सावधान !
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची सूचना
सावधान... पुन्हा आला आहे नवीन रॅन्समवेअर व्हायरस "खंडणीखोर 'लॉकी रॅनसमवेयर' व्हायरस "
सध्या
अनेक देशामध्ये कम्प्युटर व्हायरस हहल्ल्यांची विविध सायबर हल्ल्यांची
मालिका सुरु झाली आहे . प्रामुख्याने 'लॉकी रॅनसमवेयर' हा व्हायरस
कम्प्युटरमध्ये शिरकाव करतो आणि त्यानंतर सिस्टम लॉक करतो. त्यानंतर तुमचं
कम्प्युटर किंवा लॅपटॉप ओपन करण्यासाठी चक्क खंडणीची मागणी करत आहे .
काही
दिवसांपूर्वी संगणक लॉक करून खंडणी मागणारा ‘वानाक्राय’ रॅन्समवेअर जगातील
150 पेक्षा जास्त देशांत पोहोचला होता . युरोपियन युनियनच्या
‘युरोपोल’नुसार त्यानंतरच्या सायबर हल्ल्यात 2.27 लाखांपेक्षा जास्त
संगणक लॉक झाले होते . आता पसरत असलेला लॉकी रॅनसमवेयर' हा रॅनसमवेयरची
नवीन व्हर्जन आहे
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे कि ,"
सीईआरटीने लॉकी रॅनसमेयर व्हायरस पसरत असल्याची सूचना दिली आहे."
हा
रॅनसमेयर कम्प्युटरमध्ये शिरकाव करून सिस्टम लॉक करतो. आणि तुमचं
कम्प्युटर किंवा लॅपटॉप ओपन करण्यासाठी जवळपास दिड लाख रुपयांची मागणी
करतो.
स्पॅम ई-मेल प्रसारीत केला जात आहे लॉकी रॅनसमवेयर
भारत
सरकार ने साइबर सिक्योरिटीसाठी सुरु केलेल्या सायबर स्वच्छ केंद्रातर्फे
जाहीर केलेल्या अलर्टमध्ये म्हटलं आहे की, एक स्पॅम ई-मेल प्रसारीत केला
जात आहे. या ई-मेलच्या सब्जेक्टमध्ये लॉकी रॅनसमवेयरच्या वेगवेगळ्या
प्रकारांचं नाव दिलं जात आहे. हा रॅनसमवेयर ई-मेल अटॅचमेंटच्या स्वरुपात
पाठविला जात आहे. सरकारने सांगितलं आहे की, लॉकी रॅनसमवेयर पसरविण्याच्या
उद्देशाने जवळपास २३ मिलियन मेसेजेस पाठविले आहेत.
भारताला धोका?
भारतात सध्या डिजिटल इंडिया मोहीम सुरु आहे.
त्यानुसार , अनेक उपक्रम सुरु आहेत डिजिटल व्यवहार ,आधार कार्डचा डेटा आणि इतर महत्वाचा डेटा हा सर्व्हर वर साठविलेला आहे
त्यामुळे
सायबर हल्ल्याचा धोकाही वाढला आहे. ज्याप्रमाणे काहीदिवसांपूर्वी
ब्रिटनमध्ये रॅनसमवेयर हल्ल्याने राष्ट्रीय स्वास्थ्य सेवेला आपलं टार्गेट
बनवलं. त्याप्रकारचा सायबर हल्ला भारतात झाला तर कोट्यावधी लोक प्रभावित
होऊ शकतात .
संगणकात शिरकाव कसा होतो :
-
सॉफ्टवेअरची किमंत फार परंतु Cracked Softwares स्वरूपात ती इंटरनेटवर
मोफत उपलब्ध असतात . सायबर गुन्हेगार ह्यात सॉफ्टवेरमध्ये अशा Cracked
Softwares मध्ये रॅन्समवेअर जोडून ते इंटरनेटवर इंटरनेट वापरकर्त्यांना
डाउनलोड करिता उपलब्ध करून देतात.
- अज्ञात स्रोतांहून आलेले
प्रलोभने दाखवणारे इमेल याद्वारे रॅन्समवेअरचा संगणकात शिरकाव होतो . ती
इमेल उघडताच त्या सोबत असलेलया अटॅचमेंट द्वारे हे रॅन्समवेअर आपल्या
संगणकात डाउनलोड होतात.
- इंटरनेट वरील रॅन्समवेअरचा प्रादुर्भाव झालेली संकेतस्थळे. (Malicious Websites)
---नोळखी ई-मेल किंवा लॉटरी संदर्भातील ई-मेल.
>>>खंडणीसाठी मागवले जातात Bitcoin
आतापर्यंत अनेक देशांमध्ये झालेल्या सायबर हल्ल्यात खंडणीमध्ये बिटकॉईन (एक प्रकारचे चलन) मागितले गेले होते .
काळजी घ्या
>>जुनी
विंडोज ऑपरेटींग सिस्टीम म्हणजेच XP, 8 किंवा विस्टाचा वापर करणाऱ्यांनी
तात्काळ अपडेट करावे . मायक्रोसॉफ्टने विशेष सिक्युरीटी पॅच प्रसिद्ध
केलेले आहेत.
>>कुठल्याही प्रकारची ई-मेलमध्ये आलेली रॅर किंवा झीप फाईल उघडण्याआधी ती सुरक्षित आहे याची खात्री करून घ्या .
संगणकात आणि लॅपटॉपसाठी माइक्रोसॉफ्टचे व्हायरस डिफेंडर सॉफ्टवेयर... "Windows Defender किंवा Malicious Software Removal Tool"
माइक्रोसॉफ्टच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ..
-
या लिंकवरून संगणकातील ऑपरेटिंग सिस्टिम नुसार Windows Defender किंवा
Malicious Software Removal Tool डाउनलोड करून . ते इंस्टॉल करा...
-
त्यानंतर पी.सी. किंवा लॅपटॉपला विंडोझच्या SafeMode मध्ये घेऊन इस्टॉल
केलेल्या डिफेंडर या मालवेयर टूलने डीप स्कॅन करून स्क्रीनवरील
निर्देशानुसार व्हायरस रिमूव्ह करा
मायक्रोसॉफ्टने विन्डोझ ऑपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांसाठी १० घातक
व्हायरस फायलींची यादी जाहीर केली. त्यानुसार विन्डोझ ऑपरेटिंग सिस्टिम..
वापरणाऱ्यांनी आपली ऑपरेटिंग सिस्टिम वाचवण्याकरिता या १० फायली शोधून अॅन्टी-व्हायरसच्या मदतीने डिलीट करावे असे आवाहन कंपनीने केले आहे.
१० प्रकारच्या फाईल्स
--Ransom:HTML/Locky.A
--Ransom:Win32/Locky
--Ransom:HTML/Crowti.A
--Ransom:HTML/Tescrypt.D
--Ransom:HTML/Exxroute.A
--Ransom:Win32/Cerber.A
--Ransom:HTML/Tescrypt.E
--Ransom:HTML/Cerber.A
--Ransom:JS/Brolo.C
--Ransom:JS/FakeBsod.A
लेखक : प्रा य़ोगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment