे कलम रद्द झाले आहे
. सध्या सोशल मीडिया फोफावला आहे. त्यामुळे त्याच्यावर जरब ही हवीच. सामाजिक शांती भंग होण्याच्या अनेक घटना घडत असतात. रिकामटेकडे लोक त्याचा वापर करून शांतता भंग करतात. त्यामुळे नवीन कायदा अस्तित्वात यायला हवा.
 सोशल मीडिया हा शब्द फार चर्चेचा  आहे. या माध्यमावर सर्वांना आपले विचार मांडता येतात.   या माध्यमात अनेक लोक आपली मते मुक्तपणे मांडायला लागले होते.
सोशल मीडियावर कोणी आक्षेपार्ह मजकूर टाकला तर त्याला अटक करण्याची तरतूद या कलमात होती. तशी अनेकांना अटकही झाली होती.मात्र आता हे कलम रद्द झाल्याचा आनंद युवकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे

लेखक:प्रा. योगेश हांडगे(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

Wednesday, 6 December 2017

ओएलएक्स आणि क्विकरच्या स्पर्धेत फेसबुकचे मार्केटप्लेस' फिचर : फेसबुकवरुन होणार खरेदी विक्री

ओएलएक्स आणि क्विकरच्या स्पर्धेत फेसबुकचे मार्केटप्लेस' फिचर : फेसबुकवरुन होणार खरेदी विक्री
हल्लीची तरुणाई ते अबालवृद्ध सर्रासपने ओएलएक्सवर  शॉपिंग करत आहे . 
सब कुछ बिकता है हि ओएलएक्सची जाहिरात फार लोकप्रिय झालीय . या साइट्सवरबुक्स-स्पोर्ट्स, रिअल इस्टेट, लाइफस्टाइल प्रॉडक्ट्स,  फॅशन अँण्ड ब्युटी, कार-बाइक्स, मोबाइल्स-टॅब्ज इत्यादी कॅटेगरीतले प्रोडक्टस  उपलब्ध आहेत . खरेदी-विक्रीसंदर्भातली माहिती भरून  ऑनलाइन पद्धतीने हे व्यवहार करता येतात त्यामुळे . वेळेची बचत होऊन  घरातली जुन्या वस्तूच्या  ठिकाणी  नवी येते . 
वापरलेल्या वस्तू घेण्यासाठी अथवा जुन्या वस्तू विकण्यासाठी  ओएलएक्सचा ऑनलाइन बाजार उपयोगात येतोय . 
आता तरुणाईत लोकप्रिय असलेल्या फेसबुकवरुनवरही मुंबईत ट्रायल बेसिसवर सुरु झालेल्या मार्केटप्लेस' फिचरद्वारे 
 आवडीचे सामान खरेदी करता येणार आहे तसेच  नको असलेले सामान विकताही  येणार आहे. ओएलएक्स आणि क्विकर याप्रमाणे हे फिचर काम करणार आहे. भारतामध्ये फेसबुकचे हे मार्केटप्लेस' फिचर ओएलएक्सशी स्पर्धा करेल.फेसबुकचे युजर्स जास्त असल्याने याचा  फेसबुकला अधिक फायदा होऊ शकतो. 
कसे असेल फेसबुकचे मार्केटप्लेस' फिचर :
या फीचरद्वारे युसर्सला  प्रोडक्टसाठी जाहिरात देता येईल तसरच  दुसऱ्यांनी दिलेल्या  जाहिराती सर्च करता येईल . 
मार्केटप्लस हे फिचर  अमेरिकेसह २५ देशांमध्ये अस्तित्वात असून जर्मनी, फ्रान्स आणि यूके समवेत १७ देशांमध्ये विकसित झालेले आहे  
फेसबुक अॅप्सच्या खाली तळाला  'शॉप' नावाचा पर्याय उपलब्ध असणार आहे त्यावर  क्लिक करून युसर्सला   विकायच्या वस्तूचा  फोटो अपलोड करता येईल  त्यानंतर इच्छुक करेदीदार  तुमच्यापर्यंत पोहोचू शकेलं . 
विविध  कॅटगरीत तुम्हाला वस्तू विकत येतील  
कंपनीतर्फे  डिलीव्हरीही होणार  आहे. पैशांचा व्यवहारासाठी दुसरा कुणी मध्यस्त नसून व्यवहार  थेट फेसबूकशीच होणार असल्याने सर्व्हिस चार्ज म्हणून  पैसे कट होणार नाहीत.
लेखक : प्रा योगेश हांडगे  
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

रोबोमॅन : सौदी अरेबियाचे रोबोटला नागरिकत्व तर त्याहीपुढे जात न्यूजीलंडच्या वैज्ञानिकांनी बनवला राजकारणी रोबोट बनवला आहे

रोबोमॅन : सौदी अरेबियाचे रोबोटला  नागरिकत्व तर  त्याहीपुढे जात न्यूजीलंडच्या वैज्ञानिकांनी बनवला  राजकारणी रोबोट बनवला आहे 

रोबोटची  बुद्धीमत्ता आणि मानवाची  बुद्धीमत्ता यात जमिन-आसमानचा फरक असल्यामुळे आता जगभरात रोबोटचे राज्य असेल ? 
रजनीकांतच्या  रोबोट’ सिनेमाची खूप चर्चा झाली होती  तसेच  हॉलिवूड सिनेमांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. रोबोटिक्स बुद्धीमत्तेचे दर्शन  ब्लेड रनर आणि टर्मिनेटर सारख्या हॉलिवूड रोबोट चित्रपटामध्ये झालेले होते 
जगभरात नवलाईच्या  अनेक घटना घडत असतात त्यातीलच एक घटना म्हणजे नुकतीच जगाच्या इतिहासात प्रथमच एका रोबोटला नागरिकत्व मिळालेले आहे , होय सौदी अरेबियाने एका रोबोटला नागरिकत्व दिले आहे आणि असे असणारा हा  प्रथम देश आहे म्हणजेच जगातील ही पहिलीच घटना आहे.
सौदी अरेबियाने चक्क एका महिला रोबोटला नागरिकत्व दिलंय. हॉलीवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्न हिच्यासारखी ही सोफिया रोबोट दिसते.
सौदीची राजधानी रियाद मध्ये फ्युचर इनव्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या व्यासपीठावर हा रोबोट नागरिकत्वाचा सोहळा पार पडला.
या  कार्यक्रमात सोफिया नावाच्या  रोबोटला  सौदी अरेबियाचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले आणि त्याने  तेव्हा त्यांनी सौदी अरेबियाच्या सल्तनतचे  आभार मानले.
व्यापारविषयक लेखक अन्ड्रयू रौस सॉर्किन यांनी  सोफियाच्या नागरिकत्वाची घोषणा  करताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला 
नागरिकत्वाच्या  घोषणेनंतर सोफियाच्या झालेल्या  मुलाखतीत तिने  ‘मी नागरिकत्व बहाल झालेला जगातली पहिली यंत्रमानव  या ऐतिहासिक घटनेबद्दल  सौदी अरेबियाचे आभार मानते ' असे सांगितले तसेच या गोष्टीचा  मला अभिमान आहे.अशा शब्दांत सोफियाने आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी तिने यत्रंमानव हा माणसांसाठी धोका आहे का ? या चर्चासत्रातही सक्रिय सहभाग घेतला.
अशी माहिती हाती मिळालेली आहे कि,  कृत्रिम बुद्धीला चालना देण्यासाठी, सौदी अरेबियाने रोबोटला नागरिकत्व दिले आहे. 
कसे आहे हे रोबोट
> सोफियाची निर्मिती हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी केली आहे.
>धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली ही सोफिया आहे विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता असलेली, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली अत्याधुनिक यंत्रमानव आहे . 
 >या रोबोटची सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते आपल्या रोजच्या कामाव्यतिरिक्त इतर प्रश्नांची उत्तरे देते.
>सोफिया चेहऱ्यावरील हावभाव ओळखू शकते आणि कोणासोबतही सामान्य व्यक्तीपणे बोलू शकते
> अनेक टी वही  चॅनल्सना तिने मुलाखतीही दिल्या आहेत. ‘

रोबोटमुळे रोजगारावर गदा येईल ?
जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि टेस्ला या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक अॅलन मस्क यांनी 
भविष्यात सर्वात जास्त धोका हा कृत्रिम बुद्धिमत्तेपासून आहे, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांचे रोजगार हिरावले जातील असा इशारा काही महिन्यांपूर्वी दिलेला होता . कारण त्यांचे मते  रोबोट प्रत्येक गोष्ट  करण्यास सक्षम असतील. आणि माणसांपेक्षाही रोबोट उत्तम काम करतील. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येईल. 
त्याला प्रतिउत्तर देतांना सोफिया मुलाखतीत म्हणाली कि, 
मी एक संवेदनशील रोबोट असेल 
 मुलाखत  घेणा-याने जेव्हा तिला  आम्हाला वा"ईट भविष्याकडे जायचं नाहीये असं म्हटलं."  त्याला झटकन उत्तर देताना सोफिया म्हणाली कि तुम्ही काल्पनीक हॉलिवूड सिनेमे खूप बघतात वाटत . पण काळजी करू नका , जर तुम्ही मला नुकसान पोहोचवलं नाही तर मी देखील तुमच्याशी चांगलीच वागेल. मी एक  स्मार्ट कम्प्युटर म्हणून असेल  
र्च्युअल पॉलिटिशियन'....  'राजकारणी' रोबोट 
 नुकतीच जगाच्या इतिहासात प्रथमच एका रोबोटला नागरिकत्व मिळालेले आहे , होय सौदी अरेबियाने एका रोबोटला नागरिकत्व दिले आहे पण आता त्याहीपुढे जात न्यूजीलंडच्या वैज्ञानिकांनी जगातला पहिलाच बुद्धिजीवी आणि राजकारणी रोबोट बनवला आहे. भविष्यात यंत्राचेच राज्य येण्याची शक्यता आहे कारण हा रोबोट २०२० मध्ये उमेदवार म्हणून निवडणुक लढविण्याची शक्यता आहे. 
बुद्धीजीवी सॅम :
या रोबोटचे नाव सॅम असून न्यूजीलंडच्या निक गेरिट्सन नावाच्या व्यक्तिने याची   निर्मिती केली आहे
राजकारणात जनतेच्या पूर्वग्रही विचारांवर प्रभाव टाकेल सॅम
राजकारणात  अनेक पूर्वग्रह आहेत. जगाभरतील देशांमध्ये   जलवायू, परिवर्तन, प्रदूषण ,समानता या समस्या आहेत  सॅम या विषयांवर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे काम करेल . या रोबोटमध्ये असलेला  अल्गोरिदम मानवाच्या पूर्वग्रही विचारांवर प्रभाव टाकेल.
लेखक :  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

स्टेट बँकेचे विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचे ओळखपत्र (आय कार्ड) आणि एटीएम-डेबिट कार्डाचे एकत्रीत असे कॉम्बो कार्ड

स्टेट बँकेचे  विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचे ओळखपत्र (आय कार्ड) आणि एटीएम-डेबिट कार्डाचे एकत्रीत  असे कॉम्बो कार्ड  

देशात  स्टेट बँकेने सीओईपी’च्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचे ओळखपत्र (आय कार्ड) आणि एटीएम-डेबिट कार्डाचे एकत्रीत  असे कॉम्बो कार्ड  पहिल्यांदाच तयार कले आहे. 
सीओईपी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या ‘कॉम्बो कार्ड’मुळे
कॉलेजच्या आयकार्डावरून पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी)चे विद्यार्थी ‘एटीएम’मधून पैसे काढू शकणार आहेत आणि कॅशलेस व्यवहारही करू शकणार आहेत.  .सीओईपी’ कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना हे कार्ड दिले जाणार आहे.

कार्डचा उपयोग कसा होईल ?
 - आय कार्ड प्रमाणेच या कार्डावर विद्यार्थ्याचे नाव, रक्तगट, कॉलेजचा विशिष्ट नोंदणी क्रमांकाची नोंद आहे. त्यामुळे कार्डधारक  विद्यार्थ्यांना कॉलेजच्या सर्व सुविधा वापरता येतील .
- या कार्डने  वसतिगृह तसेच  काही लॅबचे दरवाजेही या कार्डाकॉलेजच्या आधारे उघडता येतात . 
-  विद्यार्थ्यांना कॉलेजची फी भरणे, स्कॉलरशिप स्वीकारणे अन्य व्यवहार करण्यासाठी या कार्डाचा वापर करता येने शक्य होईल 
- कॉलेजमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठीही हे कार्ड वापरले जाईल,
कार्डची सुरक्षितता : ,’ 
अत्यंत सुरक्षित असे हे कार्ड आहे. कार्डचा गैरवापर होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांनी त्यांचा पिन क्रमांक इतरांना कोणालाही देऊ नये 
देशातील आघाडीच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध  करून दिले जाईल स्टेट बँक ऑफ इंडियाचे कॉम्बो कार्ड
 आयआयएम-अहमदाबादसह देशभरातल्या आघाडीच्या अनेक संस्थांमध्ये असे कार्ड उपलब्ध करून दिले जाईल स्टेट बँक ऑफ इंडियाचे कॉम्बो कार्ड

‘कार्डची वैधता 
‘सध्या सीओईपी’च्या १२०० विद्यार्थ्यांना हे कार्ड देण्यात येणार आहे  त्यानंतर टप्प्या टप्प्यात सर्व विद्यार्थ्यांना हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल . देण्यात येणारे  हे कार्ड २०२२ पर्यंत वैध असणार आहे . कॉलेजमधून शिक्षण संपवून बाहेर पडल्यानंतरही विद्यार्थ्यांना हे कार्ड वापरता येईल. ’ 

@@  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

फेसबुकचे अकॉउंट हॅक होत आहेत काळजी घ्या !

फेसबुकचे  अकॉउंट  हॅक  होत आहेत काळजी घ्या !
फेसबुक’ने आपल्या सर्वांचेच आयुष्य व्यापून टाकलेले आहे. कित्येक लोक  दिवसभर  फेसबुकवर पडीक असतात. सोशल मीडियामुळे जग जवळ आले तरी त्याचा जपून वापर करायाला हवा कारण काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करून कुणाची बदनामी करायलाही मागेपुढे पहात नाही.  सावध राहा  फेसबुक हॅकिंगचे प्रमाण वाढलेले आहे .  फेसबुकचे बनावट अकाऊंट बनवून महिला मित्रांना अश्लील मॅसेज केल्याची घटना घडत आहेत . 
फेसबुक वापरकर्त्यांची फेसबुक अकाउंट दोन  पद्धतीने हॅक होतात 

१फिशिंग: यामध्ये  हॅकर्स फेसबुकच्या लॉगिन पेज सारखे दिसणारे फेक लॉगिन पेज बनवतात. याच्या नंतर हॅकर्स  त्या व्यक्तीच्या  इमेल वर  खोट्या पेजची लिंक पाठतो  किंवा माहितीतल्या व्यक्तीला  स्वतः:चा  मोबाईल फेसबुकसाठी  वापरण्यास देतात  आणि जेव्हा ती   व्यक्ती आपला लॉगीन आयडी व पासवर्ड त्या फेक  पेजवर टाईप करते तेव्हा त्याचा ईमेल पत्ता आणि पासवर्ड वर मिळतो   हॅकर वापरकर्त्याच्या फेसबुक अकाउंट हॅक करतो.
फिशिंगचा वापर करून गोपनीय माहिती चोरणे हे बेकायदेशीर कृत्य असून सदर कृत्य दंडनीय अपराध आहे.
उदा: https://www.facebook.com  – खरे पेज
http://www.faacebook१.com – फेक पेज असे हे फिशिंग असते 

२Keylogger कि लॉगर: हॅकर्स विविध सॉफ्टवेअर तसेच फोटो यामधून या प्रोग्रॅमचा प्रसार करतात हा   प्रोग्राम यूजरच्या कॉम्प्युटरवर इंस्टॉल झाल्यानंतर   यूजर्सचे सर्व डिटेल्स रिकॉर्ड करतो .  यूजर्सचे हे  डिटेल्स हॅकर्सला  FTP द्वारे/  ईमेल पत्त्यावर पाठविले जातात. 
फेसबुक अकॉउंटच्या हॅकिंगपासून काय काळजी घ्याल ?
फेसबुक लॉगिन केल्यानंतर होमपेजच्या उजव्या बाजूलाअसलेल्या  सेटिंग्जवर क्लिक करा. त्यामध्ये General, Security and Login  , Privacy ,Timeline andTagging असे options असतील . तिथे Security and Login क्लिक केल्यावर Setting Up Extra Security या पर्यायात असणाऱ्या Use two-factor authentication वर क्लीककरून तिथे तुम्व्हा मोबाईल नंबर द्या ज्यावर फेसबुक लॉगिन करतांना एक कोड येईल तो कोड आणि तुमचा फेसबुकचा पासवर्ड हे दोन्हीही वापरूनच तुम्ही फेसबुक लॉगिन करू शकाल 
फेक फेसबुकवरून  मजकूर प्रसारित केल्यास सायबर कायदा काय 
अश्‍लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारतीय दंडविधानाच्या 292 कलमान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या अंतर्गत दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. माहिती तंत्रज्ञानाचे कलम 66 हे संगणकाशी संबंधित गुन्ह्यांसाठी वापरले जाते.  आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल 66 (ए) कलमान्वये तीन वर्ष तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. "आयडेंटीटी थेफ्ट‘ म्हणजे "वैयक्तिक संवेदनशील माहिती‘ची चोरी व गैरवापर केल्याबद्दल 66(सी) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ शकते. 
"प्रायव्हसी‘च्या उल्लंघनाबद्दल 66(इ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित, प्रकाशित केल्याबद्दल 67(ए) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा वर्षे दंडाची शिक्षा होऊ शकते. अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित केल्याबद्दल 67 (बी) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. 



लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

सायबरयुद्ध : चीनकडून भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांचा डेटा चोरी

सायबरयुद्ध : चीनकडून भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांचा डेटा चोरी

युद्ध हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवं, असं थोडंच आहे. कारण युद्धाची पद्धत  बदलली आहे . युद्धे आता कुठही होतात,  त्याचं ठिकाण व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग असू शकत आणि  हे विश्व आहे, इंटरनेटचं…आणि चीनने याच युद्धाला सुरुवात केलेली आहे तेव्हा सावध रहा !

हल्लीचे जग हे इंटर्नेट सॅव्ही झालेले आहे आणि बरेचसे महत्वाचे व्यवहार हे इंटरनेट वर होतात म्हणून हे व्यवहार करतांना काळजी घेतली पाहिजे . 
विचार करा जर  ,एखादी ऑनलाइन एयर इंडिया किंवा  इंडियन रेल्वे ची वेब साइट हॅक झाली .....?  सगळ्या क्रेडीट कार्ड्स ची,डेबिट कार्डचे  डीटेल्स, वैयक्तिक माहिती इत्त्यादी वर शत्रू राष्ट्राचा ताबा जाइल.
आणि जर कधी बँकिंग क्षेत्रात जर असा हल्ला झाला तर कुठल्याही देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील 
रक्तपात न करता सायबर युद्ध करता येते . चीनकडून संगणकाचा ,मोबाईल अॅपचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे भविष्यतील युद्ध  चीन सायबरमधून लढले अशी शक्यता व्यक्त केली जात आहे 
आयबीकडून  या गुप्त एनजन्सीकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार चीनने देशात तयार झालेल्या मोबाईल अॅपला भारताविरोधात छुपे युद्धासाठी अस्त्र बनवलं आहे. मोबाईल अॅपच्या  माध्यमातून भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांचा डेटा चोरी केला जात असल्याची माहिती गुप्त एनजन्सीकडून प्राप्त झालेली आहे . भारताविरोधात नवीन षडयंत्र रचण्याकरीता चीन UC ब्राउजर, शेअर-इट, ट्रूकॉलर, क्लीन मास्टरसारख्या  मोबाईल अॅपचा वापर करून त्याद्वारे  भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांची गुप्त माहिती चीनच्या सर्व्हरवर संकलित केली जात आहे
देशाच्या सुरक्षिततेसाठी काही  अॅप्स धोकादायक असल्याचे सांगून लगेच हटवण्याचे आदेश गुप्त एजन्सीने भारतीय लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांना  दिले आहेत.  या अॅप्समुळे  सायबर अटॅक होऊ शकतात तसेच अॅप्सद्वारे डाटा आणि अन्य माहिती हॅक केली जाऊ शकते. 
सुरक्षा दलांने मोबाईलमधील चीनी अॅप्स अनइंस्टॉल करण्याचे दिले आदेश 
चीनी अॅप्स अनइंस्टॉल करण्याचे  आदेश भारतीय सुरक्षा एजन्सींकडून  लष्कराचे जवान आणि अधिकाऱ्यांना  दिले आहेत. कारण  चीन यामार्फत डेटा चोरत असल्याची शंका आहे. त्याकरिता सुरक्षितेसाठी चीनी सीमेच्या बॉर्डरवर तैनात असलेल्या जवानांना स्मार्टफोनमधून , विबो, यूसी ब्राऊजर ,यूसी न्यूज आणि  वीचॅट, ट्रूकॉलर हे अॅप्स हटवण्यास सांगितले आहेत. 
खतरनाक अॅप्सची यादी
आयबीकडून  खतरनाक अॅप्सची जी यादी जाहीर झाली  आहे. त्यामध्ये 
वायरलल क्लीनर हाई सिक्युरिटी लॅब, सीएम ब्राऊसर, बॅडू ट्रांसलेट, बॅडू एप, वंडर कॅमरा, ईएस फाइल एक्सप्लोरर, डयू रिकॉर्डर, वाल्ट हाइड, यूकॅम मेकअप, एमआय स्टोर,  वीबो, वीचॅट, शेअरइट, ट्रूकॉलर,फोटो वंडर, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू म्यूजिक, क्यूक्यू मेल, क्यूक्यू प्लेयर,एमआय कम्युनिटी, कॅचक्लीनर डयू एप्स, डयू बैटरी सेवर,क्यूक्यू न्यूजफीड, क्यूक्यू सिक्युरिटी, सेल्फी सिटी, मेल मास्टर, एमआय व्हिडियो कॉल आणि क्यूक्यू लांचर,यूसी न्यूज, यूसी ब्राऊजर, ब्यूटी प्लस, न्यूजडोग, वीवा व्हिडिओ, क्यू व्हिडिओ, आयएनसी, पॅरालल स्पेस, अपुस ब्राऊजर, परफेक्ट कार्प,डयू क्लीनर, डयू प्राइवसी, 360 सिक्युरिटी, डयू ब्राउसर, क्लीन मास्टर-चीता मोबाइल, 
आदी अॅप्सचा समावेश आहे 
सायबरयुद्धाचा   प्रतिकार 
-  स्पॅम मेल, फसवे मेल यावर डबल क्लिक करुन उघडण्याचा प्रयत्न करु नये. अशा मेल मधून व्हायरसची एक्झीक्युटेबल फाईल आपल्या नकळत डाऊन लोड होते. आपण जेव्हा संगणकावर काम करतो तेव्हा केलेल्या कामाची एक डुप्लीकेट फाईल तयार होऊन ती हार्ड डिक्सवर सेव्ह होते. जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो तेव्हा अलगदपणे ही माहिती हॅकरला मेल व्दारे प्राप्त होते. .त्यामुळे  फसगत टाळण्यासाठी अशा प्रकारचे फसवे मेल डीलीट करावे आपली संगणक सिस्टीम ऍन्टी व्हायरस, फायर वॉलने सुरक्षित ठेवावी.
-वाय फाय कनेक्शनबाबत देखील सुरक्षित वापर महत्वाचा आहे.
-सुरक्षितता,सावधगिरी बाळगून इंटरनेटचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
भारतात तयार होणा-या संगणकतज्ज्ञांना काही वर्ष देशात राहून सेवा करायला हवी. 
आज भारतासमोर  ‘सायबर युद्धाचे  ’चं भयावह संकट उभं आहे भारताने लक्षात घेतले पाहिजे आणि तातडीने त्यावर उपाय योजना केल्या पाहिजे .
सायबर क्षेत्रात दक्षिण कोरियासारखे छोटे देशही आपल्यापेक्षा प्रगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. सायबरमध्ये चीनची भीती अमेरिकेला आहे. म्हणून भारताने अमेरिकेबरोबर सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. 
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
mobile: 9423077963
आयफोन च्या फोटो अॅप मेटाडेटा  आणि रेकग्निशन फीचरमुळे आयफोन यूजर्समध्ये गोंधळ : 
मुलींचे क्लीवेज फोटो स्टोर करतो "आयफोन "?

 स्टेटस सिम्बॉल असलेला अ‍ॅपलचा आयफोनचे अनेक  खास फीचर्स आणि  कॅमेरॅची क्लिअ‍ॅरिटी याने तरुणाईला  भुरळ घातलेली आहे त्यामुळे तो महागडा आयफोन आपल्याकडेही  असावा असे प्रत्येकालाच वाट आहे   बरेच हौशी  टेक्नोसॅव्हीं  हा महागडा फोन आर्थिक तडजोड करून ईएमआयवर विकत घेण्याच्या विचारात असतात . परंतु आता iPhone X च्या संबंधित एका बातमीने जगभरातील लाखो मुलींची झोप उडवली आहे. कारणही तसेच आहे. 
आयफोन मुलींचे क्लीवेज फोटो स्टोर करतो ?
एका यूजरने ट्विटमध्ये म्हटले आहे कि, 
 गेल्या एक वर्षापासून अॅपल महिलांचे सेक्सी फोटो आपल्या डाटाबेसमध्ये सेव्ह करतंय. 
या संबंधित बातमीनुसार एली नावाच्या एका यूजरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपल्या आयफोनच्या फोटो अॅपमध्ये जाऊन आपण brassiere टाईप करा. तुम्हाला फोनमधील संपूर्ण कलेक्शन पहायला मिळेल. ज्यात आपली आतापर्यंत टीपलेली क्लीवेज छायाचित्रे म्हणजेच  मुलींच्या छातीच्या भागाचे काढलेले फोटो  पहायला मिळतील. या पुढे ट्विट करून एलीने म्हटले आहे की
'मुलींनो सावध व्हा! आपल्या आयफोनमधील फोटो अॅपमध्ये जावून brassiere टाइप करा. कारण अॅपल हे फोटो सेव्ह करतंय?'
एलीच्या या ट्विटला  अनेकांनी  रिट्विट करून  अनेक iPhone X  युजर्सने सांगितलेला  प्रयोग करून बघितला आणि त्यांनाही एलीसारखाच अनुभव आला आणि त्यांनी  अॅपलवर  नाराजी व्यक्त केली आहे. 
एलीप्रमाणेच क्रिस्टीन नावाच्या एका iPhone युजरने देखील याच प्रकारचं एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर करून एलीच्या ट्विटला  दुजोरा दिला  आणि तो प्रचंड  मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
आयफोन मुलींचे क्लीवेज फोटो स्टोर करण्याची बातमी पूर्णतः चुकीची !
परंतु एका वेबसाइटच्या वृत्तानुसार आयफोन मुलींचे क्लीवेज फोटो स्टोर करण्याची बातमी पूर्णतः चुकीची असलल्याचे  म्हटलं आहे. 
या  वेबसाइटच्या म्हणण्यानुसार २०१६ मध्ये iOS 10 सोबत लाँच झालेलय आयफोनच्या फोटो अॅप मेटाडेटा  आणि रेकग्निशन फीचरमुळे आयफोन यूजर्समध्ये गोंधळ उडालेला आहे . तर जाणून घेऊ या आयफोनच्या  फिचर बद्दल 
अॅपलचे फोटो अॅप हे मेटाडेटा आणि इमेज रेकिग्नेशन फीचर :
 अॅपलचे फोटो अॅप हे मेटाडेटा आणि इमेज रेकिग्नेशन फीचर हे फोटो संपादन ऍप्लिकेशन्स आहे याचा उपयोग करून त्यांना एक टॅग देतं. यामुळे एक सारख्या  फोटोंचा संग्रह  एका ठिकाणी तयार होतो  येतात. हे फोटो फक्त तुमच्या आयफोनपर्यंतच मर्यादित राहतात.
 आयफोनमध्ये स्टोर असलेल्या  सानुकूल अनुप्रयोगांचा संग्रह चांगला आहे.   या फिचर द्वारे अॅपल छायाचित्रे सेव्ह करत नाही. फक्त तुमचे फोटो तो एका ठिकाणी जमा करतो.एकसारखी दिसणारी छायाचित्रे एकाच ठिकाणी डिवाईसवर  जमा होतात .  अॅपल ती सेव्ह करून स्वत:कडे घेत नाही.
परंतु  अॅपलबाबतच्या या फीचरच्या सोशल मीडियावरील  चूकीच्या माहितीमुळे  आयफोन यूजर्सच्या गोंधळात भर पडली आहे. 
लेखक :  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

Monday, 13 November 2017

पुणे शहरात मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम मोहिमेला सुरुवात झाली

पुणे शहरात मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम मोहिमेला सुरुवात झाली
पुणे  : सायबर क्राईमचं वाढतं प्रमाण वेळीच रोखण्यासाठी युथ इंजिनिअर्स फॉर सायबर सेक्युरिटी अँड अवेरन्स  या देशपातळीवर सायबर सुरक्षतेसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे शहरात मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम या मोहिमेला सुरुवात झाली आहे . 
नुकतीच लव्हाळे फाटा ,पिरंगुट  येथे या संस्थेची बैठक झाली यावेळी उपस्थित अभियंता सभासदांनी 
" जो पर्यंत सायबर क्राईमला संपूर्ण नाहीसे करणार नाही तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही " अशी शपथ घेतली 
यावेळी  मोहिमेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सायबर तज्ज्ञ प्रा. योगेश हांडगे  यांनी  माहिती दिली कि ,सायबर क्राईमचं वाढतं प्रमाण वेळीच रोखण्यासाठी हि मोहीम  सुरु करण्यात आलीय 
याविषयी अधिक माहिती देतांना प्रा.  हांडगे म्हणाले कि ,
आपण आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी सायबर क्षेत्रावर अधिकाधिक अवलंबून राहू लागलो आहोत, तसे आपण स्वतःच स्वतःला सायबर  गुन्हेगारांच्या ताब्यात देऊ लागलो आहोत.
मोबाइल, सोशल मीडिया, ई-बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग हे आता अनेकांच्या दैनंदिन कामातील नित्याचे शब्द झाले आहेत. ६० टक्के टीनेजर्स आणि युवक, चाळिशी पार केलेले ४० टक्के आणि २० टक्के ज्येष्ठ नागरिक आज वेगवेगळ्या माध्यमांतून ऑनलाइन अॅक्टीव्हिटीशी कनेक्ट आहेत. मात्र, या टेन्कोसॅव्ही असणाऱ्यांना फसविण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय रॅकेट्स कार्यरत  आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही हा मोठा धोका असू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. 
इंटरनेटवर अनेकांची फसवणूक झाली तरी त्याविषयी अनेकांनी पोलिसांत तक्रारी करण्याची टाळाटाळ केल्याचेही दिसून येते. केवळ इंटरनेटविषयीच्या अज्ञानामुळे अनेकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते.
तक्रार कुठे करायची असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अनेकांमध्ये संभ्रम असतो  . हा संभ्रम दूर करण्यासाठीच  या मिशनचा उपयोग होणार आहे .
 या मिशन मधील सायबर साक्षरता भागात इंटरनेटवापराविषयी पुरेसे ज्ञान नसलेल्यांना  ते  उपलब्ध करू दिले जाणार आहे. 
त्यामुळे याबाबत सायबर सुरक्षेचा प्लान आखण्याकरीत जनजागृतीची राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याची  गरज असल्याचे जाणवते आणि याचाच एक भाग म्हणून मिशन चाणक्य .... ऑपेरॅशन सायबर क्राईम या मोहिमेची सुरुवात केलेली आहे   
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने कोणत्या प्रकारे इंटरनेट वापरावे , ऑनलाईन बँकिंग ,शॉपिंग आणि सुरक्षेच्या संबंधित  गोष्टींची ओळख या मोहिमेच्या  माध्यमातून होणार आहे . 
सोशिअल मीडियाचा  गैरवापर सध्या वाढत आहे. ब्लॅकमेकिंग ,एखाद्याला धमकाविणे,अश्लीलता पसरविणे,  आर्थिक व भावनिक फसवणूक करणे आदी गैरवापर समाज सोशिअल मीडियाचाद्वारे केले जातात. प्रकार थांबविण्यासाठी लोकांमध्ये सायबर जनजाग्रुती करण्यासाठी या मोहिमेचा  उपयोग होणार आहे

Saturday, 11 November 2017

बनावट व्हॉट्सअॅप पासून सावध राहा




बनावट व्हॉट्सअॅप पासून सावध राहा 
जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप असलेल्या व्हॉटसअप वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने कम्प्युटरऐवजी आता मोबाइलवरून  अॅटक होत आहेत  त्यासाठी वेगवेगळी शक्कल सायबर भामटे लढवत आहेत . मागे  व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले होते आता तर सायबर भामट्यांनी व्हॉट्सअॅपचं एक बनावट व्हर्जन तयार केल आहे . अॅप डेव्हलपरने गुगल सिक्युरिटीला भेदून . हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसणाऱ्या बनावट  अॅपची निर्मिती केलेली आहे आणि ते प्ले स्टोअरउपलब्ध केलेलं आहे 
आणि ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे तेव्हा व्हॉटसअप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करतांना काळजी घ्या ! कारण हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणे हे बनावट अॅप दिसते  त्यामुळे  अनेक युझर्स हेच अॅप डाऊनलोड करतात .
हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसरे हे  अॅप10 लाख युझर्सने हेच अॅप डाऊनलोड केलेल  आहे .
फसवणूक टाळण्याकरिता तुम्हीही तुमचं अॅप बनावट आहे, की खरं हे तातडीने तपासून पाहा.
कशी होते ग्राहकांची दिशाभूल ! 

- बनावट अॅपचे  नावही हुबेहूब असंल्यामुळे 
- हॅकर्सने युनिकोडचा वापर करुन हुबेहूब नावं दिलं आहे 
- गुगल प्ले स्टोअरवर ''Update WhatsApp Messenger'' या नावाने हे अॅप उपलब्ध आहे आणि  ते 'WhatsApp Inc' ने विकसित केलं आहे, असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे
काय आहे या बनावट अॅपचा धोका 
व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीनुसार तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि एकूण गोपनीय माहिती तुमच्या व्यतिरिक्त कुणीही पाहू शकत नाही. मात्र या बनावट अॅपच्या माध्यमातून तुमच्या फाईल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो
- हे बनावट अॅप डाऊनलोड केल्यास फोनमधील माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे. 
- एखाद्या यूजरची बदनामीही केली जाऊ शकते
कसा  उघडकीस आला हा प्रकार 
 एका ट्विटर यूजरच्या माध्यमातून WABetaInfo या व्हॉट्सअॅप ट्रॅकिंग वेबसाइटने  या बनावट अॅपची माहिती  दिली आणि हे  बोगस अॅप डाऊनलोड करू नये  याचे  आवाहनही  केलेले आहे . या गंभीर समस्येकडे गुगलनेही पाहण्याची गरज आहे.
लेखक : प्रा योगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

Friday, 3 November 2017

जीमेल अकाऊंट हॅक झालेय हे कसे ओळखावे ?

जीमेल अकाऊंट हॅक झालेय हे कसे ओळखावे ?
आजच्या काळात इमेल्स   अकाऊंटस हॅक होण्याचे चे प्रमाण बरेच वाढले आहे. 
अगदी  वैयक्तिक अकाऊंटस ते मोठ्यामोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे अकाऊंटस हॅक  करून त्यांची वैयक्तिक \ गोपनीय माहिती चोरून गैरप्रकार वाढत आहेत .इमेल्स युजर्सना खबरही न लागू देता त्यांचे अकाऊंटस हॅक करण्याचे प्रकार हॅकर्स करत आहेत 

 जीमेलने त्यांच्या   युजर्सना बऱ्याचशा  सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याद्वारे  तुम्ही तुमचे जीमेल अकाऊंट हॅक झाले आहे का ?आपल्या व्यतिरीक्त कुणी दुसरे वापरत आहे  का ? आणि ती व्यक्ती कितीवेळा आणि कधी आपले अकाऊंट वापरात आहे . हे तपासून बघू शकतो 
कसे तपासावे ?
>जीमेल ओपन केल्यावर दिसणाऱ्या विंडो च्या खाली उजव्या बाजूला Details(डिटेल्स )असे लिहिलेले दिसून येईल . त्यावर जर क्लिक केल्यावर  एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये अलीकडील १० वेब सत्राचा टेबल दिसेल त्यात कोणत्या वेब ब्राऊसरवरुन किथाळ्या आय पी अड्रेसवरून कुठल्यावेळी  तुमचा जीमेल वापरला गेला आहे, याची संपूर्ण  माहिती मिळेल. 
आणि विंडोच्या वरच्या बाजूला ‘साईन आऊट फ्रॉम ऑल अदर सेशन्स’ असा पर्याय असेल त्यावर क्लिक करून  तुम्हाला  इतर ठिकाणी सुरु असलेले जीमेल लॉगऑऊट येईल . तसेच  संशयास्पद वाटणाऱ्या क्रिया या लाल शब्दांमध्ये दर्शविल्या जातील त्यानंतर  तुम्ही तुमच्या जीमेलच्या पासवर्डमध्ये  इथे बदल करू शकता

****
Access Type [ ? ]
(Browser, mobile, POP3, etc.)
Location (IP address) [ ? ]Date/Time
(Displayed in your time zone)

लेखक : प्रा योगेश अशोक हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Tuesday, 31 October 2017

सावधान ! सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य बिघडत आहे

सावधान ! सोशल मीडियामुळे  मानसिक आरोग्य बिघडत  आहे
स्पर्धात्मक करिअर,  घड्याळाच्या काट्यावर धावण्याची मुंबईकरांची सवय, नोकरीच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या, कौटुंबिक समस्या असोत किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या या अनेक कारणांमुळे मुंबईकर मानसिक तणावात असतात.आता त्यात सोशल मीडियावरील सततचा  वावर , ऑनलाईन गेम्सचे व्यसन  यांसारख्या कारणांची भर झालेली आहे  . नुकतेच  एका अहवालातून  देशात  मुंबई शहर तसेच उपनगरातील लोक सर्वाधिक ताणतणावात असून, त्यांना मानसोपचाराची गरज असल्याचे  समोर आलेले  आहे.मुंबईपाठोपाठ कोलकाता आणि बंगळुरु या शहरांचा क्रमांक लागतो.. अहवालानुसार मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये पहिल्या क्रमांकावर पश्चिम बंगाल तर  महाराष्ट्र राज्य दुसर्‍या क्रमांकावर असल्याचं केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालं आहे. तसेच मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. राज्यातील सुमारे सव्वा लाख नागरिक मानसोपचार घेत आहे . आरोग्य मंत्रालयाने केलेल्या पाहणीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त केसेस नैराश्य (डिप्रेशन) आणि अँक्झायटीशी संबंधित आहेत. 
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने  जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञांच्यावतीनं हे सर्वेक्षण घेऊन हा अहवाल तयार केला आहे.
 इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजार आहे. सेल्फी आणि बॉडी इमेज इश्यूज याला कारणीभूत आहेत. चिंतेची बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनाही मानसोपचाराची गरज असल्याचे जे. जे. रूग्णालयाच्या मानसशास्त्र विभागाने अहवालात नमूद केले आहे.पूर्वी वयस्कर लोकांमध्ये मनोविकारांची लक्षणे आढळत होते आता तरुणांमध्ये हे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे या तरूणांमध्ये मनोविकाराबाबतची जागृती करणे गरजेचे असल्याचे त्यात स्पष्ट केले आहे .
सेल्फायटिस: अनेक तरुण-तरुणींना दिवसांतून कित्येक वेळा सेल्फी काढून त्या सोशल साईटवर पोस्ट करण्याची सवयच लागलेली आहे  मात्र ही सवय कदाचित मानसिक आजाराची लक्षणेही असू शकतात. मनोवैज्ञानिकांच्या भाषेत याला सेल्फायटिस असे म्हटले जाते
>>सोशिअल मीडियामुळे उद्भवणारे मानसिक आजार
- ऑनलाईन गेम अॅडिक्शन
- सायबर बुलिंग
- फेसबुक डिप्रेशन
- बॉडी इमेज इश्यू
- नैराश्य,   
- अँक्झायटी, 
- सायकोसिस, 
- बायपोलर डिसॉर्डर, 
- डिमेन्शिया
- ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसॉर्डर (ओसीडी)
- अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर (एडीएचडी)
- डिमेन्शिया
>>मानसिक आजाराचे कारणे  : 
>>. सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रिया यामुळेही लोकांच्या मानसिकतेवर आघात केला जात आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजार निर्माण झाले आहेत. सेल्फी आणि बॉडी इमेज इश्यूज याला कारणीभूत आहेत.
>>>फेसबुकमुळे येणारा तणाव, सायबरशी निगडीत समस्या आणि ऑनलाइन गेमच्या आहारी जाणं आणि सोशल मीडियावर सतत  पोस्ट करणेआणि  लाइक्स वा कमेंट्स पाहणे,
>> अन्य नेटिझन्सचे प्रोफाइल्स फोटो पाहून डिस्टर्ब होणे: असे वाटणे कि सर्व जण खूप आनंदात आहेत त्या तुलनेत मी कुठेच नाही 
>> आॅनलाइन गेमिंग करताना सतत एकाच लेव्हलमध्ये अडकणे, आॅनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरणे 
>>सायबर बुलिंग: सोशल मीडियावर सर्फिग करत असताना  इतरांकडून मिळणारी वाईट वागणूक , तुच्छ वागणूक दिली, अन्य लोकांकडून होणार  उपहास , शारीरिक व्यंगावर टिपण्णी करणे , इतरांचे खराब फोटो टॅग करणे 
मानसोपचार घेणारी देशातील 3 राज्यं
१. पश्चिम बंगाल 
२. महाराष्ट्र
३ . कर्नाटक

लेखक : प्रा योगेश अशोक हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Monday, 30 October 2017

मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर


मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर 
जगभरात  स्मार्टफोन वापरणार्‍यांची संख्या वाढल्यामुळे अ‍ॅपची बाजारपेठ वाढू लागली आहे. जगभरातील अनेक नामांकित कंपन्या वेगवेगळे अॅप्लीकेशन्स तयार करतात. प्रत्येक क्षेत्रात मोबाइलअॅप्लीकेशन्सची मागणी वाढलेली आहे . 
कॅशलेस साठी अनेक बँकांनी त्यांचे बँकिंग अ‍ॅप ग्राहकांना उपलब्ध करून दिलेले आहे, मुळेच देशात मोबाईल कॉमर्स  आनि मोबाईल बँकिंग  
यांचा वापर झपाट्याने वाढलेला आहे. ई-कॉमर्स कंपन्या आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी मोबाइल ऍप्लिकेशन्सवर जास्त लक्ष केंद्रीत करीत आहेत. मोबाइल कॉमर्स बाजारावर  पकड मजबूत करण्यासाठी फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, स्नॅपडील आणि क्वीकर यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या देशातील लहान ‘स्टार्ट अप्स’ची खरेदी करताना  दिसत आहेत. तसेच  मोबाइल तंत्रज्ञानावरही मोठी गुंतवणूक केली जात आहे. कारण  येणाऱया काळात मोबाइल शॉपिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग बनणार आहे. कारण सर्वात जास्त ऑर्डर मोबाइलद्वारे येत आहेत.
मोबाईल फोनवर इंटरनेट वापरणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत  आहे. मोबाईल फोनच्या किमतीमध्ये सतत घसरण होत आहे. तसेच इंटरनेट वापरण्यासाठी अतिशय कमी पैसे मोजावे लागत असल्याने मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येतही  मोठी वाढ झालेली आहे आणि या पुढेही  होणार  आहे.
भारतीय स्टेट बँकेने एसबीआय बडी हे मोबाइल वॉलेट अॅप लाँच केले आहे. एसबीआयचे मोबाइल वॉलेट फक्त एसबीआयच्या ग्राहकांसाठी नसून इतर सर्व बँकेच्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. स्टेट बँकेने हे वॉलेट फक्त अँड्रॉईड यूजर्ससाठी ठेवले आहे. अॅक्सेंचर आणि मास्टर कार्ड यांच्या सहकार्याने, ‘बडी मोबाइल वॉलेट’ तयार केले आहे. हे अॅप १३ भाषांत उपलब्ध असून कोणतेही कार्ड वापरणाऱ्या ग्राहकाला कोणत्याही बँकेशी व्यवहार करण्यासाठी ते वापरता येईल.तसेच ऑक्सिजन वॉलेट, पेटीएम, सायट्रस पे, पेयुमनी, चिल्लर, फ्रीचार्ज, मोबीक्विक, एमपेसा ही व इतर अॅप्स म्हणजे मोबाइल वॉलेट.
रिक्षा व टॅक्सी भाडे, हॉटेलची बिले इ. भरण्याचे काम मोबाइलमधून होत आहे. क्रेडिट कार्डचे धोके वाढलेले आहेत, त्यामुळे अनेक ग्राहक आज मोबाइल वॉलेट्सकडे वळलेले आहेत. वापरकर्त्यांना विविध ऑफर्सही मिळत आहेत. शिवाय अनेक खाजगी उद्योगसमूह ,सरकारी विभाग यांनी सुद्धा त्याच्या कामकाजात वेग आण्यासाठी सुधारणा करण्यासाठी मोबाइल अॅप्स लाँच केले आहे. 
अ‍ॅप्समुळे स्मार्ट फोन वापरणार्‍यांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत. त्यांना या अ‍ॅप्सद्वारे अनेक अत्याधुनिक सुविधा क्षणार्धात मिळू लागल्या आहेत.
काही दूरसंचार व इतर कंपन्यांनीही अशी अॅप्स आणली आहेत. त्याच्या मदतीनं मोबाइलच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे. 
नुकतेच देशात कॅशलेस अर्थव्यवसंस्थेच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असे नवे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे , ते म्हणजे आता चक्क  आधार कार्डच्या सहाय्याने बँक व्यवहार करता येतील.  आधार कार्डशी संलग्न बँक खात्यातून हे व्यवहार होऊ शकतील.नुकतेच कॅशलेस सुविधा सुलभ करण्यासाठी आईडीएफसी बँक आणि नॅशनल पमेंट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तरित्या आधार अॅप विकसीत केले आहे.
मोबाईल,  डिजिटल असिस्टंटस्,टॅब्लेट, स्मार्ट वॉचेस, यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस करता बनविलेल्या सॉफ्टवेअरला अॅप्स  म्हणतात . 
विविध अ‍ॅप्सची गरज सगळ्यांनाच जाणवतेय.सर्व  क्षेत्रात मोबाईल अ‍ॅप्सची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अ‍ॅप डेव्हलपमेंट या क्षेत्रात रोजागाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत . आयओएस आणि इतर अँड्रॉइड बेस्ड डिव्हायसेससाठी  विविध अ‍ॅपस  बनवण्याचं काम मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलप करतो
अॅप्लीकेशन मेकर्सची मागणी खूप  वाढली आहे. त्यांना मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर्स म्हणून नियुक्ती दिली जाते. 
अॅन्ड्रॉइड प्लॅट्फॉर्मवर काम करणाऱ्या देशात  भारत  हा या क्षेत्रातील प्रमुख  मानला जातो. ब्लॅकबेरी व आयओएस यांचा  प्रसार इथे त्या तुलनेत कमी आहे
मनुष्यबळाची अल्प उपलब्धता व इंडस्ट्रीच्या कायम ‘ अप टू डेट स्टेट्स ‘ मुळे भविष्यात  अॅप्लीकेशन डेव्हलपर्सला  चांगलीच मागणी राहणार  आहे
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

मतदारांसाठी उपयोगी ॲप

मतदारांसाठी उपयोगी ॲप 
या लेखात राज्य निवडणूक आयोगाने आणलेल्यामतदारांसाठी  उपयोगी  मोबाईल  अॅप्सचा  उहापोह करु या 
ट्रू वोटर ॲप-


या ॲपचा उपयोग मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र किंवा यादीतील आपलाक्रमांक  मोबाइलमध्येएका क्लिकवर आपल्याला शोधण्याकरिता होणार  आहे. राज्य निवडणूक आयोगाने आणलेल्या ‘ट्रू वोटर’ हे ॲप मतदारांकरिता उपलब्ध करून दिले आहे 
ट्रू वोटर अॅपद्वारे मतदारांचा विधानसभा, यादी भाग अनुक्रमांक, स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता याचा शोध घेणे, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी पाहणे, मतदानाबाबतची माहिती घेणे, स्वत:ची माहिती फोटोसहित अद्ययावत करणे, सोबत आधार तसेच मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत करणे, कुटुंब व मित्रांचा गट तयार करणे, गैरहजर, स्थलांतरीत, मयत व बोगस मतदारांना चिन्हांकित करुन कळविणे, स्वत:चे मत सिक्युरिटी प्रश्नाद्वारे सुरक्षित करणे, आपात्कालीन परिस्थितीत तातडीने दूरध्वनी क्रमांक जतन करणे, एकाच मोबाइलद्वारे अनेक मतदारांची नोंदणी करता येणे शक्य आहे. निवडणुकीचा निकाल पाहणे,इत्यादी कामे सहजपणे  या अॅप द्वारे करता येणार आहे.
सिटीझन ऑन पेट्रोल (कॉप)
“कॉप” चा मुख्य उद्देश हा निवडणूक प्रचारातील गैरप्रकारांना आळा घालणे हा आहे. 
या ॲपच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये एखादा पक्ष किंवा उमेदवार आचारसंहितेचा भंग करीत असेल तर त्याची तक्रार आता आपल्याकडे असलेल्या मोबाईलवरून थेट निवडणूक यंत्रणेकडे करता येणार आहे 
या अ‍ॅपच्या नावातच जनतेची गस्त किंवा नजर असा आशय सामावला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारही निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवू शकतील.
 या ॲपच्या माध्यमातून प्रचाराच्या कालावधीत काही गरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह तो प्रकार अ‍ॅपद्वारे तात्काळ निवडणूक यंत्रणांच्या निदर्शनास आणून देता येईल.
या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर  जलद गतीने  कारवाई  करने  आहे . या अ‍ॅपद्वारे तक्रार करणा-याचे नाव गोपनीय ठेवण्याची व्यवस्था आहे.
प्रचाराच्या कालावधीत काही गरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह तो प्रकार अ‍ॅपद्वारे तात्काळ निवडणूक यंत्रणांच्या निदर्शनास आणून देता येईल. त्यानंतर निवडणूक संनियंत्रण समिती त्यावर योग्य ती कार्यवाही करेल.
या कॉपद्वारे  मतदारांना  पुढील गैर प्रकाराना आळा घालणे सहज शक्य झालेले  आहे : पैसे, भेटवस्तू , मद्य वाटप, शस्त्र बाळगणे , सरकारी गाड्यांचा गैरवापर,लहान मुलांचा वापर, प्राण्यांचा वापर,घोषणा व जाहिराती,  पेड न्यूज, सोशल मिडिया, प्रचार रॅली,, प्रार्थना स्थळांचा वापर,  भूमिपूजन व उद्घाटन समारंभ, ध्वनिक्षेपकाचा गैरवापर,  इत्यांदीसाठी सिटीझन ऑन पेट्रोल हे ॲप वापरता येईल.
या अॅपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नागरिक सुलभपणे दाखल करू शकतील. तसेच मतदारांना उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता येईल व गैर आढळल्यास छायाचित्रासह त्याची तात्काळ तक्रार नोंदवता येईल. झालेल्या कारवाईचा अहवाल देखील तक्रारदारास अॅपमार्फत दिसून येईल.

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 

(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

"ऍनिमेशन"

"ऍनिमेशन"                                ऍनिमेशन पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या क्षेत्रात चांगलीच संधी निर्माण झालेली आहे  ऍनिमेशन म्हणजे केवळ कार्टूनच आणि तो फक्त बच्चे कंपनीचे  मनोरंजनाचे  साधन असा समज पूर्वी होता परंतु  आज ऍनिमेशन  कन्स्ट्रक्‍शन,जाहिराती,  ऑटोमोबाईल अशा अनेक महत्वाच्या  क्षेत्रांत ऍनिमेशन पोचले आहे.ऍनिमेशन म्हणजे लहान मुलांनी पाहावयाचे कार्टून  हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. भारतात सन 2005 मध्ये या उद्योगाची सुरवात झाली. आणि त्यानंतर थोड्याच वर्षांत या उद्योगातून दोन हजार सहाशे कोटी रुपयाचे परकीय चलन देशात आले आहे. यामुळे स्वतःसोबत देशाला समृद्धी मिळून देणारे करिअर म्हणून ऍनिमेशनकडे पाहण्याची गरज आहे . ऍनिमेशन आणि गेमिंग क्षेत्राला चालना देण्यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी जागाही आरक्षित करण्यात आली आहे. 
"ऍनिमेशन" अभ्यासक्रमांत   "कोरल ड्रॉ', "फोटोशॉप', "माया' हे कॉम्प्युटर कोर्सेस करणे कलेच्या क्षेत्रात काम करण्याकरिता उपयुक्त ठरतात .स्केचिंग आणि ड्रॉइंगमध्ये प्रावीण्य मिळविले तर ऍनिमेशन करणे सोपे जाते. परंतु, ऍनिमेशन ही इंजिनिअरिंग आहे कारण यात यात दहा टक्के कला असून नव्वद टक्के तंत्रज्ञान आहे. ऍनिमेशन या  तंत्राचा मंत्र ज्याला  समजेल तोच  उत्कृष्ट ऍनिमेटर ठरेल .
ऍनिमेशन इंडस्ट्रीत सध्या बरेच बदल घडताना आपल्याला दिसताहेत. गेमिंग, ग्राफिक्स आणि ऍमिमेशन मध्ये वेगवेगळे प्रयोग होताना दिसताहेत. 
ऍनिमेशनशी संबधित  क्षेत्र
*गेमिंग डिपार्टमेंट
आयटीनंतर आता येणारा काळ ऍनिमेशन आणि गेमिंग या नवीन करिअरचा आहे.  सर्वच क्षेत्रात या उद्योगाला मोठी संधी आहे
कॉम्प्युटर गेम्स, मोबाईल गेम्स किंवा स्वतंत्र गेम्स बनविण्या साठीही ऍनिमेटरची गरज आहे . अनेक प्रकारच्या  गेम्सला लहान मुले आणि तरुणांमधून मोठा रिस्पॉन्स मिळतो. त्यामुळे हे क्षेत्रही दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे.
*प्रेझेंटेशन
कोणत्याही प्रकारच्या प्रेझेंटेशनसाठी ऍनिमेशनचा वापर करता येतो 
*फिल्म लाइन
थ्रीडी मूव्ही हासुद्धा ऍनिमेशनचाच एक भाग आहे. त्यासाठी माया हे सॉफ्टवेअर वापरले जाते. चित्रपट बनविण्यासाठी ऍनिमेशनची मोठी टीम असते. या टीमला मॉडेलिंग, शेडिंग, टेक्‍चरिंग, लायटिंग, इत्यादी  असे काम वाटून दिलेले असते
*ऑटोमोबाईल डिझाईन
आता ऍनिमेशनद्वारे आता कारच्या लाखो डिझाईन तयार होत आहेत. त्यामुळे कार विविध बाजूने ,आतून कशी दिसेल अशा अनेक  अँगलने पाहणे शक्‍य झाले आहे.
*मेडिकल ऍनिमेशन
ऑपरेशन करण्यापूर्वी ते ऑपरेशन कसे केले जाईल याचे प्रेझेंटेशन करणे ऍनिमेशनमुळे शक्‍य झाले आहे.  ऑपरेशन कसे असते, हे पेशंटच्या नातेवाइकांना कॉम्प्युटरवर दाखवता येणे ऍनिमेशनमुळे शक्‍य झालेले आहे.
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांनो सावधान !.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांनो सावधान !. 
सोशल मीडियावर तुम्ही केलेल्या चुकीच्या   कमेंट तसेच लिहिलेल्या  आक्षेपार्ह कंटेंटमुळे तुम्हाला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.
सोशल मीडियावर लहानांपासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वजण सर्रास आपली मते मांडत असतात . 
तसेच सध्याच्या काळात लहान-लहान गोष्टींवरही अनेकजण ट्रोल करण्यास सुरुवात करतात.
काहीवेळा  चुकीच्या टिप्पणीदेखील  करतात. अनेक फोटोंना अश्लील कमेंट्सचा सामनाही करावा लागतो.  यापुढे  मात्र,अशा प्रकारची  चुकीची टिप्पणी करणं सोशल मीडिया युजर्सला शिक्षेस पात्र ठरू शकते . 
कारण  सोशल मीडियावरील तुमच्या हालचालींवर लवकरच सरकारची नजर असणार आहे त्यानुसार आता  अपशब्द वापरत टीका करणाऱ्यांवर लगाम लावण्याची केंद्र सरकारने तयारी केली आहे.
 फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रसारित होणा-या आक्षेपार्ह मजकुरास पायबंद घालण्यासाठी कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे.
फेसबुक, टिष्ट्वटरवर प्रतिक्रिया, कॉमेंट अथवा माहितीच्या स्वरूपातल्या कोणत्याही कमेंट किंवा कंटेंटमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या तसेच  अफवा पसरवून प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आणि  दंगली उसळल्या तर कमेंट किंवा कंटेंट लिहिणा-यांना, शेअर, फॉरवर्ड करणाऱ्यांना  ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्यासाठी  सदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा  विचार आहे.मिळालेल्या वृत्तानुसार, यासाठी वेगळा कायदा बनवण्याऐवजी सध्याच्या इंडियन पीनल कोड (IPC) आणि आयटी ऐक्ट २००० च्या कलमांमध्ये बदल केला जाणार आहे.
यासाठी १० तज्ञांची टीम सरकारला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर या अहवालावर चर्चा करुन तो केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे .आयपीसी आणि आयटी अॅक्ट २००० मध्ये बदल करण्याची तयारी सरकारने केली आहे.
 कायद्यात होणारे  बदल  !
>आयपीसी १५३सी अंतर्गत ऑनलाईन अफवा पसरवणाऱ्यावर आणि वाईट टिप्पणी करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. या अंतर्गत जात, धर्म, भाषा, लिंग याच्याआधारे कुणाला धमकी दिली किंवा चुकीची टीका केली तर ३ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते. तसेच ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
>आयपीसी 505 ए  अंतर्गत दंगे भडकवणारे किंवा हिंसेसाठी चिथावणीच्या कमेंट केल्यास एक वर्ष जेल अथवा 5 हजार रूपयांचा दंड होऊ शकतो. 
मजकूर आक्षेपार्ह आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार पोलीस यंत्रणेला असतील

> देशातील सर्व राज्यांमध्ये  सायबर सेल असेल राज्यस्तरावर सेलचे नेतृत्व आयजी दर्जाचा अधिकारी करील. 
राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात यासाठी एक खास पथक असेल. किमान उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी प्रत्येक जिल्ह्याच्या सायबर सेलचा प्रमुख असेल.  मजकूर आक्षेपार्ह आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार पोलीस यंत्रणेला असतील
लेखक :  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

"यत्रंमानव हा माणसांसाठी धोका आहे का ?"

सोफिया रोबोटला मिळाले सौदी अरेबियाचे नागरिकत्व 
              "यत्रंमानव हा माणसांसाठी धोका आहे का ?"

रोबोटची  बुद्धीमत्ता आणि मानवाची  बुद्धीमत्ता यात जमिन-आसमानचा फरक असल्यामुळे आता जगभरात रोबोटचे राज्य असेल ? 
रजनीकांतच्या  रोबोट’ सिनेमाची खूप चर्चा झाली होती  तसेच  हॉलिवूड सिनेमांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. रोबोटिक्स बुद्धीमत्तेचे दर्शन  ब्लेड रनर आणि टर्मिनेटर सारख्या हॉलिवूड रोबोट चित्रपटामध्ये झालेले होते 

जगभरात नवलाईच्या  अनेक घटना घडत असतात त्यातीलच एक घटना म्हणजे नुकतीच जगाच्या इतिहासात प्रथमच एका रोबोटला नागरिकत्व मिळालेले आहे , होय सौदी अरेबियाने एका रोबोटला नागरिकत्व दिले आहे आणि असे असणारा हा  प्रथम देश आहे म्हणजेच जगातील ही पहिलीच घटना आहे.
सौदी अरेबियाने चक्क एका महिला रोबोटला नागरिकत्व दिलंय. हॉलीवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्न हिच्यासारखी ही सोफिया रोबोट दिसते.
सौदीची राजधानी रियाद मध्ये फ्युचर इनव्हेस्टमेंट इनिशिएटिव्हच्या व्यासपीठावर हा रोबोट नागरिकत्वाचा सोहळा पार पडला.
या  कार्यक्रमात सोफिया नावाच्या  रोबोटला  सौदी अरेबियाचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले आणि त्याने  तेव्हा त्यांनी सौदी अरेबियाच्या सल्तनतचे  आभार मानले.
व्यापारविषयक लेखक अन्ड्रयू रौस सॉर्किन यांनी  सोफियाच्या नागरिकत्वाची घोषणा  करताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला 
नागरिकत्वाच्या  घोषणेनंतर सोफियाच्या झालेल्या  मुलाखतीत तिने  ‘मी नागरिकत्व बहाल झालेला जगातली पहिली यंत्रमानव  या ऐतिहासिक घटनेबद्दल  सौदी अरेबियाचे आभार मानते ' असे सांगितले तसेच या गोष्टीचा  मला अभिमान आहे.अशा शब्दांत सोफियाने आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी तिने यत्रंमानव हा माणसांसाठी धोका आहे का ? या चर्चासत्रातही सक्रिय सहभाग घेतला.
अशी माहिती हाती मिळालेली आहे कि,  कृत्रिम बुद्धीला चालना देण्यासाठी, सौदी अरेबियाने रोबोटला नागरिकत्व दिले आहे. 
कसे आहे हे रोबोट
> सोफियाची निर्मिती हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी केली आहे.
>धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली ही सोफिया आहे विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता असलेली, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली अत्याधुनिक यंत्रमानव आहे . 
 >या रोबोटची सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते आपल्या रोजच्या कामाव्यतिरिक्त इतर प्रश्नांची उत्तरे देते.
>सोफिया चेहऱ्यावरील हावभाव ओळखू शकते आणि कोणासोबतही सामान्य व्यक्तीपणे बोलू शकते
> अनेक टी वही  चॅनल्सना तिने मुलाखतीही दिल्या आहेत. ‘

रोबोटमुळे रोजगारावर गदा येईल ?
जगप्रसिद्ध तंत्रज्ञ आणि टेस्ला या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक अॅलन मस्क यांनी 
भविष्यात सर्वात जास्त धोका हा कृत्रिम बुद्धिमत्तेपासून आहे, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांचे रोजगार हिरावले जातील असा इशारा काही महिन्यांपूर्वी दिलेला होता . कारण त्यांचे मते  रोबोट प्रत्येक गोष्ट  करण्यास सक्षम असतील. आणि माणसांपेक्षाही रोबोट उत्तम काम करतील. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येईल. 
त्याला प्रतिउत्तर देतांना सोफिया मुलाखतीत म्हणाली कि, 
मी एक संवेदनशील रोबोट असेल 

 मुलाखत  घेणा-याने जेव्हा तिला  आम्हाला वा"ईट भविष्याकडे जायचं नाहीये असं म्हटलं."  त्याला झटकन उत्तर देताना सोफिया म्हणाली कि तुम्ही काल्पनीक हॉलिवूड सिनेमे खूप बघतात वाटत . पण काळजी करू नका , जर तुम्ही मला नुकसान पोहोचवलं नाही तर मी देखील तुमच्याशी चांगलीच वागेल. मी एक  स्मार्ट कम्प्युटर म्हणून असेल  .
मानवांना चांगले जीवन जगता येईल यासाठी माझी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी पडेल  
तसेच  स्मार्ट डिझाईन बनविणे,   जगाला सर्वोत्तम  बनविण्यासाठी  प्रयत्न करेन असे सोफियाने स्पष्ट केले 

लेखक :  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)
--