अधुनिक शिक्षणासाठी नवीनतम शैक्षणिक मोबाइल अॅप’
=====================
१) इंटरॅक्टिव्ह विज्ञान संग्रह – या अॅपमध्ये जीवशास्त्राशी संबंधित १००हून अधिक संज्ञा आणि संकल्पना देण्यात आल्या आहेत. तसेच यात काही संकल्पनांचे व्हिडीओजदेखील उपलब्ध आहेत. या अॅपमध्ये जीवशास्त्राचे मानवी शरीर, वातावरण, पेशी असे विविध विभाग आहेत . तसेच बरीचशी माहिती सांगण्याकरिता फ्लॅशचा उपयोग यात केलेला आहे . माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना हे अॅप उपयुक्त ठरणारे आहे . यात सरावासाठी प्रश्नावली दिलेली आहे.
शब्द शोधण्याकरिता सर्चचा यात पर्याय दिलेला आहे .
हे अॅप आयओएस ५.० व त्या पुढच्या ओएसवर काम करते.
हे अॅप मोफत उपलब्ध आहे
२)ग्राफिंग कॅलक्युलेटर – हे अॅप कॅलक्युलेटर मूळ संख्या , नॅचरल लॉग, एनटीएच रूट पर्मिटेशन्स, लॉग बेस १०, मॉडय़ुल्स, बेल कव्र्ह,कॉम्बिनेशन्स,वर्गमुळे , घन आदी गणिती प्रकार सोडविण्याचकरीत उपयुक्त आहे. हिशोब तसेच वैज्ञानिक गणित सोडविण्यासाठी हे अॅप कॅलक्युलेटर उपयुक्त ठरते.
या अॅपमध्ये दाब, वेग, शक्ती, मास,अंतर, एनर्जी,वेळ, तापमान,एरिया, इत्यादी मापकांचे कन्व्र्हटर उपलब्ध आहे.
हे अॅप आयओएस ६.० व त्या पुढच्या ओएसवर तसेच अँड्रॉइडच्या २.१ आणि त्याच्या पुढच्या व्हर्जनवर वापरता येते .
हे अॅप मोफत उपलब्ध आहे
कायम्बू – शिक्षकांकरीत अत्यंत उपयुक्त असणारे हे अॅप आहे . याअॅपमुळे कॅमेराचा वापर करून हाताने लिहिलेल्या नोट्सचे छायाचित्र काढून ते ई-मेलद्वारे पाठविणे इत्यादी कामे शक्य होतात या अॅपमध्ये उपलब्ध असलेल्या विविध निकषांच्या आधारे पालकांशी संवाद साधून तसेच एखाद्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या उणिवा भरून काढण्यासाठी शिक्षकांना त्याचा उपयोग होतो.
हे अॅप आयओएस ५.१ व त्या पुढच्या ओएसवर काम करते.
हे अॅप मोफत उपलब्ध आहे .
प्रा योगेश हांडगे
No comments:
Post a Comment