Tuesday, 3 October 2017

प्रवाशांच्या सोयीसाठी `मोबाइल अॅप्स`

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीचे आणि रेल्वेचे `मोबाइल अॅप्स`
रेल्वेचे `मोबाइल अॅप्स`
सध्याच्या आधुनिक युगात मोबाइल अ‍ॅप्स हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अ‍ॅप्सपैकी अनेक अ‍ॅप्स हे आपल्याला खूप उपयुक्त तर ठरतातच याचबरोबर ते खूप लोकप्रियही होतात.रेल्वेने हि `मोबाइल अॅप्स`बनविले आहे .त्यामुळे रेल्वे  प्रवाशांना आता त्यांच्या स्मार्टफोनवर रेल्वेची माहिती काही क्षणात उलब्ध होत आहे. रेल्वेने मोबाईल अॅप्स विकसित केले आहे. या नविन अॅप्समुळे  रेल्वेची माहिती मोबाईलवर उपलब्ध आहे.
रेल्वे नेमकी किती वाजता येणार तसेच  जाणार आणि गाडी सध्या कोणत्या ठिकाणी आहे, याची अगदी बिनचूक माहिती प्रवाशांना उपलब्ध आहे. या अॅप्सद्वारे प्रवाशांना आपल्या गाडीशी संबंधित माहिती तात्काळ मोबाइलवर मिळते .
 मायक्रोसॉफ्टच्या मदतीने हे अॅप्स विंडोज ८ ची सुविधा असणाऱ्या मोबाइल आणि संगणकावर सुरुवातीला वापरता येते .

या अॅप्समुळे प्रवाशांची  धावपळ होणर नाही तसेच त्यांचा वेळही  वाचणार आहे  याआधी रेल्वे गाडय़ांसंबंधी अथवा आरक्षणासंबंधी माहिती मिळविण्यासाठी प्रवासी १३९ हा हेल्पलाइन क्रमांक, रेल्वेचे संकेतस्थळ (www.trainenquiry.com) रेल्वे स्थानकांवरील फलक, चौकशी केंद्र आदींचा वापर केला जातो. त्यात आता मोबाइल अॅप्सची भर पडली आहे.
 रेल्वेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या  या  अॅप्स वर  गाडय़ांच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त इतरही माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. 

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीचे ‘अॅप’
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक काळानुसार तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे.त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे 
आता महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी एका क्लिकवर तिकिटांचे आरक्षण करता यावे यासाठी 'एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन अॅप'ची (msrtc mobile reservation app) निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे प्रवाशांना हव्या त्या गाडीच्या तिकिटाचे आरक्षण करता येणार आहे. या अॅपद्वारे प्रवशांना तिकिटाचे पैसे ऑनलाइन भरता येणार आहेत.
त्यामुळे यापुढे  प्रवाशांना तिकीट आरक्षण केंद्रावरील रांगेत थांबावे लागणार नाही  कारण कि आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना  मोबाइलवर तिकीट आरक्षित करता येणार आहे. तसेच त्यामुळे. इंटरनेटवरून तिकीट आरक्षित करताना येणाऱ्या मर्यादांवर मात करता येणार आहे.
अँड्राइड मोबाइलसाठी 'गुगल प्ले स्टोअर'वर हे अॅप मोफत उपलब्ध आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर आवश्यक माहिती सादर करून प्रवाशांना 'लॉग-इन' करावे लागेल. त्यानंतर प्रवाशांना कोठे जायचे आहे, कोणत्या गाडीने जायचे आहे, कोणत्या ठिकाणाहून गाडीमध्ये बसायचे आहे, तसेच कोणत्या ठिकाणावर उतरायचे आहे, या माहितीसह आसन क्रमांक, बसचा प्रकार, बसची वेळ प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार निवडण्याची सुविधा अॅपमध्ये आहे. तिकीट आरक्षण करताना ऑनलाइन पैसे भरण्याची  सुविधा देखील आहे. त्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट व डेबिट कार्ड इत्यादी  पर्याय देण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment