Tuesday, 3 October 2017

ऑनलाइन शॉपिंग

ऑनलाइन शॉपिंग.............… सावधानता बाळगा … सायबर चोर लपून बसलेय. 

आजकाल इंटरनेटमुळे अनेक व्यवहार करणे सुलभ झाले आहेत. मात्र, जरी ही सुलभता असली तरी अनेक धोके आहेत. तुमची याच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
ऑनलाइन म्हणजेच इंटरनेट शॉपिंग करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. घरबसल्या खरेदी असल्यामुळे बाजारातली गर्दी, वेळ आणि इंधनाची बचत होते. परंतु ऑनलाइन शॉपिंगबद्दल लोकांच्या मनात अनेक शंकाकुशंका असतात.
प्रतिष्ठित आणि सुरक्षित साइट्सची निवड तुम्ही खरेदीसाठी साइटची निवड करता तेव्हा ब्राउझरच्या अॅड्रेस बारमध्ये छोटे कुलपाचे चिन्ह आहे का याची खात्री करा.
वेबसाइटचा पत्ता https:// पासून सुरू व्हायला हवा. येथे s म्हणजेच secure. तरीही खरेदी करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ज्या योजना अतिशय आकर्षक वाटतात त्याची खात्री करून घेणे महत्वाचे आहे. जर एखाद्या संकेतस्थळाबाबत खात्री वाटत नसल्यास मित्र, नातेवाइकांकडे चौकशी करा. इंटरनेटवर सर्च करून त्या साइटबद्दलची मतं जाणून घ्या आणि नंतरच खरेदीचा बेत आखावा. माहीतर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
ज्या वस्तू खरेदी करावयाच्या आहेत. त्याचे आधी पैसे भरू नका. वस्तू घरी आली की त्याचे पैस द्यावेत. तसेच ऑनलाइन पैसे भरण्यापूर्वी तुम्हाला पासवर्ड विचारला जातो जेणेकरून तुमची वैयक्तिक माहिती गोपनीय राहील. हा पासवर्ड निवडताना तुम्हाला अक्षरे, अंक आणि चिन्हे यांची सरमिसळ केली पाहिजे. सार्वजनिक जागांवर wi-fi असलेल्या ठिकाणी ऑनलाइन खरेदी टाळावीच.
आपल्याला जी गोष्ट खरेदी करायची आहे त्याच्या खाली Add to Basket क्लिक करणे. दिलेल्या सूचनेनुसार तुमची वैयक्तिक माहिती भरून द्या. Asterisk चिन्ह असलेला रिकामा रकानाही भरणे अनिवार्य आहे. अर्ज पूर्ण भरून झाल्यावर तुमच्याकडे खरेदी केलेल्या वस्तूंची यादी येईल ती तपासून घेणे. साइटवर दिलेल्या terms and conditions ची यादी तपासून घेणेही महत्वाचे आहे.
ऑनलाईन खरेदीसाठी तुम्ही तुमचा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर तेथे नोंदवू शकता. जेणेकरून तुमच्या खात्यातून पैसे वळते होतील. या सेवेसाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड फी भरणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही पैसे भरलेत की submit किंवा proceed चे बटन क्लिक करू शकता. त्यानंतर अधिक सुरक्षिततेसाठी परत लॉगइन आणि पासवर्ड विचारला जातो. काही साइट्स मध्यस्थाचे काम करतात. पण थोडी खबरदारी घ्यावी.
तुम्ही जेव्हा वस्तू साइटवरून खरेदी करता तेव्हा पैसे तुम्ही Paypal कडे भरत असता. मग Paypal पैसे माल विक्रेत्याला (vendor) देत असतो. त्यामुळे माल विक्रेत्याला ग्राहकाची बँक माहिती अजिबात कळत नाही. जेव्हा तुम्ही जास्त किमतीची वस्तू खरेदी करता तेव्हा डेबिट कार्डपेक्षा क्रेडिट कार्ड वापरणे अधिक योग्य. त्याचबरोबर खरेदी केलेली वस्तू जर योग्य नसेल तर तुम्ही तुमचे पैसे परत मागू शकता.
आपल्या बँकेचा ऑनलाइन पासवर्ड कुणालाही देऊ नये. ई-मेलने पाठवू नये. जेव्हा तुम्ही ऑनलाइन खरेदी करता तेव्हा क्रेडिट कार्डसाठी बँकेचा पिन किंवा पासवर्ड विचारला जात नाही हे लक्षात घ्या. त्याऐवजी ३-४ अंकी सिक्युरिटी नंबर विचारला जातो. बहुतेक साइटवर तुम्ही दिलेली गोपनीय माहिती साठवली जात नाहीच, त्यामुळे काळजीचे कारण नाही. सरतेशेवटी साइटवरून खरेदी करताना त्यावर सिक्युरिटीचे चिन्ह आहे की नाही हे तपासून पाहाणे गरजेचे आहे.
न्फर्मेशन अँण्ड कम्युनिकेशनच्या या जमान्यात टेक्नॉलॉजीमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल घडून आला आहे. स्वस्तातले स्मार्ट फोन व इंटरनेटमुळे हल्ली खेड्यातील व्यक्तीही ब्राऊजिंग करून एकाच प्रकारातील शेकडो प्रॉडक्टस ऑनलाइन बघू शकते. यात अगदी शूजपासून, टी शर्ट, मोबाइल, म्युझिक सिस्टिम, लॅपटॉप व विविध इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचाही समावेश आहे. त्यामुळे पारंपरिक दुकानांमध्ये, स्टोअर्ससह मॉलमध्ये प्रत्यक्षात जाऊन होणारा पैशाचा व वेळेचा अपव्यय यामुळे टळू शकतो. ऑनलाइन रिटेलिंगमुळे खरेदीचा विस्तार झाला आहे. ऑनलाइन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठी खुले केले आहे. त्यामुळे जे लोक रिटेलिंगपासून दूर होते ते आता जवळ आले आहे. ऑनलाइन रिटेलर्स ग्राहकांना काहीशा वाजवी दरात विविध वस्तूंची विक्री करतात. तसेच जे प्रॉडक्ट आपल्या गावात किंवा शहरात मिळत नाही, त्या प्रॉडक्टचीही खरेदी करणे यामुळे शक्य होते.वेबसाइटमुळे आपण केव्हाही (अगदी रात्रीही) ऑनलाइन खरेदी करू शकतो. यामुळे जे लोक जायबंदी आहे किंवा जे लोक आपले घर सोडू शकत नाही अशा लोकांनाही बसल्या जागी वस्तूंची खरेदी करता येते. तसेच खरेदी करण्यापूर्वी आपण इंटरनेटवर विविध प्रॉडक्टबाबत संशोधन करू शकतो, तसेच त्यांच्या किंमतीमधील तुलना करू शकतो; मात्र यासाठी विविध दुकानांना, स्टोअर्सला प्रत्यक्ष भेट देणे शक्य नसते;त्याचप्रमाणे ऑनलाइन खरेदीचे जसे फायदे आहे, तसेच तोटेही आहेत. ऑनलाइन रिटेलर्स जरी पारंपरिक दुकानांच्या तुलनेत वाजवी दरात प्रॉडक्टसची विक्री करत असले, तरीही त्या प्रॉडक्टच्या दर्जाबाबत आपल्याला कुणीही शाश्‍वती देऊ शकत नाही. पारंपरिक दुकानांमध्ये जाऊन तुम्ही वस्तूची तत्काळ खरेदी करू शकतात. याउलट वस्तू ऑनलाइन खरेदी केली, तर ती वस्तू घरी यायला काही दिवस लागतात. पारंपरिक दुकानांमधून घेतलेली वस्तू वॉरंटी अंतर्गत परत करणे सहज सोपे असते; परंतु या उलट ऑनलाइन वस्तू परत करणे अवघड असते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाहतुकीचा खर्च द्यावा लागतो. दुकानांमध्ये वस्तू खरेदी करताना आपण ती वस्तू प्रत्यक्ष हातात घेऊन त्या वस्तूच्या दर्जाबाबत खात्री करून घेत असतो. या उलट ऑनलाइन वस्तू जरी आकर्षक व चमकदार वाटत असली, तरीही प्रत्यक्षात ती तशी असेलच असे नाही. कपड्यांच्या दुकानांमध्ये ‘फिटिंग रुम’ची सोय केलेली असते. त्यामुळे आपण तेथे जाऊन तो विशिष्ट टी शर्ट किंवा ती जीन्सची पॅँट ‘ट्राय’ करू शकतो. ऑनलाइन खरेदी करताना या सुविधेचा अभाव असतो. ऑनलाइन खरेदीमध्ये वाहतुकीचा खर्चाबाबत सुरुवातीला काहीच सांगितले जात नाही. नंतर मात्र हा ‘शिपिंग’चा म्हणजेच वाहतुकीचा हा अतिरिक्त खर्च या वस्तूच्या मूळ किंमतीत धरला जातो. ऑनलाइन खरेदीत फसवणुकीची शक्यता जास्त असते. यात प्रॉडक्टसची विक्री करणार्‍या तिसर्‍या पक्षाकडून खरेदीदारांची फसवणूक होण्याची संभावना असते. यात हे विक्रेते खरेदीदारांकडून वस्तूंचे पैसे स्वीकारतात; परंतु त्या वस्तू घरी पाठवत नाही. पण ऑनलाइन शॉपिंग कितपत योग्य याचा हि विचार करायाल हवा.

ऑनलाइन शॉपिंग टिप्स 
शक्यतो नावाजलेल्या वेबसाइट्सवरून शॉपिंग करा जेणे करून काही अडचण आल्यास त्यांच्याशी थेट संपर्क साधता येतो 
कोणत्याही साइटवरून शॉपिंग करताना खाली लॉक सिम्बॉल आहे का याची खात्री करून घ्या आणि पेमेण्ट करताना आपल्या ब्राउजरवर असणाऱ्या अॅड्रेस बारमध्ये द्धह्लह्लश्चह्य आहे याकडे लक्ष सू द्या कारण सुरक्षित व्यवहार होत असल्याची ती खूण असते 
कोणतीही शॉपिंग वेबसाइट तुमची जन्मतारीख किंवा तुमची अन्य माहिती मागवत नाही पण जर तुमची जन्मतारीख आणि क्रेडीट डेबिट कार्ड नंबर जर कोणालामिळाला तर ते कॉम्बीनेशन करून कार्ड वापरायचा प्रयत्न करू शकतात 
आपले क्रेडीट आणि बँक स्टेटमेण्ट चेक करत राहा आणि कोणतेही न्य चाजेर्स लावलेले नाहीत हे डताळा 
तुमचा कॉम्पुटरवर अपडेेटेड अॅण्टिव्हायरस आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स इन्स्टॉल्ड आहेत याकडे लक्ष असू द्या 
आपला पासवर्ड कोणाला सहज कळेल असा नसावा 
शक्यतो बाहेरच्या मशीन्सवरून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करणे टाळावे 
वायफाय नेटवर्क सिक्युअर्ड आणि पासवर्ड प्रोटेक्टेड असावे 
 ऑनलाईन शॉपिंगचे फायदे

1. जाण्या-येण्याचा वेळ वाचतो. बर्‍याच वेळेस एखाद्या वस्तूवर चांगल्याप्रकारे सूट मिळते.
2. वस्तुची उपलब्धता आणि किंमत कळल्याने इतर वस्तुंबरोबर तुलना करता येते.
3. कधीही खरेदी करू शकत कारण इथे वेळेच बंधन नाही.
4. बर्‍याच वेबसाइटवर निरनिराळ्या वस्तुंच्या खरेदी नंतर ती वस्तू खरेदी केलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया देण्याची सोय असते त्यामूळे आपण खरेदी करत असलेली वस्तू कशी आहे याचा अंदाज येतो.
5. खरेदी केलेल्या वस्तुचे पैसे देण्याचे बरेच सोयीचे पर्याय उपलब्ध असतात.

ऑनलाईन शॉपिंगचे तोटे

1. खरेदी केलेली वस्तू आपल्याला ताबडतोब मिळत नाही. ती कुरीअरने येण्यासाठी 3-4 दिवस वाट पहावी लागते.
2. बर्‍याच वेळेस वेबसाइटवर खरेदी केलेली वस्तू आणि नंतर घरी आलेल्या वस्तूमध्ये तफावत असते. याचे कारण नंतर आपली वस्तू उपलब्ध नव्हती असे सांगितले जाते.
3. कुरीअरने आपल्या घरी येईपर्यंत ती सुरक्षित राहण्याची जबाबदारी कोणीच स्वीकारत नाही.
4. काही वेळेस आपली वस्तू आपल्यापर्यंत पोहोचतच नाही व तिची पोच झाली अशी नोंद केलेली असते.
5. प्रत्यक्षात ऑनलाईन शॉपिंगमध्ये सोयीच्या तसेच गैरसोयीच्या ब-याच गोष्टी आहेत. असे जरी असले तरी वाढती मागणी आणि जागृत ग्राहक यामूळे ऑनलाईन शॉपिंगची सुरक्षितता वाढत आहे.




लेखक : प्रा य़ोगेश हांडगे 
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment