Tuesday, 3 October 2017

व्हॉट्सअॅपरील नवीन फिचर

व्हॉट्सअॅपरील  नवीन फिचर
 भारतात इन्स्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉटसअपचे जवळपास २० करोड यूझर्स आहेत.या लेखात  आपण अनेकांच्या जिव्हाळ्याचं बनलेल्या व्हॉट्सअॅपरील नवीन उपयोगी फिचरचा उहापोह करू या !
व्हॉट्स अॅपद्वारे पाठवा पैसे

भारतात  गुगल बँकेबरोबर पार्टनरशिप करून पेमेंट सर्विस सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी गुगलला आरबीआयकडून मान्यता मिळणे बाकी आहे. २०१६ मध्ये आरबीआयचे पूर्व गव्हर्नर रघुराम राजन यांनी यूपीआई सर्विसची सुरूवात केली होती. यामुळे मोबाईल युजर्स या पद्धतीचा वापर करुन दोन बँका दरम्यान निधी ट्रांसफर करू शकतो.
व्हॉट्सअॅप हा पहिला मोबाईल अॅप असेल जो डिजिटल पेमेंटसाठी मल्टी बँक पार्टनरशिपसोबत काम करेल कारण भारतामध्ये व्हॉट्सअॅपला नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने व्हॉट्सअॅपला मनी ट्रान्सफर सर्व्हिससाठी मंजूरी दिली आहे. 
 व्हॉट्सअॅप भारतामध्ये सर्वांत जास्त लोकप्रिय आहे आणि २० कोटी पेक्षाही जास्त युजर्स आहेत. ते आतापर्यंत व्हॉट्सअॅपचा वापर  चॅटींगसाठी करत होतो. लवकरच आता याद्वारे पैसे ही पाठवता येणार आहे.  याद्वारे कोणत्याही खात्यातील धारकांना युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) मध्ये पैसे ट्रांसफर करता येईल. 
हॉट्सअॅपने जूनमध्ये इंस्टेट पेमेंट सर्विस सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एनपीसीआयसारखी वित्तीय संस्थांशी बोलणी केली.  ज्याप्रमाणे इंस्टेट मेसेज डिलीवर होते त्याचप्रमाणे दोन खाताधारकांमध्ये पैसे ट्रान्सफर करता येईल.  व्हीचॅट आणि हाईक मेसेजिंग अॅप पहिल्यापासूनच पेमेंट सर्विसलाच सपोर्ट करतात. 
व्हॉट्सअॅपवर यूट्यूब व्हिडीओजही पाहता येणार !
काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने फाईल ट्रान्सफरसाठी नवे अपडेट आणले होते. या अपडेटमुळे यूझर्स कोणत्याही फॉरमॅटमधील फाईल ट्रान्सफर करु शकता. नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार चॅटदरम्यान व्हॉट्सअॅपवर तुम्हाला  व्हिडीओही पाहता येतील.  व्हॉट्सअॅपवर यूट्यूब व्हिडीओजही पाहता येणार आहेत. 
व्हॉटसअॅपवर पाठवलेले यूट्यूब व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करावे लागते. त्यानंतर यूट्यूब चॅनेलवर आपण व्हिडीओ पाहू शकतो. 
मात्र या नव्या फीचरमुळे तुम्ही चॅटबॉक्समध्ये यूट्यूब व्हिडीओ प्ले करु शकता. तसेच  या व्हिडीओला लहान अथवा मोठे करता येईल. 
व्हॉट्सअॅपमध्ये आता कोणतीही फाइल पाठवणे शक्य  
व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फिचर आले आहे. या  फिचरमुळे  तुम्हाला आता कोणत्याही फाइल्स पाठवता येणार आहे. 
यापूर्वी व्हॉट्सअॅपने पीडीएफ फाइल पाठविण्याचे फिचर दिले होते.  त्यात 100MB ची फाइल पाठवता येते. सुरूवातीला व्हॉट्सअॅपवर कोणत्याही प्रकारची फाईल पाठविण्याचे फिचर नव्हते. त्यानंतर  कंपनीने फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओसह पीडीएफ फाइल्स शेअरिंगला सुरूवात केली. 
पीडीएफनंतर सीएव्ही, डॉक, पीपीटी, पीपीटीक्स, आरटीएफ, टीएक्सटी आणि एसएलएस सारख्या फाइल पाठविण्याचे ऑप्शन आहे. त्यामुळे सर्व फाइल फॉरमॅट व्हॉट्सअॅपद्वारे पाठविता येणार आहेत. 
लेखक : प्रा. योगेश हांडगे

No comments:

Post a Comment