Tuesday, 3 October 2017

कॉम्पुटर व्हायरस आणि त्यावर उपाय?

कॉम्पुटर व्हायरस आणि त्यावर  उपाय?

आजचे युग हे संगणकाचे आहे. सर्व व्यवहार हे कम्प्युटराइज झाल्याने त्याला टाळणे शक्य नाही. ऑफिसात, घरी कम्प्युटर इथे त्याचा वावर  आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तर संपूर्ण जग मानवाच्या अंगणात आले आहे.
घरोघरी संगणक आलेले आहेत   परंतु तरीदेखील त्याच्या सुरक्षिततेविषयी कोणाला फारशी माहिती नसते. 
आजच्या संगणकीय युगात  व्हायरस हा शब्द तुमच्या परिचयाचा असेल  असेल तस्वेच  या व्हायरस चा तुम्हाला  बर्याच वेळा त्रास देखील झाला असेल. 
  कॉम्पुटर व्हायरसचा त्रास 
- संगणक अचानक खूप स्लोव होणे 
- कधी अचानक तुम्ही न उघडलेल्या फाईल ओपन होत आहे अचानक रिकामे फोल्डर दिसू लागतात ते delete  होत नाही,कधी असे हि झाले असेल कि, तूमच्या कम्युटरमधे एक मालवेअर येतो आणि त्याच्यामुळे तूमच्या हार्ड डीस्कच्या ड्राईव्ह्ज उघडत नाहीत  
  कॉम्पुटर  व्हायरस  म्हणजे:  एक प्रकारचा लहान प्रोग्राम असतो फक्त तो आपल्या उपयोगाचा नसून आपल्या संगणकासाठी हानिकारक असतो virus देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतो virus ,  malware , आपला संगणक slow करण्यापासून ते आपला संगणक hack करण्यापर्यंत व्हायरस काम करतो.
कॉम्पुटर व्हायरस संगणकात प्रवेशाचे करणे 
आपण काहीच नं करता जसे आपल्या शरिरात जंतू शिरु शकतात, तसे संगणकाच्या बाबतीत होऊ शकत नाही. आपल्या संगणकावर व्हायरस शिरला तर त्याला पुर्णपणे आपणच जबाबदार असतो. 

१. इंटरनेट ला आपला संगणक जोडणे. 
२. इमेल मधुन आलेल्या व्हायरस असलेल्या फाईल्स आपल्या संगणकावर उतरवून घेणे. 
३. संगणकावरील एखादा व्हायरस असलेला प्रोग्राम चालू करणे.
४. फ्लॉपी डिस्क/फ्लॅश मेमरी संगणकात घालून अथवा दुसर्‍या संगणकास आपला संगणक जोडून काही व्हायरस असलेल्या फाईल्स कॉपी करणे. 
५. एखादी अशी सीडी संगणकाच्या ड्राईव्ह मध्ये घालणे की ज्यामध्ये व्हायरस असलेल्या फाइल्स आहेत. 

 व्हायरस आपल्या संगणकापासून दूर ठेवण्यासाठी सध्या अनेक प्रकारचे अॅण्टी व्हायरस सॉफ्टवेअर आहेत त्यातील काही  पैसे देऊन खरेदी करावे लागतात,

तसेच काही  अॅण्टी व्हायरस  इंटरनेटवर मोफत मिळतात . 
व्हायरस आणि मालवेअर हल्ला टाळण्यासाठी  उपाययोजना:
- तुमच्या सिस्टममध्ये एखाद्या चांगल्या कंपनीचा अॅण्टी व्हायरस टाकून घ्यावा आणि  अॅण्टी व्हायरसची शेवटची तारीख लक्षात ठेऊन ते वेळच्या वेळी अपडेट करन घ्यावे . तसेच तुम्ही तुमच्या कम्प्युटरला जेव्हा कधी मोबाइल, पेन ड्राईव्ह किंवा दुसरे कोणते डिव्हाईस जोडाल तेव्हा ते स्कॅन करुन घ्या. कोणत्या नोंदणीकृत वेबसाइटवरुनच  काही डाऊनलोड करावे . तसेच तुमची सिस्टम वेळच्या वेळी फॉर्मेट करत जा.
-अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर नियमितपणे वापरून संपुर्ण पीसी स्कॅन करणे गरजेचे आहे. 
-  कंप्युटरची ओएस अद्यावत ठेवा. विंडोज सिस्टममध्ये ऑटोमॅटीक सिक्युरिटी अपडेट्सची सुविधा चालू करा. 
- फाईल्स, हार्ड ड्राईव्ह तसेच बॅकअप ड्राईव्हसाठी एन्क्रिप्शनचा वापर करा. एनक्रिप्टकेलेल्या फाईल्स पाहण्यासाठी पासवर्डची गरज असते, 
-- इमेल वापरताना देखील काळजी घ्यावी . इमेलमधून आलेल्या वर्ड, एक्सेल किंवा पीडीएफ फाईल व्हायरस असू शकतात.  इंटरनेट वापरण्यासाठी आपण जे ब्राउझर वापरतो ते सुद्धा अपडेटेड असल्याची खात्री करावी. गुगलचे क्रोमहे एक उत्तम ब्राउझर आहे
लेखक : प्रा योगेश हांडगे  
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment