Tuesday, 3 October 2017

वाढदिवशी केला अवयवदानाचा संकल्प

अशोक हांडगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा
           …… वाढदिवशी केला अवयवदानाचा संकल्प 

चांदवड : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी  व नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आजीव सभासद अशोक हांडगे  यांचा वाढदिवस दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय श्री अशोक हांडगे आणी  कुटुंबाने  घेतला होता . समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवसाला वेगळे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला .
दुष्काळाची तीव्रता सध्या सर्वत्र वाढत चालली असून, जिल्ह्याबरोबरच चांदवड  तालुक्यातही पाणी टंचाईच्या झळा वाढत चालल्या आहेत. या परिस्थितीचा विचार करून  अशोक हांडगे  यांनी हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना परिवाराला ,आप्तस्वकीय आणि  मित्र समूहाला  दिल्या होत्या . त्याप्रमाणे  खर्चाला फाटा देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस हांडगे परिवाराने साजरा केला केला .  या दिवशी अशोक हांडगे  यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे 
यावेळी झालेल्या कार्यक्रमात  बोलतांना 
 श्री अशोक हांडगे  म्हणाले कि , गावागावात अवयवदान चळवळ सुरु झाली पाहिजे ,
अवयवदान म्हणजे ज्या रुग्णाचा एखादा अवयव आजारामुळे निकामी झाला आहे त्याला आपला अवयव देऊन जीवनदान देणे
अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यांच्या शरीरातील अवयवाचा इतरांना फायदा होऊन ती व्यक्ती इतर व्यक्तीच्या माध्यमातून या जगात जिवंत राहू शकते.
ब्रेन-डेथ  जाहीर झाल्यानंतर  लवकरात लवकर  निर्णय घेतला गेला तर दोन्ही मूत्रपिंडे, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड, लहान आतडे, ह्रदय, स्वरयंत्र, हात, गर्भाशय,  डोळे, कर्णअस्थी, त्वचा व फॅर्शिया, हाडे,इत्यादी अवयव दान केले जाऊ शकतात.
पुढे बोलतांना श्री हांडगे  म्हणाले कि, 
ब्रेनडेड म्हणजे एखाद्या अपघातात व्यक्तीच्या मेंदूला मार लागल्याने त्याचा मेंदू काम करत नसतो. मात्र, त्याच्या हृदयातून शरीरातील इतर भागांना  ऑक्‍सिजनचा पुरवठा कायम राहिल्यास ती व्यक्ती तीन दिवस जगू शकते. अशा वेळेस जर त्या व्यक्तीने आपले अवयव  दान केल्यास त्यापासून अनेकांचा जीव वाचू शकतो.  ज्यांना मृत्यू नंतर अवयव दान करण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी हयात असतांनाच  नोंदणी करून डोनर कार्ड मिळवणे गरजेचे आहे. तसेच आपल्या आप्त स्वकीयांना  याची  कल्पना देऊन त्यांची  तयारीही करून ठेवायला हवी. 
यादिवशी श्री हांडगे यांचे सुपुत्र प्रा योगेश हांडगे यांनी हि नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे . 
हांडगे  परिवाराचा अवयव दान आणि नेत्रदानाचा निर्णय पंचक्रोशीत जनजागृतीचा ठरला आहे

No comments:

Post a Comment