Tuesday, 3 October 2017

मोबाईल फोन्सवर अनेक प्रकारचे 'अटॅक' होत आहेत तेव्हा सावध रहा.




स्मार्टफोन वापरतांना काळजी घ्या ! मोबाईल फोन्सवर अनेक प्रकारचे 'अटॅक' होत आहेत तेव्हा सावध रहा.
                                सर्वेलिअंस अटॅकमध्ये 
अटॅकर्स मोबाईल जीपीएसला टार्गेट करून तुमच्या दिनचर्येची  माहिती मिळवून तिचा वापर अगदी घर फोडण्यासाठीदेखील करतात दैनंदिन कामांसाठी मोबाईल फोनचा वापर करणा-यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे . सर्वीकडे मोबाईलचा वापर जास्त होत आहे
मोबाईलला आजकाल आवश्यक वस्तूंमध्ये मोडले जात आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते जवळपास सर्वच वयोगटातील मोबाईल धारक  आपल्याला पाहायला मिळतात
 अनेकांना तर स्मार्टफोनची इतकी सवय असते की, त्यांना फोनशिवाय एक मिनीटपण राहणे फार अवघड आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत स्मार्टफोन बहुतेकांना गरजेचाच झालेला आहे
मोबाईल फोन हरवीला किंवा चोरीला गेला की त्यात असलेला आपला प्रायव्हेड डेटा दुसऱ्या कुणाच्या  हाती जाण्याची शक्यताच अधिक असते. आणि यामुळे आपल्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असते . स्मार्टफोनमध्ये  क्रेडिट कार्डची माहिती, बँक खाते क्रमांक, पासवर्डस इत्यादी पर्सनल माहिती ठेवतो तसेच व्यावसायिक मोबाईलमध्ये कॉर्पोरेट डॉक्युमेंट्सही सेव्ह करतात. ज्यामुळे वेळेवर ती त्यांना उपलब्ध होतात परंतु  मोबाईल हरवल्यास ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या हातून निघून जाते.
त्यामुळे स्मार्टफोन वापरतांना खालील काळजी घ्या :
१. त्यामुळे मोबाईलच्या  मेमरी कार्डमधील डेटा 'इनक्रिप्ट' करून ठेवावा त्यामुळे डेटा 'इनक्रिप्ट' केल्याने डेटा दुसऱ्याच्या हाती गेला तरी  तो सुरक्षित राहील .
स्मार्टफोनमधील मेमरी कार्डमधील डेटा 'इनक्रिप्ट' करून ठेवल्यास तो डेटा इतरांना वापरता येणार नाही .
२. स्मार्टफोनमध्ये बनावट अॅप्लिकेशन्स इन्स्टॉल करणे टाळा . अॅप्लिकेशन्स बनावट मेल किंवा बनावट मेसेजमधून आलेल्या लिंकवरून डाउनलोड करु नका .
३. स्मार्टफोनला  पासवर्ड ठेवा. त्यामुळे  काही काळ  डेटा सुरक्षित राहील . आणि काहीवेळा शोधाशोध केल्यावर तेवढ्या वेळात फोन सापडण्याची शक्यता असते.
४. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या फ्री वायफायना मोबाईल कनेक्ट करू नका .
कारण इथे मोबाइल अटॅकर्सदेखील कार्यरत असतात ते  थोडा प्रयत्न करून वायफायना कनेक्ट केल्यानंतर तुमचा पर्सनल डाटा मिळवू शकतात. 
५. फोनमधील वाय-फाय, ब्लूटूथ बंदच ठेवा.
मोबाईल फोन्सवर स्पायवेअर अटॅक, सर्वेलिअंस अटॅक फिश‌िंग अटॅक असे अनेक 'अटॅक' होत आहेत तेव्हा सावध रहा
>> सर्वेलिअंस अटॅक: सर्वेलिअंस अटॅकमध्ये  अटॅकर्स मोबाईल जीपीएसला टार्गेट करून तुमच्या दिनचर्येची  माहिती मिळवून तिचा वापर अगदी घर फोडण्यासाठीदेखील करतात  . 
>>स्पायवेर अटॅक: यामध्ये फोनमधील फसवे अॅप्लिकेशन्स तुमची पर्सनल माहिती चोरतात .
>>फिश‌िंग अटॅक: यामध्ये  फोनमधील पासवर्डस्, क्रेडिट कार्ड नंबर, अशी माहिती मेलमधून अथवा बनावट मेसेज भूलथापा देवून  फसवून  तुमच्याकडून घेतली जाते.
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत)

No comments:

Post a Comment