सावधान ! स्मार्टफोनमध्ये कुठलेही अॅप्लिकेशन अथवा गेम्स डाऊनलोड आणि इन्स्टॉल करतांना काळजी घ्या.
सावधान ! स्मार्टफोनमध्ये कुठलेही अॅप्लिकेशन अथवा गेम्स डाऊनलोड आणि इन्स्टॉल करतांना काळजी घ्या. .
हे करतांना कारण बहुतेकवेळा आपण अॅपची 'टर्म्स अँड कंडीशन' सविस्तर न वाचता 'अॅक्सेप्ट' हा पर्याय निवतो.
जेव्हा तुम्ही 'अॅक्सेप्ट' हा पर्याय निवडता तेव्हा स्मार्टफोन मधील फाईल्स, फोन नंबर्सची यादी,सर्व माहिती, फोटो,तुमचं लोकेशन अशा अनेक महत्वाच्या गोष्टी त्या अॅपला वापरण्याची परवानगी तुम्ही देत असता. अशा रीतीने नकळत तुम्ही तुमच्या फोनचा कंट्रोल त्या अॅपच्या कंपनीच्या हातात देत असता.आणि हि डाऊनलोड केलेली अॅप तुमच्या फोनमधील सर्व माहिती त्यांच्या कंपनीला पोहचवितात
'अॅप्लिकेशन कंपन्या 'युजर एक्सपिरिअन्स'ची माहिती मिळवण्याच्या नावाखाली तुमच्या घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात. परंतु मोबाइलमधल्या कुठल्याही गोष्टीचा उपयोग कंपनी स्वतःच्या वापरासाठी करू शकत नाही.
स्मार्टफोनमधील अनेक अॅप्स संर्टफोनवरील घडामोडींवर लक्ष ठेवून फोनमधली काँटॅक्ट लिस्ट,व्हिडिओ, फोटो आणि इतर महत्वाची माहिती महत्त्वाची कागदपत्रं चोरून त्यांच्या कंपनीला पोहचवितात
अनेक प्रकरणात काही कपंनीचे अॅप्स महिलांच्या मोबाईलमधील त्यांचे फोटो चोरून फोटोशॉपच्या सहाय्यानं तिच्या फोटोमध्ये फेरफार करून अश्लील वेबसाइटवर अपलोड केल्याचं सायबर सेलला तपासात आढळून आलेलं आहे
स्मार्टफोन वापरतांना खालील काळजी घ्या :
० खासगी माहिती किंवा फोटो मोबाइलमध्ये ठेवू नका
० नेट बँकिंग व इमेलचे पासवर्ड वारंवार बदलत रहा.
०उपयोगात नसलेले अॅप आणि गेम्स अनइन्स्टॉल करा.
० आठवड्यला मोबाइलमधली मेमरी क्लीन करा.
० फोनमधील माहिती चोरीला गेल्यास तत्काळ पोलिसांच्या सायबर क्राईम सेलशी संपर्क साधून तक्रार नोंदवा.
० अनोळखी व्यक्तींशी अॅपद्वारे खासगी संवाद करू नये.
सायबर कायदा
०आपल्याकडे आयटी अॅक्ट २००० हा सायबर क्राइमसाठी बनवलेला अत्यंत कडक असा कायदा अस्तित्वात आहे.
छायाचित्रं किंवा व्हीडिओ मिळवून ते पोर्नोग्राफी साइट्सवर वापरनाऱ्याला या कायद्याअंतर्गत कडक अशी शिक्षा होऊ शकते. गुन्हा सिद्ध झाल्यास दहा वर्ष तुरुंगवास व मोठा दंड होऊ शकतो.
सायबर कायद्यांतर्गत विविध शिक्षेची तरतूद केलेली आहे
० एखाद्या व्यक्तीचा फोटो तिच्या संमतीविना काढणं, सोबत बाळगणं किंवा शेअर करणं या प्रकरणी दोषीला
तीन वर्ष कारावास आणि दोन लाख रुपये दंड
०अश्लील क्लिप्स फॉरवर्ड करणं, शेअर करणं, फोटो चोरून त्यात फेरफार करणं या प्रकरणी दोषीला सात वर्षांचा कारावास आणि दहा लाखांचा दंड

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment