Tuesday, 3 October 2017

घरबसल्या बँकिंगचे व्यवहार :

घरबसल्या  बँकिंगचे व्यवहार :

१. फोन बँकिंग:


फोन बँकिंग सर्विसेस ह्या ट्रँजॅक्शन प्रकारांच्या अनुसार आयव्हीआर आणि एजंट ऑफरिंगचा मेळ आहे. 
आयव्हीआरच्या माध्यमातून संबंधित बँकेच्या कर्मचार्यांशी कोणताही संबंध न येता फोनसाठी देण्यात आलेल्या पासवर्डच्या माध्यमातून ग्राहकाला ख्त्यातील बलेंस ,बिल व इतर माहिती घरबसल्या  मिळते यामुळे वेळ वाचतो हि  सुविधा दिवसातील २४ तास सुरु असते
यामध्ये  विविध बँका विविध सुविधा ग्राहकांना देतात त्या आपण पाहू
उबलब्ध सुविधा :
कार्ड गहाळ झाल्याचे कळवणं, तक्रारी, विनंत्या आणि चौकश्या नोंदवणे सर्व ट्रँजॅक्शन्ससाठी फोनबँकर  सर्विसेस उपलब्ध आहेत.
 खात्यातील शिल्लक रकमेची माहिती मिळवता  येते  - यात आपल्याला आपल्या  बचत किंवा चालू खात्यातील आणि तुमच्या मुदत ठेवीवरील अगदी शेवटच्या सेकंदापर्यंतची ताजी माहिती मिळवता  येते. आपल्या खात्यातील शेवटच्या ५ व्यवहारांची देखिल माहिती आपल्याला मिळते , किंवा शेवटच्या १५ व्यवहारांचे मिनीस्टेटमेन्ट फॅक्सद्वारे आपण मागवू शकतो
धनादेशाच्या स्थितीची चौकशी करता येते  - भारतात कोठेही देण्यात आलेले किंवा जमा करण्यात आलेल्या धनादेशाची स्थिती जाणून घेण्यासाठी आपण  फोनबँकिंगचा लाभ घेवू शकतो .
धनादेशपुस्तिका/खात्याचे स्टेटमेन्ट मागवता येते  - केवळ फोनबँकिंगशी संपर्क साधून  आपण आपली  धनादेशपुस्तिका किंवा आपल्या  खात्याचे ताजे स्टेटमेन्ट घरपोच  मागवु शकतो.
धनादेशाचे पेमेंट थांबवु शकतो  - एक किंवा अनेक धनादेशांचे पेमेंट आपण थांबवू शकतो .
कर्जाशी संबंधित चौकशी करू शकतो  - बाकी कर्जाच्या रकमेची माहिती मिळते , आपण कर्जाच्या खात्याबद्दल चौकशी करू शकतो , व्याजाचे प्रमाणपत्र आणि कर्ज परतफेड वेळापत्रक घरपोच  मागवु शकतो. आपल्या  शहरातील फोनबँकिंगशी संपर्क साधून , आपल्या पसंतीची भाषा निवडून  फोनबँकरशी चौकशी करू शकतो .
डिमॅटशी संबंधित चौकशी करता येते.
मुदत ठेवीचे खाते उघडता येते :  - आपल्या  बचत खात्यातून निधी हस्तांतरण अधिकृत करून फोनवर मुदत ठेव खाते उघडण्यासाठी  फोनबँकरशी चर्चा करता येते.
खात्याखात्यात निधी स्थानांतरित करू शकतो  - यात आपण आपल्या  एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे स्थानांतरित करू शकता. दोन्ही खाती आपल्या ग्राहक क्रमांकाशी संलग्न असले पाहिजेत. आपण  एका दिवसात काही ठराविक रक्कम स्थानांतरित करू शकतो .
बिले भारता येतात  - आपले  सेल्यूलर फोन, टेलिफोन, वीज  बिले फोनबँकिंगद्वारे बिलपेचा उपयोग करून भारता येतात, हे एक सर्वसमावेशक बिल पेमेन्ट निराकरण आहे.
एटीएम/डेबिट कार्ड पिन/नेट बँकिंग आयपिन वगैरे पुन्हा निर्माण करण्याची विनंती करता येते - आपले एटीएम/ डेबिट कार्ड पिन/नेट बँकिंग आयपिन वगैरे पुन्हा निर्माण करण्यासाठी फोनबँकिंगशी संपर्क साधता येतो
आपले एटीएम/डेबिट/प्रीपेड कार्ड हरविल्याचे कळवता येते  - जर आपले एटीएम/डेबिट/प्रीपेड कार्ड हरविले तर तुमची कार्डे अकार्यान्वित (ब्लॉक) करण्यासाठी कोणत्याही फोनबँकिंग क्रमांकावर संपर्क साधत येतो .
 डिमांड ड्राफ्ट/मॅनेजर्स चेक ह्यांची विनंती करता येते  - फोनबँकिंगशी संपर्क साधून  डिमांड ड्राफ्ट/मॅनेजर्स चेक घरपोच मिळविता येतात 

 २.  मोबाईल कॉमर्स  आणि एम पेसा .....


मोबाईल फोनच्या किमतीमध्ये सतत घसरण होत आहे. तसेच इंटरनेट वापरण्यासाठी अतिशय कमी पैसे मोजावे लागत असल्याने मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येतही  मोठी वाढ झालेली आहे आणि या पुढेही  होणार  आहे. त्यामुळेच देशात मोबाईल कॉमर्स  आनि मोबाईल बँकिंग 
यांचा वापर झपाट्याने वाढलेला आहे तर  या मोबाईल कॉमर्स  आणि एम पेसा या बद्दल

ऑनलाईन खरेदीने मोठा वेग घेतला आहे.  यामध्ये मोबाईल ऍपचा मोठय़ा प्रमाणावर वापर वाढला आहे. त्यामुळे ये मोबाईल कॉमर्स ई-कॉमर्स क्षेत्राला मागे टाकेल असे दिसतेय मोबाईल ऍप डाऊनलोड करणार्यांच्या संखेत दिवसेंदिवस  वाढ होत आहे.
ई-कॉमर्स कंपन्या आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी मोबाइल ऍप्लिकेशन्सवर जास्त लक्ष केंद्रीत करीत आहेत. मोबाइल कॉमर्स बाजारावर  पकड मजबूत करण्यासाठी फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, स्नॅपडील आणि क्वीकर यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या देशातील लहान ‘स्टार्ट अप्स’ची खरेदी करताना  दिसत आहेत. तसेच  मोबाइल तंत्रज्ञानावरही मोठी गुंतवणूक केली जात आहे. कारण  येणाऱया काळात मोबाइल शॉपिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग बनणार आहे. कारण सर्वात जास्त ऑर्डर मोबाइलद्वारे येत आहेत.
मोबाईल फोनवर इंटरनेट वापरणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत  आहे. मोबाईल फोनच्या किमतीमध्ये सतत घसरण होत आहे. तसेच इंटरनेट वापरण्यासाठी अतिशय कमी पैसे मोजावे लागत असल्याने मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येतही  मोठी वाढ झालेली आहे आणि या पुढेही  होणार  आहे.
एम पेसा
मोबाईल तंत्रज्ञानाच्या  वापरातून ग्रामीण तसेच  दुर्गम भागातील नागरिकांना जलद, सुलभ व सुरक्षित पद्धतीने पैसे हस्तांतर करण्याची "एम-पेसा‘ ही आधुनिक सेवा काही मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी देशात सुरु केली आहे .
महाराष्ट्रात "व्होडाफोन'ची  "एम-पेसा' योजना सुरू झाली आहे . मोबाइलच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने पैशांचे हस्तांतरण करू शकणारी एम-पेसा ही वैशिष्ट्यपूर्ण सेवा व्होडाफोनच्या वतीने येथे सादर करण्यात आली. या योजनेसाठी व्होडाफोन इंडियाने आयसीआयसीआय बँकेशी सहकार्य करार केला आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाबरोबरोबर भागीदारीमध्ये रिलायन्स उद्योग, एअरटेल एम कॉमर्स सर्व्हिसेस, आदित्य बिर्ला नुवो, वोडाफोन एम पेसा, टेक महिंद्रा आणि पोस्ट विभागाला रिझर्व बॅंकेने बॅंकिंग व्यवहार सुरू करण्यास तत्त्वतः परवानगी दिली आहे.
फायदे आणि उपयोग 
 बॅंकेच्या सहकार्याने सुरू करण्यात असलेल्या या सेवेमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविणे , मोबाईल रिचार्ज खरेदी करणे, डीटीएच सेवेचे रिचार्ज,  अशा निरनिराळ्या मोबाईल पेमेंट सुविधेचा लाभ घेता येतो .
"एम-पेसा‘ ही सेवा बॅंकिंग सेवा नसलेल्या व बॅंकिंग सेवा अपुऱ्या असलेल्या लोकसंख्येला मोबाईल फोनमार्फत वित्तीय सेवा उपलब्ध करून देते.

रोजगारासाठी घरातील कमावती व्यक्ती बाहेरगावी राहत असताना, आपल्या कुटुंबीयांना घरी पैसे पाठवण्यासाठी ही सेवा अतिशय उत्तम ठरणारी आहे. आर्थिक सर्वसमावेशकता हा देशातील प्राधान्यक्रमाचा विषय आहे आणि तो साध्य करण्यासाठी "एम-पेसा‘ हे आदर्श साधन आहे.
आपण कोणत्याही मोबाइल फोनवर पैसे पाठवू शकता. आपण कोणत्याही बँक खात्यात पैसे पाठवू शकता. मोबाईल रिचार्ज, बिले भरा आणि डीटीएच सेवा सदस्यता अदा करू शकता. आपण एकाच स्टोअरमध्ये खरेदी निवडू शकता.एम-पेसा एक अद्वितीय पैसे हस्तांतरण आणि पेमेंट सेवा आहे.

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत

No comments:

Post a Comment