'भीम’ अॅपच अपडेटेड वर्जन आणि या अॅपची युवकांना अर्थसहाय्यासाठी प्रोत्साहनपर योजना
ज्या
प्रमाणे उबेर आणि ओला यांसारख्या अॅप आधारित टॅक्सी सेवांना रेफरल
दिल्यानंतर एक राइड फ्री मिळते त्याच प्रमाणे पंतप्रधान मोदींनी रेफरल
स्कीम काढून भीम अॅपला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.भीम अॅपचा
वापर करून युवकांना थोड्या फार प्रमाणात अर्थसाह्य उपलब्ध होईल अश्या या
योजना आहेत.
नुकताच आधार-भीम अॅपचा
शुभारंभ करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी एका अनोखी योजनेची
घोषणा केली आहे ,ती अशी आहे भीम अॅप वापरण्यासाठी कुणाला प्रोत्साहन दिले
तर प्रोत्साहन देणार्याला १० रुपये मिळतील. आणि ही योजना १४
ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे .
कशी आहे रेफरल योजना ?
भीम
अॅपमध्ये 'रेफरल' असा एक पर्याय आहे. तो वापरून तुम्ही जर एखाद्याला भीम
अॅप वापरण्याची शिफारस केलीत, त्याला ते वापरायला शिकवलंत आणि त्यानंतर
त्यानं जर त्यावरून तीन व्यवहार केले, तर तुमच्या खात्यात दहा रुपये जमा
होतील.
सुट्टीत पॉकेट मनी कमवा :
याचाच अर्थ जर एका दिवसात तुम्ही १० लोकांना 'भीम'शी जोडलंत तर तुम्हाला १०० रुपये मिळतील.
या
प्रमाणे तुम्ही उन्हाळी सुट्टी आणि इतर सुट्टीच्या काळात पॉकेट मनी कमवू
शकाल आणि त्यामुळे तुम्हाला आई-वडिलांकडे वेगळे पैसे मागावे लागणार
नाहीत,
दुकानदारांनाही उत्पन्नाचं साधन:
या
योजनेत ,जर एखाद्या व्यापाऱ्यानं आपल्या दुकानात जर भीम अॅपवरून व्यवहार
सुरू केले तर त्यालाही ठरावीक व्यवहारांनंतर २५ रुपये मिळतील, असाही पर्याय
आहे .
हे कसे काम करते
भीम’
अॅप आता ‘आधार’शी जोडण्यात आलं आहे. ज्यामुळे भीम अॅप यूजर्स आपला 12
डिजिट आधार कार्डचा नंबर वापरून डिजिटल व्यवहार करु शकतात.
भीम-आधार
ॲपमुळे आधारचा वापर करुन डिजिटल पद्धतीने पैसे भरण्याचा मार्ग प्रशस्त
झाला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला व्यापाऱ्याच्या बायोमेट्रिक प्रणित
उपकरणावर अंगठ्याच्या ठशासारखी बायोमेट्रिक माहिती वापरुन डिजिटल पद्धतीने
पैसे देता येतील. भीम-आधार मंचाच्या माध्यमातून कोणत्याही नागरिकाला
स्मार्ट फोन, इंटरनेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा वापर न करता डिजिटल
व्यवहार करता येतील.
ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, अशा लोकांसाठी यामुळे डिजिटल पद्धतीने पैसे भरणे सुलभ होणार आहे
भीम’ अॅपच अपडेटेड वर्जन
अॅप
लाँच केल्यानंतर दहा दिवसांतच डाउनलोडिंगची संख्या दहा लाखांवर गेली होती
.त्यामुळे भीम अॅपचे अपडेटेड म्हणजेच विकसीत वर्जन नुकतचं लॉन्च करण्यात
आलं आहे . अगोदरच्या वर्जनमध्ये ज्या काही त्रृटी होत्या त्यांमध्ये या
विकसीत वर्जनमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून काही नवीन फिचर्सचा समावेश
करण्यात आला असून . नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या(एनपीसीआय)
वतीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात विकसीत नवीन वर्जन बद्दल माहिती
सांगीतली आहे.
काही सुधारणा :
अॅप लॉन्च झाले तेव्हा फक्त हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांचा समावेश होता.
भीम
अॅपचे १.२ वर्जन आता आणखी ७ भाषेत उपलब्ध होणार आहे.तामीळ
,तेलुगू बंगाली, कन्नड़, गुजराती, मल्याळीआणि उड़िया या भाषांचा भीम
अॅपमध्ये समावेश करण्यात आला आहे यामुळे यूजर्स आपल्या बॅंक अकाउंट सोबत
आधार नंबर लिंक करून पैसे ट्रांसफर करू शकतात .
स्पॅम रिपोर्ट फीचर
यात
स्पॅम रिपोर्ट फीचरचा नव्याने समावेश करण्यात आला आहे ज्यामध्ये पैशांसाठी
रिक्वेस्ट करणाऱ्या अनोळखी लोकांना ब्लॉक केले जाऊ शतके. एनपीसीआय ने
इंप्रूव्ड कस्टमर रीड्रेसल मॅकॅनिजम देखील समाविष्ट करण्यात आले आहे.
याबरोबरच इतर महत्वाचे फिचर्सही अपडेट करण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे
-प्रायव्हसी सेटींग
-पासवर्ड विसरला असेल तर रिस्टोअर करता येणे
-ड्युअल-सिम स्मार्टफोनवर सिम निवड्याचा पर्याय
-तसेच बँकेला अडचणी सांगणे व घेतलेले पेमेंट परत करणे
या सुविधाही दिल्या गेल्या आहेत.
तर चला कॅशलेस व्यवहारांसाठी मोबाईल अॅप डाउनलोड करु या
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment