Tuesday, 3 October 2017

प्रॉजेक्ट इनसाइट


सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे टॅक्स चोरी आणि काळा पैसा पकडण्यासाठी आयकर विभागाची प्रॉजेक्ट इनसाइट ही मोहीम  : डेटा अॅनालिटिक्स,बिझनेस इंटेलिजन्स सिस्टीमचा होणार उपयोग .
प्रॉजेक्ट एंटरप्राइज डेटा वेयरहाउस, डेटा माइनिंग, वेब माइनिंग, प्रीडिक्टिव मॉडलिंग, डेटा एक्सचेंज, मास्टर डेटा मैनेजमेंट, सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग, कम्प्लायंस मैनेजमेंट आणि  केस ऐनालिटिक्स कैपेबिलिटीज तत्रंज्ञानाचे  मिश्रण आहे 

काळ्या पैसा बाहेर काढण्यासाठी आयकर विभागाने प्रोजेक्ट इनसाइट नावाने मोहीम हाती घेतला असून पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. या विशेष मोहिमेंतर्गत आयकर विभाग संबंधित व्यक्तीची सर्व माहिती आणि सोशल नेटवर्किंग साइटवरील माहिती पडताळून त्याद्वारे संबंधित व्यक्तीचा खर्च आणि घोषित उत्पन्नामधील फरक तपासून पाहणार आहेत. 
कोणतीही महाग वस्तू जसे गाडी वैगरे घेतली की लगेच मोठेपणा दाखविण्यासाठी  त्याचे प्रदर्शन सोशल मीडियावर करण्याची बऱ्याचशा लोकांना  सवय असते. परंतु आता सावधान ! कारण  या  महागड्या वस्तूंचे फोटो  जर त्यांनी ‘फेसबुक’  ‘इन्स्टाग्राम’ यासारख्या सोशल मीडियावर टाकलेत की , त्यांच्या मागे प्राप्तिकर विभागाच्या  अधिकाऱ्यांचा ससेमिरा लागणार आहे. प्राप्तिकर खात्याने काळा पैसा हुडकून काढण्यासाठी  ही शक्कल शोधली  असून, पुढील महिन्यापासून त्याची पद्धतशीर अंमलबजावणी होणार आहे.
आयकर विभागाकडून फेसबुक तसंच इन्स्टाग्रावर युजर्सने घेतलेले नवे दागिने, नवीन कार, घर किंवा परदेश दौऱ्यांच्या फोटोंवर करचोरी रोखण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी एका टीमच्या सहाय्याने नजर ठेवली जाणार आहे. जर त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न आणि खर्च याचा योग्य ताळमेळ बसला नाही तर त्यांची चौकशी केली जाईल. 
सोशल मीडियावर  नेहमी पडणाऱ्या पोस्टवरून वापरकर्त्याचे  एक व्यक्तिमत्त्व तयार होत असते. त्यावरून त्याची  सांपत्तिक स्थिती नेमकी काय असेल याचा अंदाजदेखील बांधता येतो. या प्रकल्पामुळे मोठ्या रकमेचे व्यवहार रोखणे आणि काळे धन बाहेर काढण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांना मदत होणार आहे.
डेटा अॅनालिटिक्सचा वापर केला जाणार
प्रत्येक करदात्याच्या उत्पन्नाची माहिती त्याच्या सोशल मीडियावरील स्टेटसशी पडताळून पाह्ण्याकरिता  डेटा अॅनालिटिक्सचा वापर केला जाणार असून त्यातून यावरून सोशल मीडियावरील उपलब्ध माहिती करदात्याने जाहीर केलेल्या उत्पन्नाचा ताळमेळ बसतो का तेही पाहिले जाणार आहे. यात कोणतीही तफावत आढळल्यास प्राप्तिकर विभाग त्याचे विश्लेषण करून संबंधित करदात्याची खर्च करण्याची वृत्तीही तपासणार आहे. असे करणे सोपे जावे यासाठी सरकारने प्रत्येक करदात्याला आधार व पॅन एकमेकांशी संलग्न करण्यास सांगितले आहे. यामुळे व्यक्तीचे उत्पन्न व संपत्ती ,मालमत्ता  यांचे निरीक्षण करता येणार आहे.
प्रॉजेक्ट इनसाइटचे   काम एल अँड टी इन्फोटेक कंपनीकडे 
हा  प्रॉजेक्ट इनसाइट राबवण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एल अँड टी इन्फोटेक या खासगी कंपनीशी करार केला आहे. 
या प्रकल्पात आयटी विवरणपत्रे, आयटी अर्ज, टीडीएस-टीसीएस अहवाल, आर्थिक व्यवहार अहवाल या सर्वांचा वापर केला जाणार आहे.
आयकर विभागाने गेल्या वर्षी प्रोजेक्ट इनसाइटच्या अंमलबजावणीसाठी एल अँड टी इन्फोटेक सोबत करार केला होता 
बिझनेस इंटेलिजन्स सिस्टीमची मदत होते  डेटा  विश्लेषक/ टेक्निकल अ‍ॅनालिस्ट साठी 
कुठल्याही उद्योगसमूहात वेगवेगळे असे विभाग असतात ह्या विविध विभागातील प्रचंड माहिती असते .हि  वेगवेगळ्या विभागात प्रचंड प्रमाणात जमा होणारी माहिती    डेटा वेअरहाउस मध्ये साठविली जाते . ह्या प्रचंड माहितीच्या साठ्यावर स्वतः निर्णय घेणे अवघड असते   ह्या माहितीचा वापर अहवाल आणि डेटा विश्लेषण साठी वापरण्याकरिता बिझनेस इंटेलिजन्स सिस्टीम वापरतात .एक डेटा वेअरहाउस अनेक ठिकाणाचा   डेटा एकत्रित करून तयार  करण्यात आलेले असते .बिझनेस इंटेलिजन्सचा  उपयोग  विश्लेषणात्मक अहवाल, रचना आणि / किंवा तात्कालिक चौकशी व निर्णय घेण्याकरिता होतो . 
कंपनीच्या माहितीचं पृथक्करण करणं, मिळालेल्या या माहितीच्या आधारे  निष्कर्षांच्या आधारे नवे आडाखे बांधणं आवश्यक तेव्हा कंपनीला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी व्यावहारिक उपाय सुचवणं, त्या सगळ्याचा आढावा घेणं आणि माहितीचं विश्लेषण करणं आदी कामं बिझनेस इंटेलिजन्स अ‍ॅनालिस्टला करातात .
अर्थात माहितीचं पृथक्करण व विश्लेषण करण्याची प्रक्रियेतून समस्या दूर करण्यासाठी 'ज्ञान' प्राप्त करणे हि कामे बिझनेस इंटेलिजन्स अ‍ॅनालिस्टची असतात . 
बिझनेस इंटेलिजन्स सिस्टीम कशाच्या आधारे  विश्लेषणात्मक अहवाल, रचना आणि  तात्कालिक चौकशी व निर्णय घेईल  
सोशल मीडियावरील तयार झालेल्या व्यक्तिमत्त्वातून दिसणारी संपत्ती .
तुमचा खर्च करण्याचा पॅटर्न व सोशल मीडियावरील तो खर्च केल्याचे जाहीर करणे.
 सोशल मीडियावर तुम्ही दाखवलेली माहिती व आणि उत्पन्नाच्या  स्रोतपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ 
प्रॉजेक्ट इनसाइट कशासाठी ?
-कर भरणा करण्यात  सुधारणा करण्याकरिता  माहिती एकत्र करण्याचा हा प्रकल्प राबवण्याचा हेतू आहे
- कारचोरी होऊ नये यासाठी  
-करपूर्तता वाढावी यासाठी वैयक्तिक स्तरावर माहितीची शहानिशा करण्याचा हा प्रयोग असणार आहे.
-सोशल मीडियावर करडी नजर ठेवली तर घरात छापा न टाकताच आयकर विभागाला महत्त्वाची माहिती मिळू शकेल
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment