Tuesday, 3 October 2017

मोबाइल हॅक होत आहेत


सावधान ! मोबाइल हॅक होत आहेत काळजी घ्या 
नुकतेच नाशिक शहरात अवघ्या काही तासांत २८ पेक्षा अधिक व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले .  हॅक करण्यात आलेल्या २८ अकाऊंट पैकी २६ अकाऊंट महिलांचे आहेत. यावरून हॅकर्सनी महिलांना टार्गेट करायला सुरूवात केल्याचे उघड झाले असून प्रकारामुळे  नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे.नाशिक बरोबरच अनेक शहरांमध्ये हे प्रकार घडत आहेत !

नेट सर्फिंगही मोबाइलवरून करण्यास अनेकजण प्राधान्य देत आहे . वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने कम्प्युटरऐवजी आता मोबाइलवरून सायबर अॅटक होत आहेत  आणि त्याचे प्रमाण वाढत आहे . 

मोबाईल कसे हॅक होतात ?
-जीएसएम तंत्रज्ञान असलेले मोबाईल फोनला   हॅक करण्यासाठी लागणारे हार्डवेअर  आरामात जोडता येते त्यामुळे ते  हॅकर्सच्या जाळ्यता फसतात . 
-मोबाइल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट ‘लिंक’ (मालवेअर असलेल्या) नागरिकांना पाठविली जाते आणि . नागरिकांना फोन करून त्या लिंक पाठवलेले मेल, मेसेज उघडण्यास सांगण्यात येते. अनेकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येतो.
-हकर्स केवळ एक मेसेज पाठवून आपल्याला हवा त्याचा मोबाईल हॅक करून त्यावरील संभाषण, माहिती, छायाचित्र दूरवरून मिळवू शकतात. 
हॅकर्स काय करतात ?
हॅकिंगमध्ये अनेकदा फोनमध्ये स्टोअर असलेली माहितीही बदलली जाते
 - तसेच अनेकवेळा मोबाईलचा डेटा हॅक करून बँक खात्यातून परस्परच रुपये दुसऱ्या खात्यात वळविले जातात . 
मोबाइलमध्ये सुरू असलेले सर्व अॅप्लिकेशन अगदी मेल, फेसबुक, ट्विटरसुद्धा हॅक केले जातात , मेलमध्ये असलेल्या डाटाचा वापर करत ‘क्रेडिट, डेबिट’ कार्डची गोपनीय माहिती मिळवून  त्याद्वारे लाखो रुपये काढले जातात . 
 -हॅकर्सने  काही बँकाकडील ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा ‘डाटा’ हॅक केलेला आहे .  हॅकर्सने अनेक बँकाचा ‘डाटा’ मिळविला  आहे. या क्रेडिन्शिअलचा वापर करून ऑनलाइन लूटमार करण्यासाठी हॅकर्स ग्राहकांच्या मोबाइलमध्ये मालवेअर पाठविता .
हॅकिंगकरिता हॅकर्सकडून  ‘ओटीपी’ चा वापर !
हॅकर्सकडून शक्यतो लूटमार करण्यासाठी रात्रीची वेळ निवडण्यात येते . . हॅकर्सने मोबाइल हॅक केला असल्याने त्यांना पैशांचे ऑनलाइन व्यवहार करताना लागणारा ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) लगेचच मिळतो. या पासवर्डचा वापर करून ते ऑनलाइन लूटमार करतात .
कसे होते व्हॉटसअॅप-फेसबुक अकाउंट हॅक ?
व्हॉटसअॅप-फेसबुक अकाउंट हॅक करून अकाऊंटद्वारे अश्लिल मॅसेज पाठविले जातात 
व्हॉटसअॅप किंवा फेसबुक रिइन्सॉटल करताना संबंधीत कंपीनकडून एक ओटीपी पाठवण्यात येतो. या पासवर्डच्या मदतीनेचे आपण संबंधीत अॅप्लिकेशन वापरू शकतो. हॅकर्स   परिचितांपैकी एकाचा मोबाईल हॅक करून त्यावर व्हॉट्सअॅप रिइन्सॉटल करण्याचा ओटीपी मिळवून  व्हॉट्स अॅप हॅक करतात आणि  नंतर कॉन्टेक्ट लिस्टमध्ये पोहचून इतरांचे मोबाईल हॅक करण्याचा सपाटा सुरू करतात. व्हॉटसअॅप अकाउंट हॅक करून रिइन्सॉटल करताना नागरिकांच्या मोबाईलवर ओटीपी आल्यावर हॅकर हॅक केलेल्या अकाउंटवरून काही भूल थापा मारून ओटीपी पाठवण्याबाबत विनंती करतो . आपल्या ओळखीतील व्यक्ती मदत मागते म्हणून संबंधितांनी तो मॅसेज फॉरवर्ड करतो.अशा रीतीने , हॅकर सहजपणे  हॅकिंग करू शकतो 
मोबाइलचं हॅक  झाल्याचे लक्षण कोणते ?
- .अचानक रीस्टार्ट होणे
मोबाइल एकदम शटडाऊन होणे
मोबाइलमधून आपोआप एसएमएस पाठवला जाणं
मोबाइलमधील  अ‍ॅप्स अनपेक्षितरीत्या सुरू किंवा बंद होणं,
  ही मोबाइल हॅक झाल्याची  लक्षणं आहेत. 
आर्थिक व्यवहार करतांना काळजी घ्या 
- पैसे देण्यापूर्वी केवळ चॅटिंगवर विसंबून नराहता मोबाईलवर बोलून खात्री करून घ्यावी
- मेलमध्ये  किंवा एसएमएस मध्ये आलेली  अनोळखी लिंक उघडू नये  आणि  ती लिंक चुकून उघडल्यास मोबाईल फॉरमॅट करून घ्या. 
- अनोळखी व्यक्‍ती मेसेज किंवा मेल  करीत असेल तर त्याला ब्लॉक करने हे योग्य ठरेल 
मोबाईल हॅकिंगपासून  सरंक्षित ठेवण्याकरिता  काय काळजी घ्याल? 
- ब्ल्यू टूथ वापरत असाल तर ते बंद किंवा  इनव्हिझिबल मोडमध्ये ठेवा. 
-त्याशिवाय फोन सतत अपडेट करत रहा. म्हणजे त्यातील कार्यक्रम  तुम्हाला सतत समजत राहिल.
- तुमच्या फोनला पासवर्ड असू द्या. त्यामुळे दुसरा कोणीही तुमच्या फोनचा वापर करू शकणार नाही. 
-मोबाइलवर आलेल्या कुठल्याही अनोळखी मेसेजमध्ये एखादी लिंक पाठवली गेली असेल, तर ती उघडू नका.  मेलमधीलसुद्धा अनोळखी लिंक उघडू नका
-एखादं अ‍ॅण्टिव्हायरस अ‍ॅप इन्स्टॉल करा.
--मोबाईलचा आयएमईआय क्रमांक शेअर करू नका
लेखक : प्रा योगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )



No comments:

Post a Comment