आजच्या काळात सेल्फीची क्रेझ सर्वत्र दिसून येते. सेल्फी काढतांना तो कुठे आणि कधी काढावा याचे बंधन असावे पण ह्या क्रेझची पातळीही अत्यंत खाली गेली आहे आणि याचा खूपच अतिरेक वाढलेला आहे. कारण आता अनेक प्रियकर आणि प्रियसी एकमेकांना चक्क न्युड सेल्फी पाठवत आहे .तरुणाई मर्यादा ओलांडत आहे त्यातून धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे काही प्रकरणात तर प्रियसी आंघोळीसाठी बाथरुममध्ये जाऊन बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलतांना न्यूड सेल्फी क्लिक करून बॉयफ्रेंडला पाठवतात आणि फसतात .
अनेक प्रकरणात काही प्रियकर प्रियसीचे न्युड सेल्फी, अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत काहीवेळा पैशांची मागणी करतात किंवा शारिरिक संबंधाची मागणी करण्याच्या घटना अनेक शहरांमध्ये समोर आलेल्या आहेत .
न्युड सेल्फीचे धोके
- प्रियकर आणि प्रियसीचे आपसातील नाते काही वेळा बिघडले म्हणजेच काही बिनसले तर त्यावेळी जर प्रियकराकडे प्रियसीचे न्युड सेल्फी किंवा
व्हिडिओ असतील तर त्याचा दुरुपयोग होण्याचा धोका असतो अशा काही प्रकरणात संबंधित फोटो अथवा व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी प्रियसीने केल्यावर त्याबदल्यात विकृत प्रियकराकडून प्रियसीला ब्लॅकमेल करून शारिरिक संबंधाची मागणी अथवा पैशांची मागणी होते .
- बऱ्याचशा घटनांमध्ये अनेक वर्षे विकृत प्रियकराकडून प्रियसीसोबत तिच्या मनाविरुध्द शारिरीक संबंध बनवले जातात . प्रियसीने नकार दिला, तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिच्यावर आत्याचार होत राहतात .
--आणि कोणाला या प्रकाराची माहिती दिल्यास संपूर्ण कुटूंबाला जिवंत मारण्याची धमकी तसेच बदनामीची मिळत असते.
-- काही घटनांमध्ये तर घरात कपडे बदलणाऱ्या महिलांचं लपून अश्लील व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते
--स्त्रीची आक्षेपार्ह अवस्थेतली बनावट छायाचित्रं सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकली जातात.
सायबर डिफिमेशन - स्त्रियांवर होणा-या या सायबर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार व्यक्ती पीडित व्यक्तीची मित्र-मैत्रिणींमध्ये बदनामी होईल अशी माहिती ई-मेल किंवा इंटरनेट वेबसाइटवर प्रसिद्ध करतात .
मोर्फिंग - या प्रकारामध्ये पीडित व्यक्तींच्या/स्त्रियांच्या फोटोमध्ये बदल करून खोट्या ई-मेल आयडीचा वापर करून वेगवेगळ्या वेबसाइटवर पोस्ट करण्यात येते .अशा प्रकारच्या केसेस सगळ्याच शहरामध्ये होतात. खूप केसेसमध्ये या बदनामी किंवा आपली प्रसिद्धी होईल या कारणामुळे रिपोर्ट होत नाही.
तरुणींनी लक्षात ठेवल्याच पाहिजेत अशा महत्वाच्या टीप्स:
-- भलत्याचवेळी ऑनलाइन चॅटिंग करतांना मोबाईलचा कॅमेरा बंद ठेवा
--तुमचे खासगी फोटोज, व्हिडिओज किंवा इतर माहिती सोशल मिडियात शेअर करू नका . समाजमाध्यमांचा व्यक्तिगत माहितीच्या देवाण-घेवाणीकरिता वापर करतांना समाजभानाबरोबर समाज सुरक्षा, व्यक्तिगत सुरक्षा याचे भान जपायल हवे .
-- घाबरून जाऊ नका. आणि कुटुंबाशी या सर्व गोष्टी शेअर करा.
-- ऑनलाईन डेटिंग ऍप्स वापरात असाल तर सावध रहा अनोळखी काँटॅक्टच्या माध्यमातून आलेली कोणत्याही लिंकवर कधीही क्लिक करु नका. कारण अशा लिंकवर क्लिक केल्यास पॉर्न वेबसाईट किंवा वेबकॅम साईट उघडतात आणि आपले ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग सुरु होते.जर आपण भलत्याच अवस्थेत असलो तर ते त्रासदायक ठरू शकते
उपाय काय ?
-- समाजात बदनामी होईल या भीतीने व त्यातून येणाऱ्या नैराश्याने काही स्त्रियां आत्महत्याहि करतात .सायबर गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी प्रत्येक मोठय़ा शहरात पोलिसांचे विशेष सायबर क्राइम सेल आहेत. हा त्रास कायमचा बंद होऊ शकतो. त्रास बंद करण्याकरिता इंटरनेटवर सुरक्षा नियमांचं पालन करून सावधानतेने सक्रिय असायला पाहिजे आणि तरीही हे प्रकार बंद होत नसतील तर जरूर त्याची पोलिसांकडे तक्रार करावी
पुरुषांनी सुद्धा राहावे सावध
फक्त मुलींना किंवा स्त्रियांनाच असे अनुभव येतात असे नाही . प्रेमांधळे पुरुषही 'हळव्या' स्त्रीच्या गोडगुलाबी ऑनलाईन चॅटिंग ला फसू शकतात हे अनेक प्रकरणात उघडकीस आलेले आहे
- अनेकवेळा ऑनलाईन डेटिंग साईटच्या माध्यमातून किंवा सोशिअल मीडियाच्या माध्यमातून तरुणींबरोबर पुरुषची मैत्री होते आणि त्यांचे ऑनलाईन चॅटिंग सुरु होते . पुढे मैत्रीचे रूपांतर ऑनलाईन प्रेमात होते आणि हळूहळू ते प्रियकर प्रियसी प्रेमाची मर्यादा ओलांडतात आणि एकमेकांकडून न्युड सेल्फीची मागणी करतात आणि इथेच तर प्रेमांधळे पुरुष फसतात कारण जर प्रियकराने ऑनलाईन प्रियसीला जर स्वतःचा न्युड सेल्फी पाठविला तर ती विकृत प्रियसी विनयभंगाची धमकी देऊन त्या पुरुषाकडून लाखो रुपये उकळते . अशा घटना बऱ्याचशा शहरांमध्ये घडलेल्या आहेत
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment