Friday, 27 October 2017

ब्लूटूथ आणि वाय फाय सतत ऑन ठेवल्याने तुमचे बॅंक अकाऊंट हॅक होऊ शकते

ब्लूटूथ आणि वाय फाय सतत ऑन ठेवल्याने तुमचे   बॅंक अकाऊंट हॅक होऊ शकते  
मोबाईलचं ब्लूटूथ आणि वाय फाय सतत ऑन ठेवण्याच्या तुमच्या  सवयीमुळे तुम्हाला आर्थिक झळ बसू  शकते. हे ऐकून आश्चर्य वाटत असेल परंतु हे खरे आहे कारण रिसर्च फर्म अर्मिसच्या नुसार, ब्लू टूथ, वायफाय यांसारख्या डिजिटल एन्ट्रन्स सतत चालू ठेवणे धोक्याचे आहे. ब्लूटूथ आणि वाय फाय सतत ऑन ठेवल्यामुळे   Blueborne मलवेयर मोबाईलमध्ये घुसू शकतो. यामुळे हॅकर्स थेट तुमच्या मोबाईलशी कनेक्ट होऊन तुमचा मोबाईल डेटा एक्सेस करू शकतात.  आणि तुमचे मोबाईल वरील ऑनलाईन बँकेचे /मोबाईल बँकेचे  अकाउंट हॅक करून संपूर्ण अकाउंट बॅलन्स रिकामा करू शकतो  . तसेच  मोबाईलमध्ये असलेली  तुमची खाजगी माहिती देखील सार्वजनिक होऊ शकते. हे  हॅकर्समलवेयर अधिक प्रमाणात पसरवू शकतात. यामुळे मोबाईलचे अत्यंत नुकसान होते. म्हणजेच डेटा थेफ्ट होऊ शकतो  ज्यामुळे तुमची दाणादाण उडू शकते.  खाजगी माहिती बरोबरच जर तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असाल तर मोबाईल मधून कंपनीचीही थोडीफार माहिती  हॅकर्स हॅक करून प्रसंगी सार्वजनिकही करू शकतात आणि  असे प्रकार तुम्हाला महागात पडू शकतात.
ब्लू टूथ, वायफाय चालू असल्यास Blueborne मलवेयर थेट मोबाईलमध्ये प्रवेश करतात. 
त्यासाठी कोणत्याही यूआरएल, इंटरनेट कनेक्शन किंवा कोणताही अॅप डाउनलोड करण्याची गरज नसते . 
रिसर्च फर्म अर्मिसच्या नुसार  मोबाईलमध्ये Blueborne ने प्रवेश केल्यानंतर मोबाईलला   कनेक्ट केलेल्या सर्व  डिव्हाईसमध्ये देखील Blueborne पसरत जातो आणि या  मलवेयरमुळे  स्मार्टफोन, सिस्टम,टॅबलेट, ब्लूटूथ हेडफोन या डिव्हाईसवर  इफेक्ट होतो . 
आत्तापर्यंत या मलवेयरमुळे सुमारे ५.३ बिलियन डिव्हाईस प्रभावित झालेली आहेत. 
महत्वाची गोष्ट म्हणजे मलवेयरमुळे हॅकर्स तुमच्या बँक अकाउंट हॅक करू शकतो तसेच  मोबाईलमधील अनेक खाजगी माहितीपर्यंत सहज पोहचू शकतो .
मोबाईलमध्ये घुसून  बॅंक अकाऊंट हॅक करणारा 'जैफेकॉपी ट्रोजन'  व्हायरस 
 सायबर सिक्युरिटी फर्म कास्पर्स्की ने दिलेल्या माहितीनुसार  'जैफेकॉपी ट्रोजन' नावाचा एक व्हायरस सुमारे ४०% भारतीयांचे नुकसान करत आहे. भारतासह जगभरात अनेक देशांमध्ये हा  व्हायरस पसरला  आहे. 
जगभरात सुमारे ४७ देशांमध्ये स्मार्टफोन युजर्सच्या फोनवर हल्ला करून त्यांच्या बॅंक अकाऊंट हॅक केले  आहे. .  
वैप या बिलिंग प्लॅटफॉर्मद्वारे  व्हायरसचा  मोबाईलमध्ये प्रवेश . 
जर तुम्ही स्मार्टफोनचा वापर करुन काही खरेदी विक्री करत असाल तर वेळीच सावधान व्हा.
कारण वायरलेस अ‍ॅप्ल‍िकेशन प्रोटोकॉल (वैप) या बिलिंग प्लॅटफॉर्मद्वारे  व्हायरस मोबाईलमध्ये प्रवेश करतो. वैप ही एक मोबाईल पेमेंट सिस्टम आहे. याद्वारा तुमचा खर्च थेट मोबाईल बिलामध्ये जोडला जातो. सार्‍या सिक्यॉरिटी फीचरला मात देत हा व्हायारस विविध सर्विसला सबस्क्राईब करतो. त्यात  डेबिट आणि क्रेडीट कार्डचेही सबस्क्रिप्शन घेऊन त्या अकॉउंटमधील  पैसे खर्च करतो . 
तुमच्या मोबाईलमध्ये या व्हायरसचा शिरकाव झाला तरीही तुमचा फोन नेहमीप्रमाणेच  काम करतो. त्यामुळे  तुम्हाला व्हायरसचा धोका  कळून येत नाही. 
उपाय काय ?
-- या व्हायरसचा धोका टाळण्याकरीत  कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करू नका. तसेच मोबाईलमध्ये अ‍ॅन्टी व्हायरस आणि इतर सिक्युरिटी मेसेजवर विशेष लक्ष द्या. 
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
-- 

No comments:

Post a Comment