सावधान ! डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नंतर आता सीमकार्डाचे क्लोन होत आहे
आधार-सीम जोडणीच्या बहाण्याने फसवणूक ! ....
मोबाइल क्रमांकामुळे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि संबंधित व्यक्तीची ओळख पटण्यासाठी २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करऱ्यांच्या सूचना उच्च न्यायालयाने सरकारला दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार केंद्र सरकारने तसे अनिवार्य केलेले आहे तसे न केल्यास मोबाइल क्रमांक बंद होईल अशा सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत .
परंतु मोबाइल सीम कार्डशी आधार क्रमांक जोडण्याचा बहाणा करून फसवणूक झाल्याचे समोर आलेले आहे.
मुंबईतील एका घटनेत आधार कार्ड आणि फोन नंबर जोडून देतो असे सांगत फोनवरच्या भामट्याने एका तरुणाच्या अकाऊंटमधली मोठी रक्कम लंपास केली
त्या घटनेनुसार तरुणाला ‘मी एअरटेलमधून बोलतोय. तुमचा आधार क्रमांक सीम कार्डला जोडलेला नाही. ही जोडणी न केल्यास तुमचा मोबाइल क्रमांक कायमस्वरूपी बंद केला जाईल. तरी तुमचा आधार क्रमांक १२१ यावर एसएमएस करा.’ असा फोन आला त्यानुसार तरुणांने आधार क्रमांक एसएमएस केला. आणि नंतर भामट्यांनी त्याआधारे संबंधित तरुणाच्या मोबाइल सीमचे क्लोन करून त्यांच्या वेतन खात्यातील रक्कम लंपास केली.
फसवणूक होते कशी
आधार-सीम जोडणीच्या बहाण्याने आधार क्रमांक एसएमएस द्वारे मागविला जातो .
आधार क्रमांकाचा एसएमएस मिळाल्यावर भामटे अनेकदा ओरिजिनल सिमकार्ड हरविल्याचे कंपनीला सांगून करून बनावट कागद पत्रांचा वापर करून ड्युप्लिकेट सिमकार्ड मिळवतात त्यानंतर मूळ सिमकार्डधारकाचे सिमकार्ड ब्लॉक होते . त्यानंतर बँकेकडून येणारा ओटीपी नवीन सीमकार्डवर जातो आणि त्या आधारे ते संबंधित बँक मोबाईल धारकाला गंडा घालतात .
कशी होते मोबाइल सिम क्लोनिंग
>>कुठल्याही मोबाइल फोन सिम मध्ये 'के आइ कोड' आणि यूनिक नंबर हि दोन प्रकारची सुरक्षा चक्र असतात जर हे दोन्ही दूसऱ्या सिम मध्ये टाकले तर त्या सिम चे क्लोन तयार केल्या जाऊ शकते
>>सिम कार्डच्या सर्विस प्रोवाइडरच्या प्रतिनिधींची मिलीभगत असेल तर हे सोपे असते कारण कि तेच तर मोबाइल सिम ला एक्टिवेट किंवा डीएक्टिवेट करतात आणि चुकीने जरी ओरिजिनल आणि क्लोन सिम हे एकाचवेळी एक्टिवेट झाले तर त्याची माहिती सर्विस प्रोवाइडरला मिळते . यामुळेच दूरसंचार कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याचा आरोप बऱ्याचदा होतो .
>>इंटरनेटवर अनेक प्रकारचे एप्लीकेशन उपलब्ध आहेत जे डाउनलोड करून कुणाच्याही मोबाईल नंबरवरून फोन करता येऊ शकतात .
कंप्यूटरचे ज्ञान असलेला कुणीही जाणकार या एप्लीकेशनला आपल्या मोबाइल अथवा लैपटॉपमध्ये ठेवून इंटरनेटचा वापर करून दुसऱ्याच्या मोबाईलवरून बोलू शकतो
फसवणूक झाल्यावर काय करावे ?
>> सायबर क्राइम सेलकडे फसवणूक व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येतो .
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment