Tuesday, 3 October 2017

"कॅशलेस व्यवहार"

"कॅशलेस व्यवहार" प्लास्टिक मनी
केंद्र सरकारच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे   हजार, पाचशेच्या नोटा निरुपयोगी झाल्या असून  सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे  अनेकांनी कॅशलेस व्यवहारावर भर दिलेला आहे .... कॅशलेस व्यवहार हे प्लास्टिक मनी वापरून करता येतात.
हे प्लास्टिक मनी चे आपण समजून घेऊ या. खरेदी करताना पैसे चुकते करण्यासाठी रोख पैसे भरण्याऐवजी वापरा 
प्लास्टिक मनी-
प्लास्टिक मनीचे तीन मुख्य प्रकार आहेत.
कार्डचे तीन प्रकार
१ Credit Card
२ ATM Card
आणि
३ Debit Card.
उपयोग :  रक्‍कम काढण्याकरिता .
तसेच  खरेदी करन्यासाठी या कार्डचा वापर  केला जातो.  रोख रक्कम बाळगण्याची गरज नसते.
एटीएम -डेबिट कार्ड कार्डधारकांनी बँक खात्यामध्ये ठराविक  रकमेची शिल्लक कायम स्वरूपात ठेवायला हवी, हि रक्कम किती याबद्दल  प्रत्येक बॅंकेचे वेगवेगळे असतात . हि रक्कम ठेवली नाही तर दंड म्हणून काही  रक्कम नंतर खात्यातून वसूल केली जाते.
कार्डचे स्वरूप:
कार्डवर धारकाचे नाव, १६ अंकाचा कार्डक्रमांक,  मुदत, CVV सिक्‍युरिटी कोड, मॅग्नेटिक बॅंड, Strip  असते.
कार्डच्या  मॅग्नेटिक पट्टीवर चरा पडू नये म्हणून ते त्याच आकाराच्या प्लास्टिक किंवा कागदी  पाकिटात ठेवावे.
कार्ड कंपन्या :
 व्हिसा आणि मास्टरकार्ड या दोन मुख्य आणि जागतिक स्तरावरील कंपन्या आहेत तसेच रूपे हि भारतीय कंपनी आहे  कार्डची मुदत  तारीख कार्डवर दिलेली असते. मुदत संपली की नवीन renewal कार्ड घ्यायचे असते.
व्हिसा आणि मास्टरकार्डचा वापर देशांतर्गत व देशाबाहेर वैध वापरासाठी केला जातो  रूपे कार्ड हे देशांतर्गत वापरता येते
नवीन कार्ड व रिन्युवल कार्ड साठी  कार्डची ठराविक किंमत दरवर्षी मोजावी द्यावी लागते . बॅंक खात्यातून ती  कापून घेतली  जाते .  वार्षिक शुल्काचे 400, 500 वा हजार रुपये भरावे लागतात.
कार्ड स्वाइप केल्यावर नंतर पिन टाकावा
एटीएम डेबिट कार्ड खरेदीसाठी वापरताक्षणीच तेवढी रक्कम खात्यात डेबिट पडते, काढली जाते. परंतु  क्रेडिट कार्ड वापरल्यास ५०  दिवसांनंतर ते पैसे खात्यात नावे पडतात.
डेबिट कार्ड' आणि 'क्रेडिट कार्ड' यातील फरक म्हणजे डेबिट कार्ड वापरल्यावर डिपॉझिट अकाऊंटमधून पैसे वजा होतात, तर क्रेडिट कार्डावर पैसे क्रेडिटवर वापरता येतात
एटीएम व डेबिट कार्ड :
 एटीएम कार्डचा वापर एटीएम सुविधा असलेल्या ठिकाणी पैसे काढण्यासाठीच  होतो. पण डेबिट कार्ड  कार्डधारकाला डेबिट कार्ड स्वाइप करून किंवा कार्डाचा तपशील ऑनलाइन भरून खरेदी करता येते.
कार्डचे फायदे
- पाहिजे तेव्हा पैसे काढता येतात.
- मोबाईल रिचार्ज करता येतो.
-  विविध बिले,  येतात .
- खरेदी करता येते
-  हे कार्ड वापरून ऑनलाइनखरेदी करता येते आणि सिनेमा, विमान, रेल्वेची तिकिटेही काढता येतात.
-  कार्डच्या सहाय्याने विम्याचे हप्ते भरता येतात
-- कार्ड वापरून मोबाइलफोन, डीटीएच, वीजबिल अशा वेगवेगळ्या बिलांचे ऑनलाइन पेमेंट करण्याचे प्रमाणही  वाढले आहे.
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment