Tuesday, 3 October 2017

तिसरे महायुद्ध असु शकते ........सायबर महायुध्द

सावधान ! जग उभे  आहे तिसरया महायुद्धाच्या उंबरठ्यावर .......
तिसरे महायुद्ध असु शकते ........सायबर महायुध्द 
विचार करा जर  ,एखादी ऑन लाइन एयर इंडिया किंवा  इंडियन रेल्वे ची वेब साइट हॅक झाली .....?  सगळ्या क्रेडीट कार्ड्स ची,डेबिट कार्डचे  डीटेल्स, वैयक्तिक माहिती इत्त्यादी वर त्या सायबर दहशतवाद्याचा  चा ताबा जाइल.
आणि जर कधी बँकिंग क्षेत्रात जर असा हल्ला झाला तर कुठल्याही देशाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील 
हल्लीचे जग हे इंटर्नेट सॅव्ही झालेले आहे आणि बरेचसे महत्वाचे व्यवहार हे इंटरनेट वर होतात म्हणून हे व्यवहार करतांना काळजी घेतली पाहिजे 
अलीकडच्या दहशतवादी घटनांमधला आधुनिक तंत्रज्ञानाचा सफाईदार वापर महत्वाचा ठरला आहे. उत्तर अमेरिकेतल्या व्हरमाँटमधल्या ‘व्हॅली न्यूज’मध्ये मॅथ्यू स्कोफील्ड यांनी पॅरिसवरच्या हल्ल्यात झालेल्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या चांगल्या आणि वाईट बाजूंचा विचार केला आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यात केलेला आॅनलाईन चॅटींग, गेमींग, सोशल मीडिया आणि जीपीएसचा केलेला वापर त्यांची योजना अंमलात आणण्यासाठी महत्वाचा ठरला होता.  जी तंत्रे त्यांच्या विरोधात लढताना उपयोगी ठरणारी आहेत ती त्यांना देखील उपलब्ध होत आहेत.
रक्तपात न करता गुन्हेगारी वाढली आहे. अनेक अतिरेक्‍यांकडून संगणकाचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे तिसरे महायुद्ध  सायबरमधून लढले जाईल. 
सायबर क्षेत्रात दक्षिण कोरियासारखे छोटे देशही आपल्यापेक्षा प्रगत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. सायबरमध्ये चीनची भीती अमेरिकेला आहे. म्हणून भारताने अमेरिकेबरोबर सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. भारतात तयार होणा-या संगणकतज्ज्ञांना काही वर्ष देशात राहून सेवा करायला हवी. 
सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून, संगणकाचा वापर होऊन तिसरे महायुद्धही होऊ शकते हे भारताने लक्षात घेतले पाहिजे आणि तातडीने त्यावर उपाय योजना केल्या पाहिजे .
आज भारतासमोरच नाही तर जगासमोर आणि प्रत्येक माणसासमोर ‘सायबर युद्धाचे  ’चं भयावह संकट उभं आहे
तिसरं महायुद्ध हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवं, असं थोडंच आहे. कारण युद्धाची पद्धत  बदलली आहे . महायुद्धे आता कुठही होतात, त्याचं ठिकाण  त्याचं ठिकाण व्हर्च्युअल म्हणजे आभासी जग असतं  असू शकत आणि  हे विश्व आहे, इंटरनेटचं… 
सायबर हल्ल्याचे काही उदाहरण 
 १ हॅकर्सनी अमेरिकेच्या सरकारी संगणकातील माहिती चोरली आहे. आताच्या व माजी अशा मिळून ४० लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती चोरण्यात आली असून आतापर्यंत अमेरिकी संगणकावर हॅकर्सनी  केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. 
२ एखादा सायबर हल्ला क्षणार्धात ही गुप्तता धोक्यात आणत असल्याच्या घटनाही समोर येत असतात. अमेरिकेतील ऑफिस ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (ओपीएम)वर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये तब्बल ५६ लाख  जणांचे फिंगरप्रिन्ट्स चोरीला गेले आहेत. 

सायबर महायुद्धावर प्रतिबंध 

इंटरनेट वापरताना  नेट बँकींग अकाऊंट क्रमांक, आपला आयडी क्रमांक, पासवर्ड, क्रेडीट किंवा डेबीट पासवर्ड क्रमांक अथवा उघड करताना सावधानता बाळगावी. ऑन लाईन खरेदी करताना सुरक्षिततेचे उपाय योजावेत.  स्पॅम मेल, फसवे मेल यावर डबल क्लिक करुन उघडण्याचा प्रयत्न करु नये. अशा मेल मधून व्हायरसची एक्झीक्युटेबल फाईल आपल्या नकळत डाऊन लोड होते. आपण जेव्हा संगणकावर काम करतो तेव्हा केलेल्या कामाची एक डुप्लीकेट फाईल तयार होऊन ती हार्ड डिक्सवर सेव्ह होते. जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो तेव्हा अलगदपणे ही माहिती हॅकरला मेल व्दारे प्राप्त होते. .त्यामुळे  फसगत टाळण्यासाठी अशा प्रकारचे फसवे मेल डीलीट करावे आपली संगणक सिस्टीम ऍन्टी व्हायरस, फायर वॉलने सुरक्षित ठेवावी.
सायबर युद्धातील  गुन्हेगार कसे शेधावे
 सायबर गुन्हे व गुन्हेगार शोधणे सोपं आहे. फ्रॉड मेल, धमकी देणारे मेल, किडनॉपिंग, फिशिंग, पोर्नोग्राफी आदींचे गुन्हे उघड करणे अतिशय सोपे आहे. यासाठी वापरात आलेल्या संगणक किंवा मेलवरुन गुन्हेगाराचा आयपी ऍड्रेस (इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस) शोधला जातो. असा मेल कोणत्या सर्व्हरवरुन आला हे शोधले जाते. आयपी ऍड्रेसवरुन वापरण्यात आलेल संगणक, त्याचा प्रकार, इंटरनेट स्पीड, सर्व्हरचे लोकेशन व सदरचा मेल कोठून आला हे उघड करुन गुन्हेगाराला शोधता येते.
 कोणताही सायबर ऍटॅक आयपी ऍड्रेसद्वारे शोधणे शक्य आहे. सुरक्षितता,सावधगिरी बाळगून इंटरनेटचा वापर करणे ही काळाची गरज आहे.
एथीकल हॉकिंग
 तज्ञांच्या निष्कर्षानुसार आज डेटा थेप्ट, सायबर स्टॉकिंग, हॉकिंग, व्हायरस ऍटॅक, पोर्नोग्राफी ही महत्वाची सायबर आव्हाने आहेत
एथीकल हॉकिंग भविष्यातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी चांगल्या संधी आहेत. वाय फाय कनेक्शनबाबत देखील सुरक्षित वापर महत्वाचा आहे.सायबर . सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे निर्भयपणे तक्रारी नोंदवणे आवश्यक आहे.

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
mobile: 9423077963

No comments:

Post a Comment