Tuesday, 3 October 2017

वाढदिवसाच्या आहेरातून होणार रेनवॉटर हार्वेस्टिंग

वाढदिवसाच्या आहेरातून होणार रेनवॉटर हार्वेस्टिंग
 .........पाणी नियोजनासाठी पावसाळ्यापूर्वीच दूरदृष्टीपणा 
 चांदवड:पाण्याच्या उपलब्धतेच्या बाबतीत जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. पण तरीही खेडय़ातील स्त्रीचे पाण्यासाठीचे हेलपाटे कमी होत नाहीत . दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा वाढत्या प्रमाणात जाणवत आहे, पण गेल्या १०० वर्षांतील पाऊसमानात फारसा फरक पडलेला नाही.उलट पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून अतिवृष्टीत दुपटीहून जास्त वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांत विदर्भ-मराठवाडय़ात ५००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणासाठी आत्महत्या केल्या आहेत. या सगळ्याचे मूळ कारण पावसाचा लहरीपणा हे आहे व त्यातून सुटका करून घेण्यासाठी पावसाचे पाणी साठवले पाहिजे.जर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा असेल तर प्रत्येक खेडय़ाने आपल्या शिवारात पडलेला पाऊस अडविला पाहिजे व लहान बंधाऱ्यात साठविला पाहिजे. त्यामुळे भूजलाची पातळी वाढते.  पाणी काटकासरीने वापरणे बंद झाले. परिणामी पाणी तुटवडा पडणाऱ्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे हि परिस्थिती बदलण्याकरिता योग्य नियोजन केले पाहिजे असा विचार करून 
पावसाळ्यात पावसाचे पडणारे पाणी वाचविण्यासाठी एक आगळावेगळा संकल्प नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी  व नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आजीव सभासद अशोक हांडगे  यांनी  केला आहे. त्यांच्या वाढदिवसात  आप्तेष्टांकडून आहेर म्हणून जमा झालेल्या पैशांमध्ये  त्यांनी पावसाळ्यात घराला  परवडणारी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा लावण्याचे ठरवले आहे. 
त्यांचा वाढदिवस नुकताच विविध  सामाजिक उपक्रम राबवून  चांदवड येथे   साजरा झाला. . समाजकार्याची आवड असणाऱ्या हांडगे यांना  वाढदिवस सभारंभात आप्तेष्ट तसेच मित्रसमूह यांच्या कडून  आहेर, भेटवस्तूंच्या स्वरूपात ७  हजार रुपयांची रक्कम जमा झाली. या रक्कमेत  त्यांनी घरांना  रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा लावण्याचे ठरवले आहे.
या यंत्रणेंतर्गत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी घरांच्या छतावर असलेल्या आउटलेटला प्लास्टिकच्या पाइपने जोडण्यात येईल. त्यानंतर हे पाइप घरी असणाऱ्या  टाक्यात सोडण्यात येणार आहे. हि  संपूर्ण यंत्रणा उभारण्याचा खर्च प्रति घर ३ हजार रुपये येणार आहे.
या यंत्रणेमार्फत पावसाळ्यात प्रत्येक घराच्या छताहून पाणी जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. . या पाण्याचा वापर पावसाळ्यात दररोज घरगुती वापरासाठी करता येईल. त्यामुळे पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग होणार आहे.ही यंत्रणा उभारण्याची सुरुवात हांडगे  यांनी स्वतःच्या  घरापासून केली असून यंत्रणा उभारण्यासाठी गावातील नागरिकांना मार्गदर्शन करणार आहे . 

No comments:

Post a Comment