Tuesday, 3 October 2017

‘तेज’ मोबाइल पेमेंट अॅप


डिजिटल व्यवहारासाठी गुगलचे नवीन  ‘तेज’ मोबाइल पेमेंट अॅप

 भारतातील झपाट्याने वाढणा-या डिजिटल पेमेंट बाजारात  गुगलचं ‘तेज’ हे यूपीआय बेस्ड डिजिटल पेमेंट अॅप  दाखल झालेलं  आहे . 
भारतात ही सेवा सुरू करण्यामागे ऑनलाइन मार्केटचा विकास हे महत्त्वाचे कारण आहे. याशिवाय मोबाइल इंटरनेट युजर्सची वाढती संख्या आणि स्मार्टफोनची विक्री हेही कारण आहे. भारत सध्या जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे 
 ‘तेज’ हे ‘मेक इन इंडिया’ उत्पादन असून, ‘अँड्रॉईड पे’प्रमाणे ते काम करणार आहे. तेज हा हिंदी शब्द असून, त्याचा अर्थ आहे गती. गतिमान सेवेचे प्रतीक म्हणून हे नाव गुगलने निवडले आहे, असे असं गुगल इंडियाकडून  सांगण्यात आलेलं आहे.
यूपीआय भारतीय राष्ट्रीय देयक निगमकडून लाँच करण्यात आलेली देयक प्रणाली आहे. ही प्रणाली भारतीय रिझर्व्ह बँक नियंत्रित करते. यूपीआयच्या मोबाइल प्लॅटफॉर्मवर दोन बँक खात्यांत पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा ही सिस्टीम उपलब्ध करून देते.
फ्रीचार्ज,पेटीएम, मोबीक्वीक  तसेच विविध नामांकित बँकांची स्टेट बँक बडी,आयसीआयसीआय पॉकेटस ,एचडीएफसी चिलर, सिटी मास्टरपास अशी अॅप्सची लोकप्रिय झालेली आहे . त्यामुळे देशातील लहान गावांमध्येही आता डिजिटल पेमेंटचा पर्याय स्विकारला जात आहे. भारतात अॅपमुळे डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठे बदल होणार आहे . 
५० हजार रूपये प्रति महिना पैसे घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही
.ऑपरेटिंग सिस्टिम  : हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड आणि iOS दोन्हीसाठी उपलब्ध आहे.
या अ‍ॅपमध्ये QR कोड स्कॅन करूनही पेमेंट करण्याची सुविधा आहे. गूगलने मायक्रोमॅक्स, पॅनासॉनिक, लावा आणि नोकिया सारख्या कंपन्यांना डिस्ट्रिब्यूशन पार्टनर बनवलं आहे.  
 
तेज’ मोबाइल पेमेंट अॅपमध्ये उपलब्ध सुविधा :
- तेज अॅपवर इंग्रजी, मराठी, कन्नडा,बंगाली, गुजराती, हिंदी,तामिळ आणि तेलगु भाषा उपलब्ध असतील. 
-ग्राहकांना  अॅपद्वारे पैसे पाठवणे, बँक खात्यात थेट पैसे स्विकारणे, बिल पेमेंट अशा सुविधा मिळणार आहेत
-  तेज अॅपने अत्यंत सुलभतेने एका बँकेतून दुस-या बँकेत रक्कम ट्रान्सफर करु शकता. 
- तेजमध्ये उपलब्ध असलेल्या  कॅश मोडद्वारे तात्काळ एखाद्याला पैसे पाठणे  किंवा पैसे स्विकारणे सोपे झाले आहे  
- तेजमध्ये उपलब्ध असलेल्या  कॅश मोडद्वारे किराणादुकानदार, दूधवाला, सलूनवाला इत्यादी व्यापाऱ्यांना  डिजिटल पेमेंट करु शकता. म्हणजेच दुकानदार त्यांच्या अकांऊटमध्ये डिजिटल पेमेंट घेण्यासाठीही याचा वापर करू शकतात.
- या अॅपद्वारे डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट करायची सुविधा उपलब्ध होणार आहे. 
अ‍ॅप  वापरा  आणि बक्षीस मिळवा 
इतर पेमेंट वॉलेट्ससारखं यातही यूजर्सना स्क्रॅच कार्ड, रेफरल रिवॉर्ड आणि लकी संडे लकी ड्रॉसारखे ऑफर्स उपलब्ध आहेत . 
भारतातील  डिजिटल पेमेंट बाजारात आणखी काही बड्या कंपन्या उतरत आहेत
 यूपीआय आधारित इंटरफेस प्लॅटफॉर्म विकसित करीत असल्याची घोषणा व्हॉटस्अ‍ॅपने  केली आहे. या सठी व्हॉटस्अ‍ॅपकडून एनपीसीआय आणि काही बँकांशी चर्चा सुरू केलेली आहे . 
तसेच  फ्लिपकार्ट ,फेसबुक, ट्रूकॉलर, या  कंपन्यांनीही मोबाइल पेमेंट सेवा सुरू करण्याची तयारी केलेली  अाहे.
लेखक :  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

No comments:

Post a Comment