Tuesday, 3 October 2017

लहानमुलांच्या पालकांनी या महत्वाच्या व्हीडियो अॅप आणि वेबपोर्टल बद्दल जरूर जाणून घ्यावं



लहानमुलांच्या पालकांनी या महत्वाच्या व्हीडियो अॅप आणि वेबपोर्टल बद्दल जरूर जाणून घ्यावं 
मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी 'नेक्सजीटीवी किड्स 
पूर्वी इव्हीवर लहान मुलांसाठी  अकबर-बिरबल , पंचतंत्र, विक्रम-वेताल आणि मालगुडी डेज यासारख्या बऱ्याच टीव्ही मालिका होत्या. परंतु आता या लहान मुलांसाठी "तारक मेहता का उलटा चश्मा" वगळता फारशा काही मालिका नाहीत. परंतु हि कमी भरून निघाली आहे  कारण आता  मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी 'नेक्सजीटीवी किड्स' नावच एक व्हीडियो अॅप 'नेक्सजीटीवी' ने लॉन्च केले आहे. 
 
या व्हीडियो अॅपमुळे आता लहान मुलांना खूप छान आणि वेगळ्या गोष्टी बघायला मिळनार आहे . आणि याने फक्त मनोरंजन होणार नाही तर लहान मुलांच्या मनावर चांगले परिणाम होतील. तसेच बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल.

 'मुलांसाठी मनोरंजन, त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी, आणि त्यांना चांगली शिकवण देण्यासाठी हे अॅप 'नेक्सजीटीवी'ने  लॉन्च केले आहे. यामुळे आता  मुलं सुरक्षित वातावरणात लोकप्रिय कार्यक्रम बघू शकतात. त्यामुळे त्यांचे पालक सुद्धा निश्चिंत राहतील. तसेच मुलांना चांगली संगत मिळेल.

हे अॅप गूगल प्ले स्टोर आणि अॅपलवर सुद्धा उपलब्ध आहे.
हरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांसाठी वेबपोर्टल
हरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांसाठी 'खोयापाया डॉट जीओव्ही डॉट इन' (http://khoyapaya.gov.in)हे नवं वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे, यावर हरवलेल्या मुलांचा, व्यक्तींचा तपशील टाकता येणार आहे. 
यावेब पोर्टलवर  कोण, कुठे, केव्हा हरवले आहे तसेच कोण, कुठे, केव्हा  सापडले आहेत, याचा संपूर्ण तपशील मिळणार आहे.
आज गर्दीमुळे वेगवेगळ्या महानगरात आपल्या देशात आणि राज्यात  व्यक्ती हरवण्याचा प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात लहान मुलं हरवत असल्याचं आढळून आलेलं आहे 
त्यामुळे जर सर्वच लोकांनी यावर हरवलेल्या अथवा सापडलेल्या लोकांचा तपशील टाकल्यास ही साईट हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे.
जर  हरवलेल्या व्यक्तीचा  आणि सापडलेल्या व्यक्तीचा डेटा व्यवस्थित शेअर केला तर ही साईट सर्वांसाठी मदतीचा हात ठरेल. 
अर्थात या वेब पोर्टलवर हरविलेल्या मुलाची  जास्तीत जास्त आणि अचूक माहिती भरली तर  मुलाला शोधण्याची शक्यता वाढेल.  
लेखक : प्रा योगेश हांडगे  
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment