Tuesday, 3 October 2017

2.तुमचं एटीएम कार्ड सुरक्षित आहे ना ?

तुमचं एटीएम कार्ड सुरक्षित आहे ना ? 
भामट्याने तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते परत चालू करावयाचे असेल तर एटीएमवरील नंबर सांगा असे सांगितले. एटीएम बंद पडण्याच्या भीतीने अनेकांनी  यांनी त्या भामट्यास एटीएम कार्डविषयी सर्व माहिती सांगितली. माहिती सांगितल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच एटीएम धारकांना 
यांच्या मोबाईल क्रमांकावर त्यांच्या खात्यावरील पैसे काढल्याचे मेसेज यायला सुरुवात झाली. 
 बँक खातेदारांना फोन करून ‘मी बँक अधिकारी बोलतो’, अशी बतावणी केली जाते व एटीएमचा कोड विचारून परस्पर पैसे काढले जातात 

‘आॅन लाईन’ चोरीचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. क्रेडिट, डेबिट अथवा ‘एटीएम’ कार्डचा कोड विचारून परस्पर पैसे काढण्याचे किंवा कधी-कधी आॅनलाईन खरेदीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.आतापर्यंत ‘एटीएम’, डेबिट तसेच क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक केल्याच्या भरपूर घडल्यात .  ‘टेलिफिशिंग अटॅकर्स’ना पकडण्यात अपयश येत आहे  बँकांकडे तात्काळ संपर्कासाठी सुविधा असावी एटीएमद्वारे फसवणूक झालेल्या भरपूर घटना घडल्या आहेत. अनेकांना  अगोदर एसबीआय बँकेचा बनावट एसएमएस आला. त्यानंतर लगेच फोन आला. बँकेतून बोलतोय, तुमच्या एटीएमची मुदत संपली असून त्याला रिन्युअल करण्यासाठी पिनकोड विचारून घेतला. त्यानंतर त्यांना   अवघ्या दहा मिनिटांतच खात्यातून पैसे कपात होत असल्याचे मेसेज येत राहिले. टेलिफिशिंग अ‍ॅटकरनेभरपूर  रुपयांची आॅनलाईन खरेदी करून अनेकांची  फसवणूक झाली . अनेकांची  अशाच पद्धतीने फसवणूक झाली. अशी घटना घडल्यानंतर खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेकडे २४ तास फोनची सुविधा असावी. जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे, तो नेहमी एंगेज लागतो. फसवणूक झालेल्या अनेकांना  ‘आॅनलाईन’ खरेदीचे ज्ञान नाही, हे विशेष! एटीएमची फसवणूक कशी होते बँक अधिकारी बोलतोय, असा फोन करणारी व्यक्ती अगोदार तुमचे नाव सांगते. नंतर तुमचा मोबाईल
 क्रमांकदेखील सांगते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तो खरोखर बँकेचाच अधिकारी बोलत असल्याची खात्री पटते. एटीएम कार्डची माहिती अपडेट करायची आहे, अशी थाप मारून तो पिनकोडविषयी विचारतो. माहिती न दिल्यास तुमचे एटीएम केव्हाही ब्लॉक होऊ शकते, अशी भीती घालतो. आपण समोरच्या व्यक्तीने विचारलेली माहिती दिली की, तो फोन कट करतो. त्यानंतर थोड्याच वेळात आपल्या खात्यातून पैसे काढल्याचा मॅसेज येतो. —————— 
एटीएम कार्डसंदर्भात सूचना
 १) एटीएम कार्ड हरविले तर सर्वप्रथम कार्ड नंबर ब्लॉक करण्यासाठी बँकेला कळवा. लेखी स्वरूपात अर्ज करा. 
२) एटीएम कार्डवरच टोल फ्री नंबर दिलेला असतो त्यानंबरवर फोन करून कार्ड ब्लॉक करण्यास सांगावे. 
३) जर तुम्ही हरवलेल्या एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती बँकेला कळविली नाही, तर त्या कार्डचा गैरवापर होऊ शकतो.
 ४) हरवलेले एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची खात्री झाल्यानंतरच दुसऱ्या एटीएम कार्डसाठी अर्ज करा. 
५) फोनवर कोणालाही एटीएम कार्ड नंबर किंवा पिन नंबर सांगू नका. 
६) स्वत:चे एटीएम कार्ड स्वत:च हातळा. 
७) लहान मुलांच्या हातात एटीएम कार्ड देऊ नका. 
. ८) व्यवहार पूर्ण झाल्याची सूचना मिळाल्यावरच एटीएममधून बाहेर पडा.
 ९) पिन नंबर विसरल्यास बँकेला लेखी स्वरूपात अर्ज करून नवीन पिन नंबर प्राप्त करून घेता येतो. ——————
 बँक फोनवर एटीएम नंबर, पिन नंबर मागत नाही , कोणतीही बँक फोनवर किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना त्यांचा एटीएम कार्ड नंबर व पिन नंबर (पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर) मागत नाही. यामुळे कोणत्याही बँकेच्या नावाने आपणास कोणी फोन अथवा एसएमएस करून एटीएम कार्ड नंबर किंवा पिन नंबर मागत असेल तर त्यास तो देऊ नका. नागरिक अनोळखी माणसाला सर्रास आपला एटीएम नंबर व पिन नंबर सांगतात. चोर याचाच फायदा घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास करतात. मोबाईलवर बँकेसंबंधी माहिती विचारणारे फोन आले तर समोरच्या व्यक्तीला आपली गोपनीय माहिती देऊ नका. तात्काळ यासंबंधी जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा सायबर क्राईम सेलकडे संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment