
इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग......सावधानता बाळगा
इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग
साधे
पासबुक भरून घेण्यासाठी जिथे पूर्वी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे
तिथे आता आपण आपली महिन्याची बिले/रिचार्ज पण घरबसल्या इंटरनेट/मोबाईल
बँकिंग द्वारे भरू शकतो
ह्यात पण काही संभाव्य धोके/त्रुटी आहेत
--अकौंट hack होणे
--मोबाईल
बँकिंग मध्ये connectivity नसल्याने फंड ट्रान्स्फर मध्येच अडकणे ( डेबिट
तर पडते पण क्रेडीट होत नाही आणि ही ट्रान्स्फर पूर्ण होण्यास ७-१० दिवस
जातात )
मोबाईल बँकिंग सिक्युरिटीच्या काही टिप्स
१
सर्वात महत्वाचे म्हणचे आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती
मोबाईल डिव्हाइसमध्ये स्टोअर करू नका. जसे खाते क्रमांक, डेबिट आणि क्रेडीट
कार्ड पीन आपल्या फोनमध्ये स्टोअर करू नका. तुम्ही बँकिंग अॅप युज करत
असाल तर तुमच्या अॅपचा युजर नेम आणि पासवर्ड मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेऊ
नका. चुकीच्या हातात मोबाईल गेल्यावर त्याचा गैरवापर होऊ शकतो.
२पब्लिक
वाय-फायचा वापर मोबाईल बँकिंगसाठी टाळा. खात्यासंदर्भातील सूचना टेक्स्ट
मेसेजद्वारे पाठवू नका. तसेच सेफ मोबाईल बँकिंगचा वापर करताना स्क्रिन
अनलॉकचे ऑप्शन वापरा.
३बँकिंग संदर्भातील अधिकृत अॅप बँकेच्या
ऑफिशअल अॅप स्टोअरमधून डाऊनलोड करा.ऑफिशअल अॅप्सचा वापर करा. ------------
चुकीच्या अॅपच्या वापरामुळे आपल्या मोबाइलमध्ये व्हायरस किंवा मालवेअरचा
धोका जास्त असतो. त्यामुळे योग्य अॅपचा वार केला नाही तर तुमची ऑपरेटिंग
सिस्टिमला मालवेअरचा धोका होण्याची शक्यता अधिक आहे.
४. जेव्हा
तुम्हांला एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल आला तर त्यावर कॉल बॅक करताना
सावधानता बाळगा. . अशा कॉलसाठी तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल. तसेच फोन
सुरू असताना तुमचा डेटा ट्रान्सफरही होऊ शकतो.
५. सोशल मीडियाच
वापर करताना सावधान ------------ सोशल मीडियाचा वापरत करतानाही विशेष काळजी
घेण्याची गरज आहे. मालवेअर अटॅकसाठी सर्वात घातक प्लॅटफॉर्म सोशल मीडिया
आहे. सोशल मीडियामध्ये बरेच युजर अशा काही माहिती शेअर करतात त्यामुळे
मालवेअर अटॅक होण्याची शक्यता आहे. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका जी
तुम्हांला बँकेच्या साइटवर घेऊन जात असेल. ती बनावटी वेबसाइट असू शकते.
तसेच टेक्स मेसेज किंवा इमेल करण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment