Tuesday, 3 October 2017

"मेक इन इंडिया होम अॅटॉमेशन डिव्हाइस"


घेऊ भरारी........स्मार्ट सिटीसाठी इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर 
इंटरनेट ऑफ थिंगअंतर्गत स्मार्टफोनद्वारे नियंत्रित करा घरातील तसेच कार्यालयातील उपकरणे 

                                "मेक इन इंडिया होम अॅटॉमेशन डिव्हाइस"


पुणे : मोबाइलवरून घरातील, कार्यालयातील दिवे, पंखे सुरू अथवा बंद करता येणे आता अगदी सहज शक्य झालेला आहे  असे डिव्हाइस. पीआयसीटी महाविद्यालयात  कार्यरत असलेल्या निलेश गावडे या उच्चशिक्षित तरुणाने बनविले आहे  . 
मोबाइलवरून उपकरणे नियंत्रित करण्यासाठी कुठल्याही अंतराचे बंधन नसलेले हे  हे भारतातील पहिलेच अशा प्रकारचे डिव्हाइस आहे. या क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून याचे कौतुक होत आहे 
‘स्मार्ट  स्विच  डिव्हाइस कंट्रोलर ’ हे या  डिव्हाइस.चे नाव आहे .  मोबाइलवर एका अ‍ॅप्लिकेशनद्वारे  बसल्या जागेवरूनच तुमची सर्व कामे कराणे आता शक्य झालेलं आहे . याकरिता कुठल्याही  रेंजची मर्यादा नाही कुठूनही तुम्ही हे उपकरण वापरू शकता,  या  डिव्हाइसद्वारे घरातील कोणतीही आणि कितीही विजेची उपकरणे, ट्युब , ए सी ,फ्रीज, बल्ब, टीव्ही, फॅन इत्यादी   सुरू अगर बंद करणे शक्य आहे . मोबाइलमधील  इंटरनेट द्वारे अ‍ॅप्लिकेशन कनेक्ट करून   हे डिव्हाइस कार्यरत  होते.  या   डिव्हाइसचे निर्माते निलेश गावडे यांनी सांगितले कि., बाहेर गेल्यानंतर   घरी असलेल्यांना विजेच्या उपकरणांना बंद करण्याकरिता स्मार्टफोन द्वारे  डिव्हाइसला जोडलेले मेन स्वीच बंद करता येते   

 डिव्हाइस. बद्दल माहिती .
"स्वीच बोर्ड‘ला अदृनो मिक्रोकंट्रोलरचे हे उपकरण जोडलेले असून,  मोबाइलमध्ये त्याचे प्रोग्रामिंग आहे तिथे ट्युब , ए सी ,फ्रीज, बल्ब, टीव्ही, फॅन असे विविध आयकॉन आहेत. या आयकॉनना टच करून ते सुरू अथवा बंद करता येतात . हे निर्माण केलेले उपकरण इंटरनेट द्वारे मोबाइलला कनेक्‍ट केलेले आहे .त्यामुळे तुम्ही कुठूनही स्मार्टफोनद्वारे या उपकरणाशी कनेक्‍ट होऊन घरातील ,कार्यालयातील वीजेवरील उपकरणे  चालू असेल तर बंद करू शकता. 
सुरक्षितता 
स्मार्टफोनद्वारे या उपकरणाला कनेक्‍ट होण्यासाठी  "पासवर्ड‘ देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपले डिव्हाइस केवळ आपणच वापरू शकतो . 

डिव्हाइसची किंमत  
 डिव्हाइसची किंमत सध्या पाच  हजार रुपये निश्‍चित केली आहे. या  उपकरणामुळे विजेचा अपव्यय टाळता येईल . . इंटरनेट ऑफ थिंग्सचाद्वारे ऑटोमॅटिक कंट्रोलिंग म्हणजेच घरातील विजेवरील उपकरणे करणेनियंत्रित करणे  शक्‍य होईल

No comments:

Post a Comment