सावधान ! सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य बिघडत आहे
स्पर्धात्मक करिअर, घड्याळाच्या काट्यावर धावण्याची मुंबईकरांची सवय, नोकरीच्या, रोजगाराच्या, व्यवसायाच्या, कौटुंबिक समस्या असोत किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या या अनेक कारणांमुळे मुंबईकर मानसिक तणावात असतात.आता त्यात सोशल मीडियावरील सततचा वावर , ऑनलाईन गेम्सचे व्यसन यांसारख्या कारणांची भर झालेली आहे . नुकतेच एका अहवालातून देशात मुंबई शहर तसेच उपनगरातील लोक सर्वाधिक ताणतणावात असून, त्यांना मानसोपचाराची गरज असल्याचे समोर आलेले आहे.मुंबईपाठोपाठ कोलकाता आणि बंगळुरु या शहरांचा क्रमांक लागतो.. अहवालानुसार मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये पहिल्या क्रमांकावर पश्चिम बंगाल तर महाराष्ट्र राज्य दुसर्या क्रमांकावर असल्याचं केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालं आहे. तसेच मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. राज्यातील सुमारे सव्वा लाख नागरिक मानसोपचार घेत आहे . आरोग्य मंत्रालयाने केलेल्या पाहणीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त केसेस नैराश्य (डिप्रेशन) आणि अँक्झायटीशी संबंधित आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञांच्यावतीनं हे सर्वेक्षण घेऊन हा अहवाल तयार केला आहे.
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजार आहे. सेल्फी आणि बॉडी इमेज इश्यूज याला कारणीभूत आहेत. चिंतेची बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनाही मानसोपचाराची गरज असल्याचे जे. जे. रूग्णालयाच्या मानसशास्त्र विभागाने अहवालात नमूद केले आहे.पूर्वी वयस्कर लोकांमध्ये मनोविकारांची लक्षणे आढळत होते आता तरुणांमध्ये हे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे या तरूणांमध्ये मनोविकाराबाबतची जागृती करणे गरजेचे असल्याचे त्यात स्पष्ट केले आहे .
सेल्फायटिस: अनेक तरुण-तरुणींना दिवसांतून कित्येक वेळा सेल्फी काढून त्या सोशल साईटवर पोस्ट करण्याची सवयच लागलेली आहे मात्र ही सवय कदाचित मानसिक आजाराची लक्षणेही असू शकतात. मनोवैज्ञानिकांच्या भाषेत याला सेल्फायटिस असे म्हटले जाते
>>सोशिअल मीडियामुळे उद्भवणारे मानसिक आजार
- ऑनलाईन गेम अॅडिक्शन
- सायबर बुलिंग
- फेसबुक डिप्रेशन
- बॉडी इमेज इश्यू
- नैराश्य,
- अँक्झायटी,
- सायकोसिस,
- बायपोलर डिसॉर्डर,
- डिमेन्शिया
- ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसॉर्डर (ओसीडी)
- अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर (एडीएचडी)
- डिमेन्शिया
>>मानसिक आजाराचे कारणे :
>>. सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रिया यामुळेही लोकांच्या मानसिकतेवर आघात केला जात आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजार निर्माण झाले आहेत. सेल्फी आणि बॉडी इमेज इश्यूज याला कारणीभूत आहेत.
>>>फेसबुकमुळे येणारा तणाव, सायबरशी निगडीत समस्या आणि ऑनलाइन गेमच्या आहारी जाणं आणि सोशल मीडियावर सतत पोस्ट करणेआणि लाइक्स वा कमेंट्स पाहणे,
>> अन्य नेटिझन्सचे प्रोफाइल्स फोटो पाहून डिस्टर्ब होणे: असे वाटणे कि सर्व जण खूप आनंदात आहेत त्या तुलनेत मी कुठेच नाही
>> आॅनलाइन गेमिंग करताना सतत एकाच लेव्हलमध्ये अडकणे, आॅनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरणे
>>सायबर बुलिंग: सोशल मीडियावर सर्फिग करत असताना इतरांकडून मिळणारी वाईट वागणूक , तुच्छ वागणूक दिली, अन्य लोकांकडून होणार उपहास , शारीरिक व्यंगावर टिपण्णी करणे , इतरांचे खराब फोटो टॅग करणे
मानसोपचार घेणारी देशातील 3 राज्यं
१. पश्चिम बंगाल
२. महाराष्ट्र
३ . कर्नाटक
लेखक : प्रा योगेश अशोक हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
No comments:
Post a Comment