Friday, 27 October 2017

मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकाशी छेडछाड केल्यास शिक्षा

मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकाशी छेडछाड केल्यास शिक्षा 

मोबाईलच्या  आयएमईआय(इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेन्टिटी) क्रमांकामुळे वापरकर्त्याची ओळख पटण्यास मदत होते. तसेच वापरकर्त्याचा फोन ट्रॅक करणेही या 15  आयएमईआय क्रमांकामुळे शक्‍य होते. परंतु मागे  अशा क्रमांकांत क्‍लोनिंगचे प्रकार आढळून  आलेले होते त्यावेळीस राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असलेल्या अशा हॅण्डसेटवर बंदी घालण्यात आली होती . आणि 
दूरसंचार विभागाने नुकताच  हा क्रमांक बदलण्याचा, चोरण्याचा प्रयत्न केल्यास तसेच बनावट आयएमईआय क्रमांक तयार करण्याचा प्रयत्न केल्यास, अर्थातच आयएमईआय क्रमांकाशी छेडछाड केल्यास दंड आणि तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे 
सरकारच्या या पुढाकारामुळे स्पर्धेतील मोबाईल  कंपन्यांना न्याय मिळेल, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनचे म्हणणे आहे 
मोबाईल चोरीस गेला किंवा हरविला तर आयएमईआय’ क्रमांकावरून माग काढला जातो :
मोबाइल चोरीबाबत चोरीची फिर्याद घेतल्यानंतर ‘आयएमईआय’ क्रमांकाच्या आधारे पोलिस तपास करतात. हा क्रमांक सध्या कोणत्या कंपनीच्या ‘सीम कार्ड’ वर वापरला जातो याचाच शोध घेतला जातो. 
मोबाइल वापरणाऱ्याकडून कॉल केल्यानंतर तो कॉल संबंधित सेवा पुरवठादार कंपनीकडे नोंदवला जातो. या नोंदणीत मोबाइलचा आयएमईआय क्रमांक दिसतो. मोबाइल क्रमांक त्यातील सिमकार्ड बदलून नवा घेता येतो. मात्र आयएमईआय क्रमांक बदलण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे तांत्रिक ज्ञान व विशेष प्रणाली आवश्यक असते. आयएमईआय क्रमांक जागतिक स्तरावरील जीएसएमए ही संस्था देते. मोबाइल हरवल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी वापरकर्त्याने आयएमईआय क्रमांक देणे गरजेचे आहे.
 कसा माहित करून घ्यावा आयएमईआय नंबर:
तुम्ही जेव्हा नविन मोबाईल खरेदी कराल त्यावेळी मोबाईलचा आयएमईआय नंबर माहिती करून घ्या. माहित नसेल तर *#06# असे डायल करा आणि जाणून  घ्या आयएमईआय नंबर
हरविलेला किव चोरी गेलेला मोबाईल कसा शोधावा :
मोबाईलचा शोध घेण्यासाठी बऱ्याचशा  संकेतस्थळावर मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. ती सॉफ्टवेअर मोबाईलवर डाऊनलोड करून . मोबाईल हरवला किंवा चोरी झाला की हे सॉफ्टवेअर तुम्हाला नेमके ठिकाण (लोकेशन) दाखविल. ते तुमच्या मोबाईल आयएमईआय (इंटरनॅशनल मोबाईल इक्वीपमेंट आयटेंडीफाय) नंबरवर आधारित असते 
आयएमईआय क्रमांकाशी छेडछाड कोण आणि का करते : 
मोबाईल दुरुस्ती करणारे मेकॅनिक हा प्रकार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाईल दुरुस्ती सेंटरमधून मोबाईल दुरुस्तीच्या आड मोबाईल आयएमईआय नंबर बदलून दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 चोरीचे मोबाईल व विविध गुन्ह्यांत वापरलेल्या मोबाईलचे आयएमईआय नंबर बदलून मोबाईल अन्य व्यक्तीला विकले जातात. त्यामुळे 
 पोलिसांच्या सायबर पथकाला ते मोबाईल वापरणाऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येत नाही 
 मोबाईल आयएमईआय नंबर बदलण्यासाठीचे साहित्य : 
आयएमइआय बदलण्यासाठी लागणारे आयएमइआय चेंजर बॉक्स
आयएमईआय क्रमांकाशी छेडछाड केल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि दंड 
भारतात मोबाईल बाजार वेगाने विकसित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोबाईलच्या सुरक्षेसंबंधी कठोर नियम तयार करणे खूपच गरजेचे आहे. 
आयएमईआय क्रमांक : प्रत्येक मोबाइलसाठी दिला जाणारा त्याचा १५ आकडी ओळख क्रमांक, अर्थात इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेन्टिटी म्हणजेच आयएमईआय क्रमांक ही त्या प्रत्येक हँडसेटची ओळख असते. 
चोरीचे ,हरवलेले मोबाइल शोधण्यासाठी तसेच  बनावट मोबाइल हँडसेट ओळखण्यासाठी आयएमईआय क्रमांकाचा उपयोग होतो 
परंतु  चोरीच्या मोबाईलची खरेदी विक्री करणारे काही दुकानदार काही डिव्हाईसच्या मदतीने चोरीच्या स्मार्टफोनचे आयएमईआय क्रमांक बदल करतात ज्यामुळे  बदललेल्या या विशेष क्रमांकामुळे चोरीचे फोन मूळ मालकांपर्यंत पोहोचवणे पोलिसांना  शक्य होत नाही 
सरकारचा यावर नवीन नियम : .  ‘दि प्रिव्हेन्शन ऑफ टॅम्परिंग ऑफ दि मोबाइल डिव्हाइस इक्विपमेंट आयडेन्टिपिकेशन नंबर रुल्स, २०१७’ केंद्रीय दूरसंचार विभागाच्या  अधिसूचने नुसार हा नवा नियम सरकारने  तयार केला आहे.   
नव्या नियमाला छेडछाड विरोधक नियम २०१७ असं नाव देण्यात आले आहे. सरकारने यासाठी दि प्रिव्हेन्शन ऑफ टॅम्परिंग ऑफ दि मोबाइल डिव्हाइस इक्विपमेंट आयडेन्टिफिकेशन नंबर रुल्स, २०१७ हा नवा नियम तयार केला आहे. याशिवाय हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या कोणत्याही मोबाइलच्या सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
काय आहे या नियमात :  या नियमानुसार आयएणईआय क्रमांकात फेरफार करणाऱ्यास  तसेच असा मोबाइल  वापरणाऱ्यास आता  शिक्षा  होणार आहे. याशिवाय आयएमईआय क्रमांकात  फेरफार करणारी संगणक प्रणाली तयार करनाराही  शिक्षेस पात्र ठरेल त्याप्रमाणे बनावट आयएमईआय क्रमांक तयार करण्याचा प्रयत्न तसेच हा क्रमांक बदलणे आणि चोरणे यासाठी 
 तीन वर्षांची कैद आणि दंड होणार आहे.
-मोबाइल हँडसेट उत्पादन करणाऱ्या कंपनीखेरीज दुसऱ्या कुणीही मुद्दाम किंवा हेतुपुरस्सर काढून टाकल्यास, खोडून टाकल्यास किंवा बदलल्यास, फेरफार केल्यास ते बेकायदा व शिक्षेस पात्र आहे
-म्हणजेच नियमानुसार, मोबाइल हँडसेट उत्पादन करणाऱ्या कंपनीखेरीज दुसऱ्या कुणीही मुद्दाम किंवा हेतुपुरस्सर काढून टाकणे , खोडून टाकणे  किंवा बदलणे , फेरफार केरणे   बेकायदा व शिक्षेस पात्र आहे.

लेखक :  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

No comments:

Post a Comment