Tuesday, 3 October 2017

स्पाय वेअर चा धोका

स्पाय वेअर चा धोका
आजकाल कंप्यूटर वायरस पेक्ष्या स्पाय वेअर चा धोका खूप वाढला आहे. स्पाय वेअर हे कंप्यूटर प्रोग्रॅम जेम्स बॉंड च्या कार्य पद्धतीचे कंप्यूटर रूप होय.  काही ई-मेल उघडल्यावर लगेचच तुमच्या कंप्यूटर मध्ये स्पाय वेयर शिरू शकते. तविविध प्रकारांनी स्पाय वेअर तुमच्या नकळत तुमच्या कंप्यूटर मध्ये शिरतात आणि तुम्ही कंप्यूटर वर काय करता याची पूर्ण खबरबात ठेवतात. तुमची खाजगी माहिती, काय पासवर्ड टाइप केले, कुठले प्रोग्रॅम वापरले, कुठल्या वेब साईट ना भेटी दिल्या ही माहिती स्पाय वेअरच्या सहाय्याने  सायबर चोरांच्या हाती लागू शकते.
काही प्रकारचे स्पाय वेअर तर भयंकर धोकादायक कंप्यूटर प्रोग्रॅम तुमच्या कंप्यूटर मध्ये कायम स्वरूपी टाकु शकतात. त्याने तुमचा कंप्यूटर चा स्पीड कमी होऊ शकतो तर कधी कधी तुमच्या कंप्यूटर चा पूर्ण ताबा पण जाऊ शकतो. काही स्पाय वेअर हे इतक्या खुबीने स्वतःला लपवतात की त्याना शोधणे व काढणे मुश्कील होऊन बसते.
सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवादवर उपाय
 आपण कंप्यूटर वापरताना थोडी काळजी घेतली तर ह्या सायबर चोरांवर मात करणे अजिबात अवघड नाही.
• आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून किंवा दुसर्‍याच्या कंप्यूटर वरुन करू नका. 
• अनोळखी वेब साईट ना भेटी देण्याचे टाळा. 
चॅट करताना कुठलीही महत्वाची माहिती टाइप करू नका. वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.
• कंप्यूटर वापरताना जागरूक राहा.अनोळखी व अनावश्यक गेम्स व प्रोग्रॅम लोड करू नका.

• स्पाय वेअर व वाइरस यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी तुमच्या कंप्यूटर मध्ये चांगला Anti Virus व Anti Spy ware प्रोग्रॅम बसवून घ्या.
• दर 2 किंवा 3 दिवसांनी कंप्यूटर च्या वापरामुळे जमा झालेली तात्पुरती डाउनलोडेड माहिती व जुनी वेब पेजेस कायमस्वरूपी काढून टाकत चला.
• पासवर्ड असे ठेवा की जे सहज ओळखायला कठीण राहतील.
सायबर विश्वातील आर्थिक गैर व्यवहार टाळता येऊ शकतात हे . वर दिलेले उपाय तुम्हाला कंप्यूटर वर सुरक्षित आर्थिक व्यवहार करण्यास  मदत करतील.
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment