Tuesday, 3 October 2017

मोबाइलचे डॉक्टर "मोबाइल अ‍ॅण्टीव्हायरस"

मोबाइलचे  डॉक्टर "मोबाइल अ‍ॅण्टीव्हायरस"

स्मार्ट फोनची यंत्रणा बिघडवण्यासाठी अनेक व्हायरसेसही बाजारात आलेले आहेत.हे व्हायरसेस फोनची खूप हानी करू शकतात. यामुळे यांच्यापासून जपून राहिले पाहिजे 
व्हायरसचा धोका केव्हा ?
एकमेकांकडून माहितीची देवाण-घेवाण करताना, वाय-फाय नेटवर्कचा वापर करताना हा व्हायरसचा धोका अधिक असतो. या सर्व प्रकारांत  मोबाइलची काळजी घेतली पाहिजे . तर चल इथे आपण मोबाइलसाठी  कुठले  अ‍ॅण्टीव्हायरस उपयुक्त असतात हे  आपण जाणून घेऊ या !
कॅस्पर्सस्काय 
हा अ‍ॅण्टीव्हायरस  कॉम्प्युटर बरोबरच  मोबाइलसाठीही उपयोगी आहे.  हा अ‍ॅण्टीव्हायरस तुमच्या स्मार्ट फोनची फोन मेमरी पूर्णपणे स्कॅन करतो. मालवेअर्स, व्हायरस फाइल डिलीट करण्यास मदत करतो. यामुळे तुमच्या स्मार्ट फोनमधील डेटा व्हायरसपासून सुरक्षित राहतो. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला ब्लॅकलिस्टची सुविधा उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्ही नको असलेल्या नंबरवरून येणारे कॉल्स आणि एसएमएस ब्लॉक करू शकता. 
. या अ‍ॅण्टीव्हायरसमधील थेफ्ट  प्रोटेक्शनमुळे तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तरी एका एसएमएसद्वारे तुम्हाला त्यात नव्याने घातलेल्या सिम कार्डची माहिती मिळू शकते.   कॅस्पर्सस्काय मोबाइल सिक्युरिटी हा अ‍ॅण्टी व्हायरस अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज स्मार्ट फोन्ससाठी उपलब्ध आहे.
वेबरूट 
 अ‍ॅण्ड्रॉइड स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड केल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समधून येणाऱ्या धोकादायक व्हायरस आणि मालवेअर्स फाइल्स हा डिलीट करतो. इन बिल्ट अ‍ॅप्स स्कॅनरमुळे तुम्ही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर्स डाऊनलोड केले तरी ते ऑटोमॅटिकली स्कॅन होतात. एखाद्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये व्हायरस फाइल असल्यास वेबरूट त्याचं इन्स्टॉलेशन रिजेक्ट करतो. . कॉल आणि एसएमएस ब्लॉकिंगची सुविधाही यामध्ये आहे. सिक्युअर वेब ब्राऊझिंग हे वेबरूटमधील महत्त्वाचे वैशिष्टय़. ज्यामध्ये तुम्ही वेब पेज ओपन केल्यावर वेब लिंक्स, यूआरएल लिंक्स धोकादायक असतील तर ते वेबपेज आधीच ब्लॉक होतं. वेबरूटच्या पेड व्हर्जनमध्ये आपल्याला  डिव्हाईस लॉक, वाईप डेटा, डिव्हाईस स्कीम, या फीचर्स मिळतात.
 अवास्त 
अवास्त ही अ‍ॅण्टीव्हायरसची कंपनी आहे . या कंपनीचाही मोबाइल अ‍ॅण्टीव्हायरस असून  यामध्ये आपल्याला व्हायरस स्कॅनर, प्रायव्हसी अ‍ॅडव्हायजर, अ‍ॅप्लिकेशन मॅनेजमेंट, शील्ड कंट्रोल, एसएमएस अँड कॉल फिल्टर, फायरवॉल, नेटवर्क मीटर अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत.  आपण माहितीची देवाण-घेवाण करताना कोणत्याही प्रकारचा व्हायरस त्यामध्ये असेल तर आपल्याला हा अ‍ॅण्टीव्हायरस वेळीच सूचित करतो. मग आपण ती माहिती घ्यायची की नाही हा आपला प्रश्न असतो. इतकेच नव्हे तर ती माहिती स्कॅन करण्याची सुविधाही यामध्ये आहे. यामुळे आपण आलेली माहिती स्कॅनिंग करून घेऊन त्यातील व्हायरस काढून टाकला जातो

नेटक्वीन मोबाइल सिक्युरिटी 
हा  अ‍ॅण्टीव्हायरस तुमचा पूर्ण फोन जलद स्कॅन करण्यास  मदत करतो. ऑटोमॅटिकली व्हायरस डेटाबेस अपडेट करणे, लॉस्ट फोन लोकेशन, प्रायव्हसी प्रोटेक्शन, , कॉन्टॅक्टस् बॅक अप ही या मोबाइल सिक्युरिटीची वैशिष्टय़ं आहेत.  स्मार्ट फोनमध्ये व्हायरस, मालवेअर्स, फोन हॅकर्सपासून तुमचा डाटा सेफ ठेवण्याचे काम हा करतो. त्यातील ट्रॅफिक मॅनेजरमुळे तुम्हाला महिन्याभरात वापरलेल्या डेटाचे प्रमाण कळू शकते, तो हॅकर्सना ब्लॉक करतो. प्रायव्हसी प्रोटेक्शन, फोन लोकेटर, सिक्युअर डेटा ब्राऊिझग हे फीचर्सदेखील नेटक्वीनमध्ये आहेत. . यामधील अ‍ॅन्टीलॉस्ट फिचरमध्ये साऊंड अलार्मची सुविधाही उपलब्ध आहे. तसंच हे फीचर तुमच्या हरवलेल्या फोनची लोकेशन सुद्धा ट्रेस करू शकते. अगदी सहजरीत्या वापरता येण्यासारखे हे सॉफ्टवेअर आहे. याचं ट्रायल व्हर्जन ३० दिवसांचे असते त्यानंतर तुम्हाला ते रजिस्टर करावे लागते. अ‍ॅण्ड्रॉइड,, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्ट फोन्समध्ये हे सॉफ्टवेअर सपोर्टेबल आहे.

मॅकेफी 
स्मार्ट फोनमध्ये व्हायरस, स्पायवेअर्सपासून तुमचा डेटा प्रोटेक्ट करण्याचे काम मॅकेफी करतो. 'साईट अ‍ॅडवायजर' हे यातील महत्त्वाचं वैशिष्टय़ं. ज्यामुळे तुम्ही सुरक्षितरीत्या नेट सर्फिग आणि ऑॅनलाइन शॉिपग करू शकता. तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर हा अ‍ॅण्टीव्हायरस तुमचा डेटा प्रोटेक्ट करतो. यामधील सेफगार्डमुळे स्पायवेअर्स, मालवेअर्सपासून तुमचा फोन सुरक्षित राहतो. हा अ‍ॅण्टीव्हायरस सोशल नेटवर्किंग साइट्स, ईमेल, एसएमएस, एमएमएसमधून येणाऱ्या धोकादायक लिंक ब्लॉक करतो. अ‍ॅण्ड्रॉइड, विंडोज, सिम्बियन, ब्लॅकबेरी स्मार्ट फोन्ससाठी तुम्ही तो वापरू शकता. 

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment