मनातील भावना बिनधास्त व्यक्त करा
Sarahah App सोशल मीडिया अॅप
सौदी
अरेबियातील जेन अबीदिन तौफिकने बनविलेले Sarahah App हे सोशल मीडिया अॅप
सध्या बरेच चर्चेत आहे आणि तरुणाईमध्ये लोकप्रयही होत आहे
हे अॅप जुलै 2017 मध्ये लेटेस्ट अपडेट करण्यात आलं आहे.
ज्या
लोकांशी तुम्ही समोरासमोर काही बोलू शकत नाहीत. त्यांच्याशी या अॅपच्या
माध्यमातून बोलता येते कारण त्यांना तुम्ही कोण आहात हे कळत नाही.
सराहाला
अरबीमध्ये इमानदार असे म्हटले जाते. कंपनीबद्दल कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक
अभिप्राय जाणून घेण्यासाठी आणि त्यांची गुप्तता ठेवण्यासाठी याचा उपयोग होऊ
शकतॊ
का आहे लोकप्रिय
आपल्याला
आवडणाऱ्या व्यक्तीशी काही खास बोलायचं पण हिम्मत नाही,आपल्या भावना तर
पोहचवायची आहेत पण आपली ओळख लपवून, त्यासाठी तरुणाईच्या मदतीला आले आहे.
हे सोशल मीडिया अॅप .
आणि फक्त आवड्त्याच नाही तर न आवडत्या व्यक्तीलाही संदेश पोहचविण्याकरिता तरुणाई या अॅपचा उपयोग करीत आहे .
म्हणजेच
आपल्या मनातील एखाद्याविषयी असलेलं प्रेम किंवा तिरस्कार तुम्ही
त्याच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आजची तरुणाई हे सोशल मीडिया अॅप वापरात आहे
कारण यामुळे तुमची ओळख गोपनीय राहील.
आयडेंटिटी गुप्त राहत असल्यामुळे अनेक जण हे मनातील भावना समोरच्यापर्यंत पोहचविण्याकरिता अॅप वापरत आहेत.
खाजगीरीतीने आपण दुसऱ्याची प्रशंसा किंवा उणीवा त्याला सांगू शकतो
‘साराहाह’ची लिंक तरुणाई फेसबुकवर शेअर करत आहे . सोशल मीडियावर Sarahah च्या लिंक्सचा पूर आलेला आहे.
या लिंकवर क्लिक करून आणि साईन इन करुन तुम्ही एखाद्या आवडत्या तसेच नावडत्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्न विचारु शकता.
आपल्या वर्तणुकीचा मित्रांकरून अभिप्राय जाणून घेण्याकरिता याचा उपयोग होतो
तसेच आलेल्या मजेशीर अभिप्रायांचा स्नॅपशॉट गंमत म्हणून सोशिअल मीडियावर शेअर करा
Sarahah अॅप वर अकाऊण्ट कसे उघडावे
सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरुन Sarahah अॅप डाऊनलोड करन घ्यावे
iOS
फाइल 22 एमबी, तर अँड्रॉईड फाईल 12 एमबीची आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर
तुम्ही साईन इन करा . तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबुक अकाऊंटवर शेअर
करा. यानंतर तुमचे मित्रमैत्रीणी तुम्हाला मेसेज पाठवतील . यात मेसेज
पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्हाला समजणार नाही.
Sarahah अॅपच्या नकारात्मक मेसेजचा त्रास वाढलाय
>>Sarahah
अॅप मध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त राहते. या निनावीपणामुळे
अर्थातच तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटणार नसल्यामुळे काही
वेळा काही व्यक्ती अत्यंत खालच्या ठरला जातात आणि कोणालाही कशाही
प्रकारचा मेसेज पाठतात .
>> आंबट शोकीन व्यक्ती अश्लील मेसेज पाठवून त्रास देण्याचा प्रयत्नही करतात. त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे कठीण होते.
>>काही लोक शिवराळ भाषेत मेसेज पाठवितात .
त्रासावर उपाय काय?
आपल्याला
या अॅपवर अनोळखी व्यक्ती शिवराळ किंवा अश्लील मेसेज पाठवीत असेल तर त्याला
ब्लॉक करण्याचे ऑपशन उपलब्ध आहे त्याचा वापर करून त्याला ब्लॉक करा
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment