कॅशलेस इंडियासाठी आधार कार्डावरून बँक व्यवहार....आईडीएफसी बँकेचे ‘आधार अॅप’
कॅशलेस सोसायटी निर्माण करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर रोजी मोठ्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती.आणि या दृष्टीने पाऊल टाकण्यास सुरूवात कराण्याकरिता , कोणतीही रोख रक्कम न बाळगता व्यवहार करायला देशवासियांनी शिकायाला हवे , याच पार्श्वभूमीवर सरकारने हे नवे पाऊल उचलयाला सुरुवात केलेली आहे .
देशात कॅशलेस अर्थव्यवसंस्थेच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असे नवे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे , ते म्हणजे आता चक्क आधार कार्डच्या सहाय्याने बँक व्यवहार करता येतील. आधार कार्डशी संलग्न बँक खात्यातून हे व्यवहार होऊ शकतील.नुकतेच कॅशलेस सुविधा सुलभ करण्यासाठी आईडीएफसी बँक आणि नॅशनल पमेंट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तरित्या आधार अॅप विकसीत केले आहे.
सुविधा :
-आधार कार्ड कोडद्वारे कोणतेही बिल भरण्यासाठी थेट खात्यातील रक्कम वळती करता येईल.
-आधार कार्डधारकांना त्यांच्या संलग्न बँक खात्यातून पैसे डेबिट किंवा क्रेडीट करता येईल
-थोडक्यात ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशी कोणतीही व्यक्ती या अॅपच्या माध्यमातून व्यवहार करु शकते. मोबाईल नंबर, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड याशिवाय कॅशलेस व्यवहार करणे शक्य होणार आहे
सुरक्षितता :
-प्रत्येक व्यवहारापूर्वी फिंगरप्रिंट्स वा रेटिना (डोळ्याचे बुब्बुळ) स्कॅनिंग करुन व्हेरिफेकशन करणं बंधनकारक असेल.
-आधार संलग्न बँक सेवांसाठी अँड्रॉईड मोबाईल अॅपद्वारेच हे स्कॅनिंगही करता येईल.
-आधारसंलग्न बँक खात्यातून होणाऱ्या व्यवहारांबाबत गोपनीयता पाळली जाणार आहे. आधार संलग्न बँक सेवांसाठी लवकरच अँड्रॉईड मोबाईल अॅपही सुरु करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातूनच फिंगरप्रिंट्स आणि रेटिना स्कॅनिंग करता येईल.
- याकरिता हे अॅप एड्रॉइड मोबाइलवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्मार्टफोनच्या बायोमेट्रिक रिडरने संलग्नित करावे लागेल. हा रिडर केवळ २००० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या अॅपद्वारे ग्राहक आपल्या आधार कार्डनंबरच्या आधारे व्यवहार करु शकतात. आधार कार्डचा नंबरनुसार,बँकेची निवड करावी लागेल. बायोमेट्रिक स्कॅनर पासवर्डचे काम करेल
उपयोग :
-या अॅपमध्ये प्लॅस्टिक आणि पॉइंट सेल सारख्या समस्या दुर होणार आहेत
-या अॅपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारामध्ये कोणतीही अधिक फी आकारली जाणार नाही. सध्या कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारामध्ये ग्राहकांना अधिक मोबदला द्यावा लागतो. या अॅपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कॅशलेस सेवेचा मार्गही सुलभ होण्यास मदत होईल.
सध्या देशातील ४० कोटी लोकांनी आधारकार्ड बँकेशी संलग्नित केले आहे. मार्च २०१७ पर्यंत सर्व आधार नंबर बँकेशी संलग्नित करण्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे लक्ष आहे
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
Mobile: 9423077963
No comments:
Post a Comment