Tuesday, 3 October 2017

" प्रोटॉनमेल"......सुरक्षित ईमेल सेवा

" प्रोटॉनमेल"......सुरक्षित ईमेल सेवा

मेल हॅक  होणे तसेच अमेरिकेसारख्या देशाकडून अन्य देशांचे प्रमुख राज्यकर्ते , प्रशासकीय  अधिकारी , संशोधक तसेच  नागरिक यांच्या ईमेलवर गुप्त पाळत ठेवन्याचे प्रकार वाढीस आलेले आहे . तसेच फक्त अमेरिकाच नव्हे तर अनेक देशांतील सरकारांकडून नागरिकांच्या खासगी आयुष्यावर निगराणी ठेवली जात असल्याचे प्रकार होत होते हे लक्षात आले . यामुळे ईमेल वापरकर्ते धास्तावले होते त्या पार्श्वभूमीवर ईमेल पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याकरिता  या युजरसाठी आता प्रोटॉनमेल नावाने सर्वात सुरक्षित ईमेल सेवा सुरू करण्यात झालेली आहे  . या प्रोटॉनमेलमुळे युजरचे खासगीपण अबाधित राखले जाण्याचा दावा  या कंपनीतर्फे करण्यात येत  आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेतील माजी कॉन्ट्रॅक्टर एडवर्ड स्नोडेनने देशाच्या निगराणी कार्यक्रमाचा पर्दाफाश करून खळबळ उडवून दिल्यानंतर इ-मेल सुरक्षेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर याहू मेल, गुगल जी-मेल यांनीसुध्दा   सुरक्षित ईमेल सेवा देण्यावर  काम सुरू केले आहे
प्रोटॉनमेलने त्यात आघाडी घेतली आणि इ-मेल पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याकरिता  अनेक संशोधकांनी प्रयत्न चालविला होता आणि त्याचाच भाग म्हणजे
मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,हार्वर्ड,  युरोपियन प्रयोगशाळा सीईआरएन येथील संशोधकांनी प्रोटॉनमेल ही विशिष्ट इ-मेल सेवा विकसित केली. या प्रकल्पाचे प्रमुख जॉसॉन स्टॉकमन हे आहेत .
सुरक्षितेसाठी प्रोटॉनमेलमध्ये इन्क्रिप्शनचा वापर:
अगदी पूर्वीपासूनच इ-मेलमध्ये  इन्क्रिप्शनचा वापर  केला जातो. इन्क्रिप्शन हि  विशेष संकेतांक किंवा की वापराची प्रणाली आहे. परंतु ही पद्धती अत्यंत गुंतागुंतीची असते.त्यामुळे  ईमेल सेवा देणाऱ्या कंपन्यांतर्फे त्याचा व्यापक पातळीवरील उपयोग  होत नव्हता. मात्र या इन्क्रिप्शनचा उपयोग प्रोटॉनमेलमध्ये करण्यात आला आहे
कसे आहे प्रोटॉनमेल?
या सेवेचे मूळ अकौंट मोफत दिले जाणार आहे आणि त्याला फ्रीमियम असे नाव देण्यात आले आहे मात्र यात जादा सुविधा हव्या असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल. चीन, इराण, रशियाने या सेवेचा वापर सुरू केला आहे.
या सेवेचा  सर्व्हर स्वित्झरर्लंडमध्ये असल्याने त्यात अमेरिकेच्या प्रशासनाचा त्यात हस्तक्षेप होण्याची  शक्यता नाही.
कुठे आणि केव्हा वापरावे ?
- परदेशात आयात - निर्यात  करणाऱ्या बहुतेक कंपन्या  ईमेलवर संपर्कात राहून आर्थिक व्यवहार करीत असतात तसेच अनेकवेळा काही परदेशी  कंपन्या भारतातील  कंपन्यांशी इ मेलवरुन अर्थीक  देवाण घेवाण करतात . हे ईमेल हॅक  होऊन फसवणूक होऊ शकते . आणि बहुतेक ईमेल सर्व्हर परदेशात असल्यामुळे याचा तात्काळ तपस करन्यासाठी सायबर शाखेला अडचणी येतात . त्यामुळे इथिक व्यवहार करतांना मोफत असणाऱ्या ईमेलऐवजी सशुल्क प्रोटॉनमेलराख्या सेवांचा  वापर करणे केव्हाही सुरक्षित ठरते
आर्थिक व्यवहार करतांना काय काळजी घ्यावी ?
--ईमेल पाठविण्याकरिता डिजिटल सिग्नेचरचा वापर करावा
--आर्थिक व्यवहार करतांना देवाण-घेवाण संदर्भातील ईमेल बारकाईने लक्ष देऊन बघावा
--जर ईमेल हॅक झाला तर ती माहिती सर्वांना द्यावी
-- अमिश दाखविणाऱ्या ईमेल पासून सावध राहावे .
---ऑनलाईन बँकेचा पासवर्ड ,एटीएम चा किंवा क्रेडिट कार्डचा पिन तसेच OTP ,कार्डवर असलेला १६ अंकाचा क्रमांक कुणालाही सांगू नये

लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment